Blog No.2023/246
Dated 21-09-2023.
मित्रांनो,
साधारणतः 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आमच्या कडे फक्त दिड दिवसांचा गणपती असतो. पहिल्या दिवशी आरती आटोपल्यावर जेवण आटोपून आम्ही गप्पा मारत बसलो. आणि रात्री मला जाग आली. एक गणपतीचे स्तुतिपर गीत मला सुचले.
मी धडपडत उठलो. एक वही आणि पेन घेतला. स्फुरलेले गीत लिहून काढले. दोन कडवी सुचली होती. ती लिहून काढली. त्या नंतर मी त्यात कडवी जोडायचा प्रयत्न केला, पण सुचल्या नाहीत. ती गणेश स्तुति मी आज येथे पोस्ट करत आहे. त्याला त्याचं वेळा मला त्याची चाल सुचली.
गणपती स्तुती
तुझ्या सारखा तू गणराया
तुझी प्रार्थना येई फळा.
देतो विद्या सकळासी तू
देई सुख शांती सकळा !!
विद्यापती तू मंगलमुर्ती
नाम तुझे रे सदैव ओठी.
विद्याची मग साथ लाभता
येईल संगती ती चपळा !1!
नामाचे तव महात्म्य इतुके
जळून जातील सर्व पातके.
सुखःकर्ता तू दिन दुबळ्यांसी
दुष्ट कापती चळाचळा !2!
रचनाकार@ प्रसाद नातु
Comments
Post a Comment