Blog No. 2024/ 133.
Date: 26th,June 2024
मित्रांनो,
आज 1 जुलै, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल
करण्याचा महिना.31 जुलै ही शेवटची तारीख आहे.रिटर्न स्वतः फाइल करीत नसाल तर ते कसे स्वतः फाईल करावे, हे आजच्या ब्लॉग मधे मी लिहिणार आहे. मी जेव्हा पासून
इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन झाले तेव्हापासून स्वतः फाइल करतो आहे. अगदी अलीकडे शेअर
बाजारात देखिल मी काही व्यवहार केलेत. तरी देखिल मी स्वतःच फाइल करतोय.मला कसलाही त्रास
झाला नाही. तेव्हा आज बघू या, इन्कम टॅक्स रिटर्न स्वतः कसे भरावे.
सविस्तर:
दर वर्षी,
आपल्याला आपल्या उत्पन्नावर म्हणजे
ज्या कुठल्या माध्यमातून मिळत असेल आणि उत्पन्न करपात्र असेल तर,आयकर भरावा लागतो.जर
तुमचे उत्पन्न हे बेसिक उत्पन्न मर्यादेच्या वर असेल तर आयकर रिटर्न भरणे हे एक अनिवार्य
आहे,असे करून तुम्ही सरकारच्या नियमांचे पालन करत आहात.हा ब्लॉग तुम्हाला भारतात
वैयक्तिक आयकर रिटर्न भरण्याचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करेल.
1
आवश्यक
कागदपत्रे तयार ठेवा.
आयकर रिटर्न भरण्यापूर्वी खालील
कागदपत्रे तयार ठेवा:
*PAN कार्ड: तुमचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) आवश्यक आहे.
* फॉर्म 16: तुमच्या नियोक्त्याने दिलेला,
ज्यामध्ये तुमच्या पगाराची माहिती
आणि TDS तपशील
असतो.
* बँक स्टेटमेंट्स: तुमच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट्स, ज्यामध्ये व्याज आणि इतर
उत्पन्नाची माहिती असते.
* आयकर तपशील: तुमच्या आयकर तपशीलांची माहिती.
* इतर उत्पन्नाचे कागदपत्रे: भाड्याचे उत्पन्न, व्याज,
शेअर बाजारातील कॅपिटल गेन्सचे ब्रोकरकडून
प्रमाणपत्र इत्यादी.
2. आयकर पोर्टलवर नोंदणी करा. (ज्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड आहे,त्यांनी एकदम पॉइंट नं. 3 बघा.)
आयकर रिटर्न भरण्यासाठी,
तुम्हाला आयकर विभागाच्या पोर्टलवर
नोंदणी करावी लागेल.
1. ई-फायलिंग पोर्टल https://www.incometax.gov.in/iec/foportal/
वरील लिंकवर कंट्रोल आणि क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट इन्कमटॅक्सच्या
साइट
2. "Register Yourself" वर क्लिक करा.
3. तुमचा PAN,
नाव,
जन्मतारीख आणि इतर तपशील भरा.
4. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि
युजर आयडी शक्यतो तुमचा पॅन नंबर ठेवा,म्हणजे लक्षात ठेवणे सोयीचे जाईल आणि
पासवर्ड हा कॅपिटल लेटर, small
लेटर, नंबर आणि @$*& यापैकी कुठल्याही
कॅरक्टरने युक्त असावा.
3. लॉगिन करा आणि योग्य ITR फॉर्म निवडा
1. तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डने
लॉगिन करा.
2. "e-File" मेनू
मध्ये "Income Tax Return" वर क्लिक करा.
3. तुमच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार
योग्य ITR फॉर्म
निवडा.
ITR form कुठला निवडाल?
खाली दिलेल्या 4 फॉर्म्स पैकी एक नेमका तुमच्यासाठी असेल.जर शंका असेल तर
माझ्या मेल आयडी वर संपर्क करा.
Form ITR 1:-
Resident Individuals having Income below or equal to Rs.50 Lakhs from
Salary/pension
One House
Property
Others
sources
Form ITR 2:-
Every Income from ITR of more than Rs.50 Lakhs
Capital
Gains
More
than one house property
Foreign
Income/Foreign Asset
Crypto
Income (if reported as Capital gains)
Holding
directorship in a Company
Holding
unlisted equity shares
Form ITR 3:-
Every Income from ITR of more than Rs.50 Lakhs
Capital
Gains
More
than one house property
Foreign
Income/Foreign Asset
Crypto
Income (if reported as Capital Gains)
Holding
directorship in a Company
Holding
unlisted equity shares
Business/Profession
Crypto
Income (if reported as Business Income)
As a
partner in a firm
Form ITR 4:-
Resident
Individuals and HUF’s having
Total
Income is less than or equal to Rs.50.00 Lakhs
Salary/pension
One
House Property
Others
sources.
4. फॉर्म भरताना सुरुवातीला बेसिक माहिती भरणे आवश्यक
आहे. जसे:
1. वैयक्तिक तपशील: नाव, पत्ता,
जन्मतारीख,
ईमेल,
मोबाईल क्रमांक इ.
2. आय उत्पन्नाचे तपशील: पगार, घरभाड्याचे उत्पन्न, व्याज,
शेअर बाजारातील नफा इ.
3. वजावट तपशील: 80C, 80D, 80G इ. कलमांखालील
वजावट.
4. टॅक्स पेमेंट्स: TDS, advance tax इत्यादी
तपशील भरा.
५. फॉर्म तपासा आणि सबमिट करा
1. सर्व तपशील भरल्यानंतर फॉर्म
काळजीपूर्वक तपासा.
2. "Preview and Submit" पर्यायावर क्लिक करा.
3. फॉर्ममध्ये काही चुका नसल्यास, तो सबमिट करा.
6.
व्हेरिफिकेशन करा:आयकर रिटर्न
सबमिट केल्यानंतर, त्याची व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. यासाठी खालील पद्धती
वापरू शकता:
1. आधार OTP:
तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईलवर
OTP पाठवला
जाईल.
2. ई-व्हेरिफिकेशन कोड (EVC): बँक खाते,
डिमॅट खाते किंवा नेट बँकिंगद्वारे
EVC मिळवा.
3. दस्तावेज प्रिंट करा आणि पाठवा: ITR-V फॉर्म प्रिंट करा, स्वाक्षरी करा आणि केंद्रीय
प्रक्रिया केंद्राला (CPC) पोस्टाने पाठवा.
7. आयकर रिटर्नची स्थिती तपासा:
आयकर रिटर्न सबमिट आणि व्हेरिफाय केल्यानंतर, त्याची स्थिती तपासण्यासाठी:
1. आयकर पोर्टलवर लॉगिन करा.
2. "My Account" मध्ये
"View Returns/Forms" वर क्लिक करा.
3. तुमच्या रिटर्नची स्थिती येथे
दिसेल.
समारोप
स्वतः रिटर्न दाखल करण्याचा फायदा हा की, आपल्या उत्पन्नाप्रमाणे आपण सर्व माहिती भरलेली आहे. याची आपल्याला माहिती असते.तुम्ही सी.ए. कडून भरत असाल तर खुद्द सी.ए. तुमचे रिटर्न भरेल असे म्हणता येणार नाही. कारण,इतर महत्वाच्या कामांमध्ये ते व्यग्र असतात,त्यांच्याकडे त्याचे सहकारी आणि प्रशिक्षणार्थी बरेच असतात.त्यापेक्षा आपणच स्वतः भरलेले चांगले. पुढच्या भागात 80 सी आणि अन्य कलमानुसार ज्या वजावटी (Deductions) मिळतात,त्या आपण जाणून घेणार आहोत.तुम्हाला काही शंका असल्यास माझा मेल आयडी pknatoo25360@gmail.com वर संपर्क साधा किंवा 88888 18589 वर संपर्क साधा.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर
लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु, पुणे.
Important information
ReplyDeleteVery informative & apt one
ReplyDeleteGood information
ReplyDelete