Skip to main content

मायथाॅस बँकिंगसाठी धोकादायक?

ब्लाॅग नं.2026/127. दिनांकः 7 मे, 2026 . मित्रांनो, मायथॉस (Mythos) म्हणजे काय? ते नेमके काय आहे? आणि बँकिंगसह प्रत्येक उद्योगासाठी ते धोका का मानले जात आहे? ही अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या ब्लाॅगमधे जाणून घेणार आहोत. सविस्तरः आज जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वेगाने विकसित होत आहे. अशाच पार्श्वभूमीवर Anthropic या AI कंपनीने विकसित केलेले Mythos हे अत्यंत प्रगत AI मॉडेल चर्चेत आले आहे. अनेक तज्ज्ञ, बँकिंग नियामक, सरकारे आणि सायबर सुरक्षा संस्था याकडे गंभीर नजरेने पाहत आहेत. कारण हे फक्त एक चॅटबॉट नाही—तर कोड समजणे, सॉफ्टवेअरमधील कमकुवत दुवे शोधणे, आणि स्वयंचलित पद्धतीने सायबर हल्ल्यांची शक्यता निर्माण करणे अशा क्षमतांनी सज्ज आहे. मायथाॅस म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊ. 1. Mythos म्हणजे नेमके काय? Mythos हे एक उच्च क्षमतेचे AI मॉडेल आहे. हे सामान्य AI प्रमाणे फक्त प्रश्नांची उत्तरे देत नाही, तर: 1.संगणक कोड वाचू शकते, 2.सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधू शकते, 3.सुरक्षा कमतरता ओळखू शकते, 4.गुंतागुंतीच्या नेटवर्कचे विश्लेषण करू शकते, 5.अनेक स्टेप्स असलेले काम स्वयंचलितपणे करू ...

हैवानासाठी आणि शैतानासाठी वेगळे कायदे असावेत.

Blog No 2024/193.   

दिनांक:23 ऑगस्ट, 2024

मित्रांनो,

            बंगालमध्ये हॉस्पिटलमध्ये जे प्रकरण घडले किंवा आता काल परवा महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये जे घडले. ती कृत्ये माणुसकीला काळिमा फासणारी आहेत. आपण माणूस म्हणण्याच्या किंवा जगण्याच्या लायकीचे आहोत कां? की ज्यामुळे माणसावर चालवण्यात येणारे खटले या क्रूरकर्मा लोकांवर चालविण्यात यावेत कां?  असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. यांना खरोखर मानव म्हणून यांच्यावर खटले चालवावेत की यांना वेगळी  काही तरी संज्ञा देऊन त्यांच्यावर खटले चालवावेत.100 दोषी सुटले तरी चालतील पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये असे कायदा म्हणतो,पण हे माणसाला लागू असावे. हैवानाला किंवा शैतानाला नाही. हैवानासाठी आणि शैतानासाठी वेगळे कायदे असावेत.

सविस्तर:

            बदलापूरमध्ये साडे तीन आणि सहा वर्षाच्या बालिकांसोबत अश्लील कृत्य करणारा माणूस म्हणता येईल कां ? त्याला पशू म्हणणं देखिल प्राण्यांचा अपमान आहे.आणि या गोष्टीचे राजकारण करणारे हे विसरत आहेत की त्या मुलींना आधी न्याय मिळवून द्यायचा आहे,त्या कुकर्मी माणसाला लवकरात शिक्षा कशी होईल हे आधी बघायचे आहे. या गोष्टींवर सर्व राजकीय पक्षांचे एकमत होणे गरजेचे आहे, कारण राजकारणामुळे जे घडले आहे,त्याचे गांभीर्य कमी केलं जातंय.संविधान बचाओ म्हणून टाहो फोडणारे त्या कुकर्मी माणसाला आताच्या आता फाशी द्या,असं कसं म्हणू शकतात. आधी पोलिस केस, मग चौकशी,मग सुनावण्या, मग तारीख पे तारीख हे कायदे मंडळात बसून तुम्ही लोकांनी ठरविलेत ना? म्हणून म्हणतो आता हैवानासाठी आणि शैतानासाठी वेगळे कायदे असावेत.यात आरोपीला कोर्टातर्फे वकील वगैरे देण्याची माणुसकी दाखवता कामा नये. कारण माणुसकी माणसाला दाखवायची असते. हैवानासाठी आणि शैतानासाठी माणुसकी नाही.

            नोट दाखवून किंवा आधीच्या भाषेत हरी पत्ती दाखवून पोलिस,थोडक्यात कायदा विकत घेता येतो हे जनतेला कुणी शिकवलं? गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाळायला कुणी सुरुवात केली ?  दुष्ट प्रवृत्ती या देशांत कुणामुळे फोफावल्या? याचा विचार व्हायला हवा.सुसंस्कृत समाज या बाबतीत उदासीन आहे,काहीही घडलं तरी “मला काय करायचं आहे? मी कशाला या भानगडीत पडू?” या वृत्तीने नुकसान झाले आहे. सुरेख रोड झाले,बिल्डिंगस उभ्या राहिल्या, जीडीपी म्हणजेच प्रगती झाली कां? आज आपले शिक्षण माणूस घडवायला कमी पडलंय. तुम्ही डॉक्टर,इंजीनियर,वकील,शास्त्रज्ञ कित्येक घडवलेत, पण माणसाला माणूस म्हणून घडवायला शिक्षण आणि शैक्षणिक धोरण कमी पडलंय. शैतानाला किंवा हैवानाला धर्म नसतो. 

            आपल्या देशात स्त्रियांच्या हाती शस्त्र द्या असे म्हणता येत नाही? कारण इथे त्याचा वापर त्यांच्या घरचे  पुरुष मंडळी अधिक करतील. कारण सरपंच,नगराध्यक्ष किंवा महापौर म्हणून महिला स्थानापन्न झाल्या पण बहुतेक ठिकाणी कारभार चालविला तो त्याच्या घरातील पुरुषांनीच. मग ते नवरे असतील, वडील असतील किंवा बंधु. त्यामुळे उपाय अपाय व्हायची शक्यता अधिक.पण मुलींना सुरुवातीपासून शाळांमध्ये स्वसंरक्षण हा विषय अनिवार्य करायला हवा.कराटे प्रशिक्षण अनिवार्य व्हावे.तसेच लहान मुलांच्या शाळेत शक्यतो जिथे त्याच्या पालन पोषणाचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे,तिथे फक्त स्त्रियांचीच नेमणूक व्हावी. त्या खऱ्या अर्थाने सबला होत नाहीत तोपर्यंत हे सर्व सुरू ठेवावे.           

समारोप:-

इतर प्रदेशाबद्दल मी काही बोलणार नाही,पण महाराष्ट्र जिथे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होऊन गेला,ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस सन्मानपूर्वक परत पोहोचविण्याची आज्ञा आपल्या सैन्यास दिली होती.असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले,त्या महाराष्ट्रात देखिल स्त्रियांवर अत्याचार व्हावेत हे लांछनास्पद आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्त्री अत्याचार मुक्त राज्य कसे करता येईल असा केवळ विचार नव्हे प्रण करायला हवा.तरच त्यांना स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेता येईल.     

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.     

 

प्रसाद नातु, पुणे


 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...