Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

T-20 वर्ल्ड कपवर भारताचा कब्जा

Blog No. 2024/ 138.  

Date: 2nd,July 2024

मित्रांनो,

            अखेर T-20 च्या वर्ल्ड कप मधील 17 वर्षाचा अजिंक्यपदाचा दुष्काळ परवा 29 जूनला संपला. आणि एका अटीतटीच्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवत,विश्वचषकावर आपलं नांव कोरलं.विराट कोहलीने आधीच्या सर्व सामन्यात मिळून 75 धावा केल्या होत्या.आणि या एकाच सामन्यात 75 धावा नोंदविल्या.रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिघेही स्वस्तात निपटल्यानंतर,विराट कोहलीने अक्षर पटेलच्या साथीने भारताला एका चांगल्या धांवसंख्ये पर्यन्त, म्हणजे 176 धावांपर्यंत पोहोचविले.

            पण ज्यावेळेस क्लासन आणि डेविड मिलर खेळत असतांना,एका वेळेस अक्षरक्ष: भारत कुठे तरी मोठी धावसंख्या उभी करायला कमी पडला की काय?असं वाटू लागलं होतं.अक्षर पटेलच्या,डावाच्या 15 व्या ओवरमध्ये 24 रन फटकावल्यानंतर,शेवटच्या पांच ओवर्समध्ये, म्हणजे 30 बॉलमधे 30 धावा इतके सोपे समीकरण असतांना,हार्दिक पंड्या,जसप्रीत बूमराह आणि अर्शदिप सिंगने कमालीची किफायती बॉलिंग टाकत 5 ओवर्समध्ये केवळ 23 धावा दिल्याने,भारताने विश्वचषक 7 धावांनी जिंकत 17 वर्षाचा अजिंक्यपदाचा दुष्काळ संपवला.

विराट आणि रोहितची निवृत्ती:  

            त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीमध्ये,भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने हा माझा शेवटचा  T-20 चा वर्ल्ड कप आणि T-20 चा शेवटचा सामना मी खेळल्याचे सांगत T-20 मधून सेवानिवृत्ती घेतल्याची घोषणा केली.यानंतर, कर्णधार रोहित शर्माने देखील T20 विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर T20 फॉरमॅटला निरोप दिला. 2007 च्या विश्वचषकात भारताच्या विजयाने रोहितच्या उल्लेखनीय T20 कारकिर्दीची सुरुवात झाली. 2024 मध्ये,त्याच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक उंचावल्यानंतर,एक वर्तुळ पूर्ण झाल्याची त्याची भावना दिसली.T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर,रोहितने दोन वर्षांहून अधिक काळ सांभाळलेल्या कर्णधारपदाचा अंतिम निरोपही घेतला.रोहितने घोषणा केली की तो क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारातून निवृत्त होत आहे,पण तरीही तो भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. संघ सहकारी विराट कोहलीने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर,काही वेळातच रोहितने त्याची घोषणा केली.

समारोप:

            भारताने विश्वचषक जिंकला असला तरी,धडाकेबाज फलंदाज हिट मॅन रोहित शर्माची जबरदस्त बॅटिंग आणि महान खेळाडू विराट कोहलीची शैलीदार फलंदाजी ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघायला मिळणार नाही. हे सतत जाणवतं राहिल. एखाद्या सामन्यात किंवा एखाद्या मालिकेत अपयश आले तरं आपण खेळाडूंना नांव ठेवत असतो.पण तो खेळाडू यापुढे खेळतांना दिसणार नाही,ही कल्पना नकोशी वाटते.पण काय करणार? शेवटी “इसी का नाम जिंदगी है !” असचं म्हणावं लागेल.     

            तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. सुंदर विश्लेषण प्रसाद जी... रोहीत आणि विराट यापुढे T20 त दिसणार नाहीत ह्याचे निश्चितच वाईट वाटतेय..पण हीच ती योग्य वेळ होती...आपण हवेहवेसे असतानाच निघून जाणे केव्हाही चांगलेच ना..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...