Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

निद्रिस्त मनाची अदभूत शक्ती

Blog No. 2025/116  

Date 27 एप्रिल, 2025.

मित्रांनो,

            आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहे. माणसाचे जीवन हे सकारात्मक अंगाने घेतले तर खूप छान आहे,हे जीवन आपल्याला जगायला मिळणे हीच खरं तर खूप आनंददायी गोष्ट आहे. एकूण काय सकारात्मक अंगाने विचार केला तर,आपल्याला ह्यात आनंदच दिसून येतो. पण नकारात्मक अंगाने विचार केला तर हेच जीवन खूप त्रासदायक आहे असे वाटून जातं.त्याची सुरुवात आपण करतो ती अगदी आई वडिलांनी आपल्याला लहानपणी मनासारखे वागू दिले नाही इथपासून.शाळेत शिक्षकांनी चूक नसतांना मलाच मारले,कॉलेज मनासारखे मिळाले नाही,नोकरी मनासारखी मिळाली नाही,नोकरीत पोस्टिंग मनासारखे मिळाले नाही,बॉस मनासारखा मिळाला नाही,अगदी बायको देखिल मनासारखी मिळाली नाही.बापरे ! नकारात्मक अंगाने विचार केला तर किती गोष्टी विरुद्ध गेल्या असं दिसतं. पण मित्रांनो, काही गोष्टींना काय बऱ्याचशा गोष्टींना आपण जबाबदार असतो.कारण प्रत्येक गोष्टीचा विचार आपण नकारात्मक करत असतो, आणि आपल्या विचार करण्याचा परिणाम नकारात्मक घडण्यात होतो. “मन चिंती ते वैरी न चिंती” असे म्हणतात. हे मनच आपलं वैरी होतं.कां,कसं ते पाहू या पुढील पॅराग्राफ मधे.

The Power of your Sub-Conscious Mind

डॉ जोसेफ मर्फी ह्यांचे हे पुस्तक आहे,The Power of your Sub-Conscious Mind.त्यांना हे पुस्तक का लिहावेसे वाटले या बद्दल ते लिहितात. “जीवनात माणसाला हे प्रश्न नेहमी पडतात की,एखादा माणूस हा नेहमी सुखी,आनंदी रहातो.तर त्याच वेळा दुसरा माणूस दुःखी आणि निराश.एखाद्या कडे दृष्ट लागावे असे घर.तर दुसऱ्यास रहाण्यास पुरेसे असे घर देखील नाही.एखादा चांगल्या स्वभावाचादयाळू आणि धार्मिक माणूस जीवन जगण्यासाठी झगडत असतो.तर एखादा गुंड,मवाली ऐश्वर्यात लोळत असतो.अशा साऱ्याच प्रश्नांची उत्तरे ह्या पुस्तकात मिळतील,असे लेखकाचे म्हणणे. 

काय लिहिले आहे ह्या पुस्तकात

पुस्तकात पुढे म्हंटले आहे की,माणसाचे एकाच वेळी Conscious आणि  Sub- conscious म्हणजेच बाह्य मन आणि आंतरिक मन किंवा जागृत आणि निद्रिस्त मन कार्यरत असतात.काय चांगले आणि काय  वाईट हे निवडण्याचे कार्य मात्र जागृत किंवा बाह्य मन करीत असते.आंतरिक मन किंवा निद्रिस्त मन हे शेतासारखे असते.त्यात जे पेराल तसेच उगवेल.पेरण्याचे काम जागृत किंवा बाह्य मन करीत असते.सकारात्मक विचार का करायचा हे त्यासाठी म्हटले जाते.आपल्या आंतरिक किंवा निद्रिस्त मनात,अशक्य ते देखील घडवायची शक्ती  आहे,असे लेखक म्हणतो.आंतरिक किंवा निद्रिस्त मन,हा आपल्या शरीरात असलेला सुप्त खजिना आहे. आपल्याला काय हवे ते त्याचा वापर करून आपण प्राप्त करु शकतो.आपण दिवस भर जे विचार करीत असतो ते. रात्री आंतरिक किंवा निद्रिस्त मनात store किंवा save केले जाते आणि मग आंतरिक किंवा निद्रिस्त मन त्यावर कार्य करायला लागते.म्हणजे आपण जसा विचार करतो तसेच घडते.

            ह्या पुस्तकात मानसिक स्वस्थ,संपत्ती,यश मिळविणे,श्रीमंत होण्यासाठी,सौख्यपुर्ण वैवाहिक जीवनासाठीभीती घालविण्यासाठी,एवढेच काय तर शांत झोप लागण्यासाठी काय करावे.ह्याचे वेगवेगळे उपाय सांगितले आहे.खरे तर फार पूर्वी पासून असे म्हटले जाते की “मन चिंती ते वैरी ना चिंती” म्हणून वाईट विचार करीत जाऊ नकोस,असे सांगितले जायचे.तसेच असेही म्हटले जायचे की,काही वाईट विचार घरात बोलू नये,वास्तुदेवता तथास्तु म्हणते.म्हणून नेहमी चांगल्या गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी बोलायला हव्यात.असेच पूर्वी वेगळ्या भाषेत सांगितले जायचे.पण आपण मनावर घेतले नाही/घेत नाही.परदेशी लोकांनी सांगितले की आपल्याला पटते. 

अचेतन मनाच्या शक्तीची गोष्ट  

          लेखकाने एका Caruso नावाच्या गायकाची गोष्ट यात सांगितली आहे.ह्या Caruso ला एका संगीत मैफिल मध्ये एकदा गायचे असते.त्याला स्टेजवर जाण्याआधी एका अनामिक भीतीने ग्रासलेले असते.इतके की त्याचा घसा बसतो.त्याला स्वतःची लाज वाटू लागते.आपण अशा परिस्थितीत गाणार कसे,लोक आपल्याला हसतील.मग तो विंग च्या पाठीमागे येऊन जोरात म्हणतो “माझ्या मोठ्या मना (सब-कॉनशियस)माझे छोटे मन (कॉनशियस) माझा गळा आवळण्याचा प्रयत्न करीत आहे”. मग तो लहान मनास म्हणतो “हे लहान मना,माझे मोठे मन माझ्या माध्यमातून गाण्याचा प्रयत्न करीत आहे.तू दूर हो,तू बाजूला हो,तू  दूर हो,तू बाजूला हो.”अन काय आश्चर्य त्याचे अंतर्मन जागृत होते.त्याच्यातील अंतर्गत शक्ती घशापर्यंत पोहोचतात.त्याच्या नावाचा पुकारा होतो.तो  स्टेजवर जाऊन असे काही गातो की रसिक प्रेक्षक बेभान,वेडे होऊन नाचू लागतात.

काय काय करू शकते अचेतन मन

लेखक म्हणतो तुमचे अंतर्मन प्रतिक्रियाशील असते.त्याला तुम्ही साद घाला.ते लगेच प्रतिसाद देते.पण तुम्ही त्याला साद घालतांना,अर्थातच सकारात्मक साद घाला.लेखकाने यात आपले अंतर्मन काय काय करू शकते,ह्याची दिलेली यादी म्हणजेच हे पुस्तक.

1. यशाचा भागीदार म्हणून तुमचे अवचेतन मन काम करते.

2. झोप चांगली लाभावी म्हणून तुमचे अवचेतन मन मदत करु शकते.

3. वैवाहिक समस्या सोडविण्यात तुमच्या अवचेतन मनांची मन होऊ शकते.

4. सुसंवादी संबंध राखण्यासाठी तुमच्या अवचेतन मनाची कशी मदत होऊ शकते.

5. भीतीमानसिक अडथळे दूर करण्यासाठी तुमचे अवचेतन मन कसे वापरावे.

6. कुणाला माफ करावयाचे असल्यास तुमचे अवचेतन मन कसे वापरावे. आणि

7. स्वतःला कायम तरूण राहायचे असेल तर अवचेतन मन कसे वापरावे..  

समारोप:

मी यातील मन शांत नसतांना आणि तब्येत ठिक नसतांना बऱ्याच वेळा हा प्रयोग करून पाहिला आणि तो ही यशस्वीपणे.हे पुस्तक वाचल्यावर आधीच सकारात्मक विचार करण्याऱ्या माझ्यावर,असा परिणाम झाला की,मी आजकाल “नाही” हा शब्द उच्चारायला  अक्षरशः घाबरायला लागलो आहे.न जाणो माझ्या sub-conscious मनाने ऐकले तर. हे पुस्तक Amazon वर उपलब्ध आहे,ते तुम्ही वाचा आणि सांगा काय परिणाम होतो ते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु,पुणे.


Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...