Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

दिवसभरात करता येतील असे 10 व्यायाम प्रकार

 ब्लॉग नं: 2025/197.

दिनांक: 17 जुलै, 2025.

मित्रांनो,

            आजकाल मोठमोठया शहरात लोकांना नोकरीसाठी महत्प्रयास करत जावं लागतं. कष्टाच्या नोकरीपेक्षा देखील कष्टाचं घरुन नोकरीच्या ठिकाणी आणि परत घरी येणं झालंय.अशा वेळी वेळ काढून जिमला जाणं अनेकांना जमत नाही.छोट्या शहरात किंवा गावात जिमची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसते. अशा त्याला पर्याय म्हणून दिवसभरात सहज करता येतील असे 10 व्यायामाचे प्रकार माझ्या वाचनात आले,ते आजच्या या ब्लॉगद्वारे मी सविस्तर उपलब्ध करुन देत आहे.   

सविस्तर:

आपल्यापैकी कित्येकांना जिमला जाणे किंवा तासन्‌तास व्यायाम करणे जमत नाही. पण काही सवयी बदलून आपण आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवू शकतो.

आज आपण या दहा  सोपे व्यायाम प्रकार आपण जाणून घेऊ. 

🌟 1. लिफ्टऐवजी जिना वापरा:

साधारणतः या तुमचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर असेल,तर तेवढे जिने उतरून जाणे आणि चढून येणे शक्य आहे.सकाळी मॉर्निंग वॉकला जातांना आणि परत घरी येतांना लिफ्ट ऐवजी जिना वापरा,किंवा ऑफिसला जातांना आणि परत येतांना तुम्ही जिन्याचा वापर करा. ऑफिस किंवा घरात लिफ्टकडे न जाता जिन्याने चढा-उतरा. यामुळे पायांना आणि फुफ्फुसांना चांगला व्यायाम मिळतो.

🌟 2. जास्त वेळ बसू नका:

दर 30-40 मिनिटांनी खुर्चीतून उठून दोन मिनिटे चालून या किंवा अंग ताणून घ्या. तुमचा बैठा जॉब असेल तर,मधूनच पाणी प्यायला जाण्यासाठी किंवा सहज दोन मिनिटे चालून या.तेवढे सुद्धा केलेत तर पाय मोकळे होतील.   

🌟 3. फोनवर बोलताना फिरा:

मोबाईलवर बोलत असाल तर एका जागी उभं न राहता,खोलीत फेरफटका मारत मोबाईलवर संभाषण करा.त्यामुळे देखील पाय मोकळे होण्यास मदत होईल.     .

🌟 4. टीव्ही बघताना हलका व्यायाम:

टीव्ही बघतानाच काही बैठे,एका जागेवर उभे राहून करायचे किंवा खाली जमिनीवर बसून  करायचे व्यायाम जसे स्क्वॅट्स, स्ट्रेचिंग किंवा थोडा पुल-अप करा.तेवढे केलेत तरी शरीराला थोडा व्यायाम मिळेल. 

🌟 5. दिवसाची सुरुवात ५ मिनिटांच्या व्यायामाने करा.

सकाळी फक्त ५ मिनिटे सूर्यनमस्कार किंवा स्ट्रेचेस केल्याने दिवस हलका वाटतो.

🌟 6. जवळच्या ठिकाणी चालत जा:

बाइक किंवा गाडी न वापरता जवळच्या ठिकाणी चालत जा – चालणे हे उत्तम व्यायाम आहे.आजकाल खूप जण अगदी 100 मीटर देखील चालत नाहीत.जिथे शक्य असेल तिथे पायी जायची सवय लावून घ्या.    

🌟 7. कामाच्या वेळी तसेच जेवतांना ताठ बसा आणि श्वसनावर लक्ष द्या:

बऱ्याच लोकांना पाठीला पोक काढून बसायची सवय असते,त्याऐवजी ताठ बसलं तर त्याचे अनेक फायदे शरीराला होतात. योग्य आसन आणि खोल श्वास घेणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर.

🌟 8. घरकामात सक्रिय व्हा:

झाडू-पोछा, बागकाम, या क्रियांमध्ये देखिल भरपूर व्यायाम होऊ शकतो त्यामुळे यालाही व्यायाम समजा.

🌟 9. झोपण्यापूर्वी 5 मिनिटे स्ट्रेचिंग:

रात्री झोपण्याआधी थोडे स्ट्रेचिंग केल्याने शरीर सैल होते आणि झोप चांगली लागते.

🌟 10.ऑफिसमध्ये बसूनही व्यायाम करा:

ऑफिसमध्ये बसल्या बसल्या देखिल काही बैठे व्यायाम प्रकार करता येतात जसे खांदे, मान, मनगट, पाय यासाठी काही seating exercises दररोज करा.

समारोप:

मित्रांनो, शरीराला कुठलीही क्रिया न करता राहिले तर निश्चितपणे त्रास होतो. माझं विशेषतः तरुण लोकांना सांगणे आहे, कि जेवढी जमेल तेवढी हालचाल करीत चला. स्नायूंचे वस्तुमान आणि ताकद सामान्यतः, एखाद्या व्यक्तीच्या 30 किंवा 40 च्या दशकात, कधीतरी कमी होण्यास सुरुवात होते, ही प्रक्रिया सारकोपेनिया म्हणून ओळखली जाते. स्नायूंचे हे नुकसान आयुष्यभर चालू राहते, परंतु 65 किंवा 80 वर्षांच्या वयानंतर घट होण्याचे प्रमाण वाढू शकते. स्नायूंचे नुकसान हे वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग असले तरी, निष्क्रियतेमुळे ते वाढू शकते.     

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

🏻 लेखक: प्रसाद नातु

(आरोग्य व जीवनशैली विषयक लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

 

     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...