Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

ट्रेंड सेटर जंजीर

 Blog No.2023/293

Date: -23rd, November 2023.

 

मित्रांनो,

            बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 1973 या वर्षी अनेक हिन्दी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील काही “ट्रेंड सेटर” होते.या चित्रपटामधील एक नांव घेण्यासारखा चित्रपट म्हणजे “जंजीर”. अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीलाच नव्हे तर हिन्दी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा देणारा हा चित्रपट ठरला. अमिताभ बच्चनला यात  "अंग्री यंग मॅन" च्या भूमिकेत सादर करण्यात आले होते आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांची हीच भूमिका डोळ्यासमोर ठेऊन अनेक चित्रपट लिहिले गेले.एवढेच नव्हे तर ते बॉक्स ऑफिसवर जबरदस्त चालले.आज बघू जंजीर या चित्रपटाविषयी. 

प्रास्ताविक

            अमिताभ बच्चन,जया भादूरी, अजित आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट.यात त्यांना साथ लाभली ती असरानी,बिंदु,इफ्तेखार,गुलशन बावरा यांची. प्रकाश मेहरा निर्मित,दिग्दर्शित या चित्रपटाची कथा,संवाद सलीम-जावेद यांचे होते.गीतं गुलशन बावरा आणि प्रकाश मेहरा यांची आणि संगीत दिले होते, कल्याणजी-आनंदजी यांनी. या चित्रपटातील प्राणच्या तोंडी असलेले आणि मन्ना डे यांनी गायलेले “यारी है  इमान मेरा यार मेरी जिंदगी” हे गाणं जबरदस्त हिट झाले.त्यासोबतच “दिवाने है दिवानोको ना घर चाहिये” हे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे देखिल हिट झाले होते.मुख्य म्हणजे यात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एकही गाणं नव्हतं.” 

चित्रपटाची कथा                                 

दिवाळीच्या दिवशी तेजा (अजित) नांवाचा गुंड,विजय खन्ना (अमिताभ बच्चन) नावाच्या लहान मुलाच्या डोळ्यादेखत त्याच्या आई वडिलांची हत्या करतो.हा गुंड तेजा त्याच्या हातात एक साखळी (जंजीर) लावलेले घडयाळ घालून आणि पांढऱ्या घोड्यावर बसून आलेला असतो.या अत्यंत क्लेशकारक घटनेमुळे, विजयला पांढऱ्या घोड्याची वारंवार भयानक स्वप्ने पडतात.लहानपणी विजय इतर मुलांपासून दूरदूरच असतो आणि स्वत:ला एकटा मानतो. 20 वर्षांनंतर,विजय एका गावात इन्स्पेक्टर बनून जातो.तिथे त्याच्याकडे शेरखान  (प्राण) नावाच्या स्थानिक व्यक्तीबद्दल तक्रारी येतात,ज्याचा जुगाराचा अड्डा असतो.जेव्हा तो खानला चौकशीसाठी बोलावतो,तेव्हा शेरखानचा आत्मसन्मान जागृत होतो.तो जात नाही.तो विजयला खडसावतो.त्याची आणि विजयची लढाई होते. लढाई नंतर शेरखान इंस्पेक्टर विजयशी दोस्ती करतो,त्याचे जुगाराचे अड्डे बंद करतो आणि विजयला सहकार्यांचे आश्वासन देतो.शेरखान ऑटो मेकॅनिक बनतो आणि त्याचा मार्ग सुधारतो. क्राइम सिंडिकेटचे विविध व्यवहार संपूर्ण शहरात अव्याहतपणे सुरू असतात.ते सर्व तेजा नावाच्या गुंडाची टोळी करत असते.

या टोळीच्या सदस्यांनी केलेल्या ट्रॅफिक अपघातात अनेक मुलांचा मृत्यू होतो,या गुन्ह्याची माला (जया भादूरी) नावाची स्ट्रीट परफॉर्मर साक्षीदार असते.तिला शांत राहण्यासाठी तेजाच्या माणसांकडून लाच दिली जाते.विजयला हे कळते,तेव्हा विजय मालाला मुलांचे छिन्न विछिन्न  मृतदेह दाखविण्यासाठी तिला शवगृहात घेऊन जातो.मालाचे मन पाझरते. ती तिला मिळालेली लाच एका अनाथाश्रमाला दान देऊन टाकते. ती ट्रॅफिक अपघात घडविणाऱ्या त्या माणसाला ओळखते. मालाने आपला शब्द मोडल्याचे समजल्यानंतर, तेजाचे लोक रात्रभर तिचा पाठलाग करतात. ती धावत पळत रेल्वे रुळ ओलांडून पळून जाते आणि आश्रयासाठी हताश होऊन विजयच्या घरी पोहोचते.तो तिला राहण्याची परवानगी देतो आणि दोघांना कळते की ते दोघेही अनाथ आहेत.विजय तिला त्याच्या भावाकडे आणि वहिनीकडे घेऊन जातो. या घटनेमुळे तेजा चेकाळतो आणि खोटे कुभांड रचून तेजा विजयला खोट्या लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करायला भाग पडतो.विजयला खोट्या आरोपाखाली 6 महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागतो.विजय तुरुंगातून सुटल्यावर बदला घेण्याची योजना आखतो.शेवटी विजय आपल्या आई-वडिलांच्या मारेकऱ्याला शोधून काढतो आणि त्यांच्या खुनाचा बदला घेतो.अशी ही एकंदर कथा आहे.

या चित्रपटाच्या वेळेसच अमिताभ बच्चन आणि जया भादूरी यांच्यात विवाह निश्चिती झाली असे म्हटले जाते.आज जरी पाह्यला मिळाला तरी पहायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे.अमिताभ बच्चनच्या विजय खन्ना या भूमिकेनंतर त्यांच्या यानंतर आलेल्या अनेक चित्रपटात त्यांनी अभिनित केलेल्या पात्राचे नांव विजयच असायचे हे विशेष.या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन आणि प्राण यांनी अनेक सफल चित्रपटातून सोबत काम केलं.

 

सारांश

अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट आधी एवढा चालला नाही, पण नंतर या चित्रपटाने चित्रपटगृहात 25 आठवडे पूर्ण केले.या चित्रपटानंतर अनेक तरुण लोक अभिताभचे फॅन झाले. त्यात मीही एक होतो.त्यानंतर ओळीने आलेले सगळे चित्रपट मी अगदी दर शनिवारी एक असे पाहिले. वाचकांमध्ये असे बरेच असतील याची मला खात्री आहे. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट बॉक्समध्ये जरूर लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.    

Comments

  1. यारी हैं ईमान मेरा यार मेरी जिंदगी👍👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...