Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

पोट वाढण्याचे दुष्परिणाम आणि कमी करण्यासाठी उपाय

ब्लॉग नं  2025/108.

दिनांक: 19 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

तुमच्या एक गोष्ट लक्षांत येते कां? जेव्हा आपलं पोट वाढत असतं,तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो.आणि जेव्हा पोट आटोक्यात येण्याच्या पलीकडे जातं,तेव्हा आपल्याला सुचतं की याकडे दुर्लक्ष करायला नको होतं.आणि मग जेव्हा पोट खूपच जास्त होतं, तेव्हा ते कमी करणं ही मोठी कसरत वाटायला  लागते.पोट जेवढ्या लवकर वाढतं तेवढं ते लवकर कमी होतं नाही.मात्र, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही पोट कमी करू शकता म्हणजेच पोटावरची चरबीही कमी करू शकता.आजचा ब्लॉग याच विषयावर आहे.  

सविस्तर:

            पोट कमी करण्याचे घरगुती उपाय पहाण्याआधी आपण पोट वाढण्याचे काय दुष्परिणाम होतात,ते बघू.       

पोट वाढण्याचे दुष्परिणाम:

पोट वाढणे ही केवळ दिसण्याशी संबंधित समस्या नसून, ती अनेक गंभीर आरोग्यविषयक समस्यांना आमंत्रण देते.पोट वाढण्याचे काही दुष्परिणाम खाली दिले आहेत:

1.हृदयविकाराचा धोका वाढतो:

पोटावर चरबी साठल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) वाढतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) कमी होते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.

2. मधुमेह (डायबेटीस) होण्याची शक्यता:

जास्त चरबीमुळे शरीरात इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहात नाही. यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

3. उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर):

पोटाची चरबी जास्त असल्यास रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाब हा स्ट्रोक आणि हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतो.

4. सांधेदुखी आणि हाडांवर ताण:

अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवर अधिक ताण येतो,विशेषतः गुडघ्यांवर, ज्यामुळे सांधेदुखी आणि ऑस्टिओआर्थरायटिससारखे आजार होऊ शकतात.

5 . झोपेच्या समस्यांचा त्रास (स्लीप एपनिया):

लठ्ठपणामुळे श्वासावरील नियंत्रण कमी होते, ज्यामुळे झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. याला स्लीप एपनिया म्हणतात, आणि हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते.

6. पचनसंस्थेचे विकार:

पोटाच्या चरबीमुळे पचनसंस्थेवर दबाव येतो.अॅसिडिटी, गॅस, आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढतात.

7. मानसिक ताण आणि आत्मविश्वासाचा अभाव:

पोट वाढल्यामुळे शरीरावर झालेल्या बदलांमुळे मानसिक ताण येऊ शकतो. समाजात कमी आत्मविश्वास वाटू शकतो आणि डिप्रेशनसारख्या मानसिक आजारांची शक्यता वाढते.

8. कॅन्सरचा धोका:

पोटावर साठणाऱ्या चरबीमुळे शरीरात जळजळ होण्याची प्रक्रिया वाढते, ज्यामुळे काही प्रकारच्या कॅन्सर होण्याची शक्यता असते, जसे की आंत्रकॅन्सर (कोलन कॅन्सर) आणि स्तन कॅन्सर.

9. हार्मोन्समध्ये असंतुलन:

लठ्ठपणामुळे शरीरातील हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये बिघाड होतो. महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी किंवा वंध्यत्वासारख्या समस्या निर्माण होतात.

10. कार्यक्षमता कमी होणे:

अतिरिक्त वजनामुळे थकवा येतो, शारीरिक हालचालींमध्ये अडचण येते आणि कार्यक्षमता कमी होते.

पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

1. चरबी कमी करणारे मसाले वापरा:

कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी हे पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी झपाट्यानं कमी होण्यास मदत होते.

2. मिठाचे प्रमाण कमी करा:

मिठाचा अतिरेक शरीरात पाणी धरून ठेवतो, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. म्हणून मिठाचं प्रमाण कमी ठेवा.

3. झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्या:

रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि चरबी कमी होते.

4. साखरेऐवजी गुळ किंवा मध वापरा:

साखरेमुळे वजन वाढतं,तर गुळ किंवा मध शरीराला फायदेशीर ठरतो.त्यामुळे साखर टाळा आणि गोडासाठी गुळ किंवा मधाचा वापर करा.त्यामुळे पोट कमी होण्यास मदत होते.

5. दही आणि लसूणाचा आहारात समावेश करा:

दही नियमित घेतल्याने पोटाची चरबी कमी होते. दररोज सकाळी कच्च्या लसणाची एक पाकळी खा; यामुळे चरबी कमी होण्यास मदत मिळेल.

6. पुरेशी झोप घ्या आणि कोमट पाणी प्या:

पूर्ण झोप घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यात मदत होते.पर्यायाने पोट कमी होण्यास मदत होते.

7. योगासनांचा सराव करा:

नौकासनासारखे योगासन पोट कमी करण्यात खूप मदत करतात. दररोज योगा केल्याने पोटावरील चरबी झपाट्यानं कमी होऊ शकते.

8. सकाळी चालण्याची सवय लावा:

दररोज सकाळी चालण्याची सवय लावा.यामुळे पोट कमी होतं आणि शरीरही तंदुरुस्त रहातं.  

9. रात्री उशिरा जेवण टाळा:

उशीरा जेवल्यास पचन नीट होत नाही आणि पोटावर चरबी वाढते. झोपण्याच्या दोन तास आधी हलकं जेवण करा.जेणेकरून पोट कमी होण्यास मदत होते.

10. शतपावली करा आणि हलका आहार घ्या:

रात्री हलकं जेवण,त्यानंतर शतपावली करण्याने पचन सुधारते.मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा.

समारोप:

            पोट वाढलं की वजनही वाढतं, आणि पोट वाढल्यामुळे होणारे  दुष्परिणाम आपण बघितलेत आणि उपाय देखिल बघितले.आरोग्य चांगले रहावे यासाठी पोट कमी असणे गरजेचे आहे.     

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 



प्रसाद नातु,पुणे.


Comments

  1. अत्यंत उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...