Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, मारिया ब्रान्यास मोरेराचे निधन

Blog No 2024/195.

दिनांक:25 ऑगस्ट, 2024

मित्रांनो,

            ज्या व्यक्तीने आपल्या हयातीत इतिहासात घडलेल्या अनेक घटना जसे की पहिले आणि दुसरे महायुद्ध, 100 वर्षापूर्वी आलेली फ्लूची साथ आणि 2020 साली आलेली कोविड 19 ची साथ,त्या 117 वर्षीय महिलेचा मंगळवारी म्हणजेच 20 ऑगस्ट ला मृत्यू झाला,तिचे जिवन हा इतके वर्ष कसे जगावे याचा आदर्श आहे आणि पुढील काही वर्षे तरी ती दीर्घायुषी जगण्यासाठी आदर्श असेल,आजचा ब्लॉग तिला समर्पित.

सविस्तर:

            स्पेनच्या मारिया ब्रान्यास मोरेरा यांनी निरोगी जीवनाचा वारसा मागे सोडला आहे आणि ती पुढील काही वर्षांत दीर्घायुष्य जगण्यासाठी एक आदर्श असेल.तिचे पूर्णपणे नियंत्रित मन हृदयविकार नसणे हा चमत्कार आणि निरोगी जीवनशैलीचा परिणाम आहे.सुपरसेन्टेनेरियन हिचा झोपेत मृत्यू झाला.मंगळवारी तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे याची माहिती दिली. “मारिया ब्रान्यास आम्हाला सोडून गेली. तिच्या इच्छेनुसार ती झोपेत मरण पावली,तिला झोपेत,शांततेने आणि वेदनाशिवाय मृत्यू आला.तिच्या कुटुंबाने मंगळवारी X वर तिच्या खात्यावर लिहिले. "तिने दिलेल्या सल्ल्याबद्दल आणि तिच्या दयाळूपणाबद्दल आम्ही तिला नेहमी लक्षात ठेवू." महत्वाचे हे की,गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, 2023 मध्ये फ्रान्सच्या लुसिल रँडनच्या मृत्यूनंतर तिची सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून नोंद झाली होती.

तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य:

मारियाने कुटुंबातील सदस्य, मित्र, निसर्गाशी घनिष्ठ संबंध, भावनिक स्थिरता हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे लिहिले दिले.ती म्हणते,"सुव्यवस्था, शांतता, कुटुंब आणि मित्रांशी चांगले संबंध,निसर्गाशी संपर्क, भावनिक स्थिरता, कोणतीही चिंता, पश्चात्ताप नाही, भरपूर सकारात्मकता आणि विषारी लोकांपासून दूर राहणे," या गोष्टींमुळे ती शेवटपर्यन्त म्हणजे 117 व्या वर्षी मनाने आणि शरीराने निरोगी राहिली. मला वाटते की दीर्घायुष्य हे भाग्यवान असणे देखील आहे.त्या सोबत ती नशीब आणि चांगले अनुवांशिक गुण याला महत्व देते.” असे तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सांगितले होते.

तिला कधीही हॉस्पिटलमध्ये जावे लागले नाही, तिची कधीही हाडे मोडली नाहीत, ती पूर्णपणे ठीक आहे, तिला वेदना होत नाहीत,” असे तिची धाकटी मुलगी, रोजा मोरेटने 2023 मध्ये प्रादेशिक कॅटलान टेलिव्हिजनला सांगितले होते. भावनिक स्थिरता ही वाढवून आणि तणाव कमी करून दीर्घायुष्याला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जे लोक त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकतात,ज्यामुळे दीर्घकाळचा ताण कमी होतो, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब आणि कमकुवत रोगप्रतिकारक कार्य यासारख्या असंख्य आरोग्य समस्यांना प्रतिबंध होऊ शकतो.

तिचा जन्म 1907 मध्ये झाला. मारियाचा जन्म 4 मार्च 1907 रोजी सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे झाला. वयाच्या 8 व्या वर्षी तिला एका कानाची श्रवणशक्ती कमी झाली.मारियाने वयाच्या 24 व्या वर्षी डॉ जोन मोरेटशी लग्न केले.ही तीन मुलांची आई 1936 ते 1939 या काळात झालेल्या स्पॅनिश गृहयुद्धात तिच्या पतीची सहाय्यक म्हणून काम करत होती. तिच्या पतीचे 1976 मध्ये निधन झाले आणि तिचा मोठा मुलगा 86 वर्षांचा असताना मरण पावला.ती स्पॅनिश फ्लू महामारी आणि कोविड महामारीपासून वाचली. तिने वयाच्या ११३ व्या वर्षी कोविड पॉझिटिव्ह चाचणी केली होती आणि काही दिवसातच ती बरी झाली होती.

समारोप:

            इतके वर्ष आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये निश्चितपणे काही वेगळेपणा असतो.नशिबाची साथ तर असतेच पण त्यापेक्षा अधिक म्हणजे हे लोक अतिशय पद्धतीने जिवन जगात असतात. Disciplined म्हणता येईल असे जिवन.      

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.     

प्रसाद नातु, पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...