Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

स्नान केव्हा करावे? सकाळी कां संध्याकाळी?

ब्लॉग सं. 2025/145

दिनांकः 26 मे, 2025.

मित्रांनो

            आपला देश हा विविधतेने नटलेला आहे,तसाच तो वेगवेगळ्या विचारसरणीने देखील नटलेला आहे. अशा या देशात स्नान किंवा आंघोळ नेमकी केव्हा केली पाहिजे यात एकवाक्यता नाही.हे मी रोज नियमितपणे स्नान किंवा आंघोळ करणाऱ्याविषयी बोलतो.म्हणजे काही लोक म्हणजे बहुमताने लोक स्नान हे सकाळी केले पाहीजे या मताचे आहेत.साधारणतः 60-70% लोक असे समजतात आणि बाकीचे समजतात की आंघोळ ही संध्याकाळी करावी किंवा याचा काही फिक्स्ड टाइम नाही. 2022 मध्ये स्लीप फाउंडेशनने केलेल्या अमेरिकेतील सर्वेक्षणानुसार, 42% अमेरिकन लोक सकाळी स्नान करणे पसंत करतात. त्यांना दिवसाची सुरुवात ताजेपणा आणि उत्साहाने करायला आवडते.यावर एक अभ्यास करण्यात आला आहे. त्या अभ्यासानुसार आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघूया की आंघोळ सकाळी करावी की रात्री कां केव्हाही.

सविस्तर:

स्नान करण्याची योग्य वेळ – एक अभ्यास

स्नान करण्यासाठी योग्य वेळ निवडणे ही वैयक्तिक सवयी, दिनचर्या, आणि शारीरिक गरजांवर अवलंबून असते. सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करणे यावर अनेक वाद आहेत, पण कोणती वेळ योग्य आहे याचा निर्णय तुमच्या गरजांवर आधारित असतो.

सकाळी स्नान – म्हणजे ताजेपणाची सुरुवात:

सकाळी स्नान करण्याचे अनेक फायदे आहेत.

सकाळी स्नानाचे फायदे:

1.       शरीराला ताजेतवाने करते आणि दिवसभर उर्जावान ठेवते.

2.       रक्ताभिसरण सुधारते आणि मनाला शांतता मिळते.

3.       दिवसभराच्या कामांसाठी मानसिक तयारी होते.

सकाळी स्नान कोणासाठी योग्य आहे?

·        ज्या लोकांना दिवसभर सक्रिय राहायचे आहे.

·        ज्या लोकांना व्यायाम किंवा जॉगिंगनंतर स्वच्छता राखायची आहे.

संध्याकाळी स्नान – विश्रांतीची तयारी:

संध्याकाळी स्नान करणाऱ्यांसाठी,हा दिवसाचा शेवटचा ताजेतवाने करणारा क्षण असतो. 25% लोक झोपण्यापूर्वी स्नान करणे पसंत करतात, कारण यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो आणि झोप शांत लागते.

संध्याकाळी स्नानाचे फायदे:

1.       दिवसभरातील घाम, धूळ आणि प्रदूषण साफ होते.

2.       झोपेपूर्वी शरीर आणि मन शांत होते.

3.       झोप चांगली लागण्यास मदत होते.

संध्याकाळी स्नान कोणासाठी योग्य आहे?

·        ज्या लोकांना दिवसभर प्रवास किंवा शारीरिक श्रम करावे लागतात.

·        ज्या लोकांना झोपेआधी विश्रांती हवी आहे.

आंघोळ आणि मानसिक स्वास्थ्य:

आंघोळ केवळ शारीरिक स्वच्छतेसाठीच नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाची आहे. तज्ज्ञांच्या मते,आंघोळ केल्याने ताण आणि चिंता कमी होतात. यामुळे शरीरात सकारात्मक संप्रेरक सक्रिय होतात, आणि मज्जासंस्था शांत होते.

भारतीय परंपरा आणि सवयींनुसार स्नानाचे महत्व:

भारतात बहुतेक लोक (60-70%) सकाळी स्नान करणे पसंत करतात, कारण धार्मिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातून याला अधिक महत्त्व आहे.शहरी भागातील सुमारे 30-40% लोक संध्याकाळी स्नान करतात, विशेषतः त्यांची व्यस्त दिनचर्या लक्षात घेता.

योग्य वेळ कधी?

जर तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळा स्नान करणे शक्य नसेल, तर तुमच्या गरजा, सवयी आणि दिनचर्येनुसार स्नानासाठी वेळ निवडणे उत्तम आहे.तुम्ही सकाळी स्नान करा किंवा संध्याकाळी, महत्त्वाचे म्हणजे ती क्रिया केवळ शरीरासाठीच नाही, तर मनासाठीही ताजेतवाने करणारी असावी.

समारोप:

            यावर अभ्यास जरी करण्यात आला असला तरी शेवटी, अभ्यासात हेच म्हटले आहे की ज्याच्या त्याच्या गरजा,सवयी आणि तो व्यक्ती कुठल्या प्रकारचे काम करतो यावर अवलंबून आहे. यात असेही म्हंटले आहे की, तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेत स्नान केलेत तर ते उत्तम.कारण स्नानामुळे केवळ शारीरिक स्वच्छता साधली जाते असे नव्हे तर त्याने मनाला देखील टवटवी मिळते.       

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते, कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर जरूर लिहा. पुनः भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या.स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...