Skip to main content

यश चोप्रा एक महान निर्माता दिग्दर्शक

 

Blog No.2023/250            
Date:- 27th, September 2023.

मित्रांनो,

            आजचा हा या वर्षीचा 250 वा ब्लॉग. प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांची आज जयंती. 6 राष्ट्रीय पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार, प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण हा तृतीय सर्वोच्य नागरी सन्मान अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवान्वित करण्यात आले होते.त्यांच्यावर ब्लॉग लिहायचा तर खूप मेहनत घ्यावी लागणार हे नक्की. तर आजचा ब्लॉग आहे,त्यांना त्यांच्या 91 व्या जयंती दिनी श्रद्धांजली वहाण्यासाठी. 

प्रास्ताविक

            यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर, 1932 चा, आताच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील लाहोर येथील. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारच्या PWD डिविजन मध्ये अकाऊंटंट होते. प्रसिद्ध निर्माता, टीव्ही सिरियल   महाभारतकार बी. आर. चोप्रा त्यांचे बंधु. फाळणी नंतर चोप्रा कुटुंबीय लुधियाना येथे स्थलांतरित झाले. यश चोप्रा यांनी आय.एस. जोहर आणि त्यानंतर बी. आर. चोप्रा यांच्या हाताखाली असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम सुरू केले. 

कारकीर्द

            “धूल का फूल” ही त्यांची पहिली दिग्दर्शन केलेली फिल्म. ज्यात माला सिन्हा, राजेंद्रकूमार आणि लिना चिटणीस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1961 मध्ये त्यांचा एक चित्रपट “धर्मपुत्र” आला. ज्यात शशी कपूर प्रथमच नायक म्हणून समोर आला.या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला.त्यानंतर 1969 मध्ये  पहिला मल्टिस्टारर चित्रपट “वक्त”, ज्यात सुनील दत्त, राजकुमार, शशी कपूर, साधना, बलराज साहनी, शर्मिला टागोर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर “ईत्तेफाक” हा राजेश खन्ना आणि नंदा अभिनीत रहस्यपट आला.

            1970 मध्ये त्यांनी स्वतःची यशराज फिल्म्स ही कंपनी स्थापन केली. त्या अंतर्गत त्यांनी “दाग” हा राजेश खन्ना, राखी आणि शर्मिला टागोर यांच्या प्रमुख असलेला चित्रपट आणला. वक्त, ईत्तेफाक नंतर दाग हा तिसरा चित्रपट ज्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर अमिताभ बच्चन सोबत “दीवार” आणि “त्रिशूल” हे सुपर डुपर चित्रपट त्यांनी दिले. त्यानंतरचे त्यांचे अमिताभ सोबतचे “कभी कभी”, “सिलसिला” आणि “काला पत्थर” हे सुपर हीट चित्रपट आले.

            त्यानंतर मात्र त्यांच्या कारकिर्दीला थोडी उतरती कळा लागली.चित्रपट चांगले होते,पण बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकले नाहीत. ते म्हणजे “मशाल”, “फासले”, “विजय”. पण 1989 मध्ये आलेल्या “चाँदनी” ने त्यांना हात दिला. 1993 ला त्यांनी शाहरुख खानची सोबत घेऊन “डर”, “दिल तो पागल है”,”दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे”, “चक दे इंडिया” यासारखे चित्रपट दिले.

            चोप्रा यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये तेच तेच  कलाकार पुन्हा पुन्हा घेतले.जसे की अमिताभ बच्चन, संजीव कुमार, मदन पुरी, अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, निरुपा रॉय, अरुणा इराणी, बिंदू, मनमोहन कृष्णा, पूनम ढिल्लन, परीक्षित साहनी, शशी कपूर, ऋषी कपूर, नीतू सिंग, राखी, राजेश खन्ना, सुनील दत्त, अनिल कपूर, वहिदा रहमान, हेमा मालिनी, अनुपम खेर, इफ्तेखार, अचला सचदेव, विकास आनंद आणि अलीकडे, शाहरुख खान.    

वैयक्तिक जिवन

            1970 मध्ये यश चोप्रा यांनी पामेला सिंग यांच्याशी लग्न केले आणि त्यांना आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा अशी दोन मुले आहेत. आदित्य चोप्रा चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे आणि यशराज फिल्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळत आहे, तर उदय हा सहाय्यक दिग्दर्शक बनलेला अभिनेता आहे,ज्याने 2000 मध्ये आपल्या भावाच्या दिग्दर्शनात, मोहब्बतेंमधून अभिनयात पदार्पण केले.   

मृत्यू

13 ऑक्टोबर 2012 रोजी चोप्रा यांना डेंग्यू तापाचे निदान झाले आणि त्यांना वांद्रे, मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.21 ऑक्टोबर रोजी, यश चोप्रा यांचे निधन झाले. मृत्यू समयी  त्यांचे वय 80 वर्षे होते.

            अशा या महान निर्माता दिग्दर्शकाला त्याच्या 91 व्या जयंती दिनानिमित्त माझ्यातर्फे आणि माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांतर्फे “भावपूर्ण श्रद्धांजली.

 

प्रसाद नातु, पुणे.    


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...