Skip to main content

कॅल्शियमसाठी दुधाशिवाय अन्य पर्याय

  ब्लॉग नं. 2026/129. दिनांक: 9 मे, 2026.   मित्रांनो, दुधाशिवाय कॅल्शियम ? हाडांच्या बळकटीसाठी दुधापेक्षाही सरस आहेत हे पदार्थ आपण लहानांपासून ऐकत आलो आहोत की , हाडांच्या बळकटीसाठी ' दूध ' हाच सर्वोत्तम उपाय आहे. दुधाला कॅल्शियमचा खजिना मानले जाते , हे खरेच आहे.पण , जर मी तुम्हाला सांगितले की दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असलेले,अनेक पदार्थ आपल्या आसपास सहज उपलब्ध आहेत , तर ? कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण ही वस्तुस्थिती आहे.चला तर मग , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण अशाच काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेऊया,जे तुमच्या दैनंदिन आहाराला अधिक पौष्टिक बनवू शकतात. सविस्तर: दुधाचे प्रमाण आणि आपली गरज सुरुवातीला एक बेसिक गोष्ट समजून घेऊ.एका कपात (245 मिली) सुमारे 305 मिग्रॅ कॅल्शियम असते. प्रौढांसाठी कॅल्शियमचे दररोजचे शिफारस केलेले प्रमाण ( RDA) 1 ,000 ते 1,200 मिग्रॅ इतके आहे. याचा अर्थ , केवळ एक ग्लास दुध, हे तुमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही.तर मग , कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी इतर कोणते पर्याय आहेत ? पाहूया: 1 . चीज आणि दुग्धजन्य पदार्थ : ·...

विचार करा, अतिविचार करू नका.

ब्लॉग नं: 2025/059

दिनांक: 28 फेब्रुवरी, 2025.

मित्रांनो:

            बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस एखाद्याला सांगितलं जातं की, तू विचार अजिबात करत नाहीस आणि हे सारे विचार न करण्याचे परिणाम आहेत.अन काही वेळेस असंही म्हटलं जात की, तू ना अतिविचार करतोस,त्याचे हे परिणाम आहेत.मग नेमकं करायचं काय हा प्रश्न मनांत उभा राहतो. उत्तर आहे,विचार करा पण अति-विचार करू नका. कारण विचार करण्याचे सकारात्मक परिणाम असू शकतात,पण अति-विचाराचे अधिकाधिक वेळा नकारात्मक परिणाम दिसून येतात.आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये अति-विचार म्हणजे काय? अति-विचाराचे काय परिणाम होतात आणि तो कसा थांबवावा? हे जाणून घेणार आहोत.                      

अति-विचार म्हणजे काय? आणि तो कसा थांबवावा?

अति-विचार म्हणजे काय?

अति-विचार म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा परिस्थितीचा पुनःपुन्हा विचार करणे, ज्यामुळे मनात गोंधळ निर्माण होतो. हा विचारांचा वेग एवढा जास्त असतो, की निर्णय घेणे कठीण होते. अति-विचारामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होतो.

अति-विचारामध्ये दोन प्रकार असतात:

1.       भूतकाळाचा विचार: आपण भूतकाळात केलेल्या चुका, चुका पुन्हा पुन्हा आठवणे.

2.       भविष्यकाळाची चिंता: भविष्यातील समस्या किंवा अपयश याबद्दल अनावश्यक चिंता करणे.

अति-विचाराचे दुष्परिणाम:

·        मानसिक ताणतणाव

·        झोपेचा अभाव

·        निराशा किंवा नैराश्य

·        निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे

·        स्वतःवरील विश्वास गमावणे

अति-विचार थांबवण्याचे उपाय:

1. वर्तमानात जगा:

भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता करण्याऐवजी वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करा. ध्यान (मेडिटेशन) आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्रामुळे मन शांत होते.

2. समस्या लहान तुकड्यांमध्ये विभागा:

मोठ्या समस्यांकडे पाहून घाबरण्यापेक्षा त्यांची लहान लहान भागांमध्ये विभागणी करा आणि एकेक करून त्या समस्या सोडवा.

3.सकारात्मक विचार करा:

नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

4. ठराविक वेळ द्या:

विचारांसाठी ठराविक वेळ द्या, जसे की रोज 15 मिनिटे विचार करा. या वेळेनंतर मनाला दुसऱ्या कामात गुंतवा.

5.स्वतःवर नियंत्रण ठेवा:

ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही, त्या गोष्टींबद्दल विचार करणे थांबवा. तुम्ही तुमच्या कृतींवर नियंत्रण ठेवू शकता, परिस्थितीवर नव्हे.

अति-विचार कसा व्यवस्थापित करावा?

1. नियमित व्यायाम करा:

व्यायामामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि मेंदूमध्ये सकारात्मक हार्मोन्सची निर्मिती होते.

2. मनातील विचार कागदावर उतरवा:

आपल्या मनातील विचार कागदावर लिहा. यामुळे विचारांची गोंधळलेली साखळी तुटते आणि तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाते.

3. तज्ज्ञांचा सल्ला घ्या:

जर अति-विचार गंभीर स्वरूपाचा असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काउन्सलिंग किंवा थेरपीच्या माध्यमातून तो नियंत्रित करता येतो.

4. वेळेचे व्यवस्थापन करा:

दिवसभराच्या कामांसाठी वेळ ठरवा.वेळेच्या व्यवस्थापनामुळे मोकळ्या वेळेत अति-विचार टाळता येतो.

5. तंत्रज्ञानापासून विश्रांती घ्या:

मोबाईल, सोशल मीडिया यामुळे अति-विचार वाढतात. त्यापासून वेळ काढा आणि शांततेचा अनुभव घ्या.

शेवटी अति-विचाराचे उदाहरण देतो.तुम्ही लोणावळ्याला वीकएंडसाठी जाण्याचे ठरविले.हॉटेल बूक केलं.पण मग तुमच्या मनांत सुरू होतं,रस्त्याने गर्दी तर नाही लागणार?कुठे जाम असेल  कां? असेल तर पोहोचायला वेळ होईल आणि आपलं वेळेचं गणित कोलमडेल.मग जो वेळ मिळेल,त्यात लोणावळ्यातील महत्वाच्या गोष्टी पहाता येतील कां? आणि या अति-विचाराने डोकं भणभणू लागेल,मनावर ताण येईल,ड्रायव्हिंगवर परिणाम होईल. परिणामी,तुम्ही वीकएंड मजेत घालवायचं ठरवलं असेल,तेच नेमकं होणार नाही.                        

समारोप:

अति-विचार ही एक मानसिक सवय आहे,जी वेळेवर ओळखून थांबवणे गरजेचे आहे. ध्यान, सकारात्मक दृष्टिकोन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अति-विचारावर विजय मिळवता येतो.आयुष्य एकदाच मिळते; ते विचारांच्या गोंधळात वाया न घालवता सुसंवादी आणि आनंदी बनवा.म्हणून विचार करा पण अति-विचार करू नका.हे लक्षात ठेवा.     

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

 

प्रसाद नातु.


Comments

  1. अति विचार केल्यास किती नुकसान होते ते छान समजावले. त्यावर उपाय पण ऊत्तम सुचवले. धन्यवाद
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...