Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

लिना चंदावरकर-सुस्वरुप अभिनेत्री

 Blog No.2023/227

Date:- 30th, August,2023. 

मित्रांनो,

            1969 ला सुनील दत्तने त्याचा भाऊ सोम दत्त याला चित्रपटात आणण्यासाठी ज्याला introduce म्हणतात. तसं introduce करण्यासाठी “मन का मीत” बनविला.मुख्य म्हणजे या चित्रपटात एकूण तीन नवे चेहरे होते. एकक सोमदत्त, दूसरा लिना चंदावरकर आणि तिसरा म्हणजे विनोद खन्ना.पण नशीब बघा कसं असतं. ज्याच्यासाठी चित्रपट काढला,त्याला ब्रेक न मिळता लिना चंदावरकर आणि विनोद खन्ना यांना ब्रेक मिळाला. लिना चंदावरकर तरी 25 वर्षी लग्न करून चित्रपटसृष्टीतून निघून गेली होती.पण विनोद खन्नाने आधी खलनायक आणि त्यानंतर नायकाच्या आणि सहनायकाच्या भूमिकेत काम करून काही वर्षे गाजविली.अमिताभ बच्चन सोबत त्याची जोडी बरीच गाजली. आज लिना चंदावरकर हिचा जन्म दिवस. तिचे अभिष्टचिंतन करण्यासाठी हा ब्लॉग.                    

 पूर्वायुष्य

लिना चंदावरकरचा जन्म 1950 मध्ये कर्नाटकातील धारवाड येथे कोकणी मराठी भाषिक सेना अधिकारी श्रीनाथ चंदावरकर यांच्या घरात झाला. तिचे पहिले पती सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी तिचा विवाह झाला, ते गोव्याच्या मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांचे बंधु. लग्नानंतर काही दिवसांतच बंदुकीच्या गोळीने झालेल्या जखमेमुळे त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि लीना वयाच्या २५ व्या वर्षी विधवा झाली.नंतर तिने प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले.किशोरकुमार आणि लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमितकुमार हा सुद्धा गायक आहे. लग्नानंतर तिने बॉलीवूड सोडले. 1987 मध्ये किशोर यांचे निधन झाले, लीना पुन्हा एकदा वयाच्या 37 व्या वर्षी विधवा झाली.

करिअर

सुनील दत्तच्या दिग्दर्शनाखाली 1968 मध्ये मन का मीत या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आणि सुनील दत्त यांच्या पत्नी नर्गिसने तिला अभिनेत्री बनवले. हेमा मालिनी आणि मुमताज यांच्यासोबत ७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील ती सर्वोच्च नायिकांपैकी एक होती. तिचा एक मोठा भाऊ अनिल चंदावरकर होता.१९६९ ते १९७९ दरम्यान लीनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

तिने सास भी कभी बहू थी आणि चिंगारी मध्ये संजय खानसोबत,तिने जितेंद्र सोबत जवाब,हमजोली,बिदाई नालायक आणि सरफरोश हे चित्रपट केले.राजेश खन्ना सोबत मेहबूब की मेहंदी, ममता की छावो में हे चित्रपट केले. मैं सुंदर हूं” आणि :नामी चोर विश्वजित सोबत, शम्मी कपूर सोबत जाने-अंजाने आणि प्रीतम हे चित्रपट केले. संजीव कुमार सोबत “अनहोनी’’, इमान इमली”,”मनचली”, अपने रंग हजार’ हे चित्रपट केले. धर्मेंद्र सोबत “रखवाला”, “एक महल हो सपना का” हे चित्रपट केले. राज कुमार सोबत “दिल का राजा”, “हनीमून अनिल धवन सोबत, राकेश रोशन सोबत “एक कुंवारी एक कुंवारा”, “चोर चोर” विजय आनंद सोबत, शत्रुघ्न सिन्हा सोबत “जग्गू”,” यारों का यार” काम केले. “कैद”, “डाकू और जवान”, जालीम” हे चित्रपट विनोद खन्नासोबत केले. सुनील दत्त सोबत “आखरी गोली”, दिलीप कुमार सोबत “बैराग” आणि नवीन निश्चल सोबत “आफत” हे चितपट केले. “प्यार अजनबी है किशोर कुमार सोबतचा हा चित्रपट प्रकाशित झाला नाही.  तिने 1971 मध्‍ये राजेश खन्‍नासोबत मेहबूब की मेहंदीमध्‍ये तिचा सर्वोत्‍तम परफॉर्मन्स दिला.

 आता रिअलिटी शो मध्ये काम केले  

डिसेंबर 2007 मध्ये सोनी टीव्हीने सुरू केलेला नवीन रिअॅलिटी टीव्ही सिंगिंग शो, "के फॉर किशोर" च्या पहिल्या 2 भागांसाठी ती अतिथी न्यायाधीश म्हणून दिसली. ती आता रिअॅलिटी शोसाठी हजेरी लावत आहे. तिने एका म्युझिक अल्बमसाठी अमित कुमार आणि राजेश बांबल यांच्यासाठी काही गाणीही लिहिली.

 सारांश

            लिना चंदावरकर चित्रपटसृष्टीत आली,ती अशा एका चित्रपटातून,जो चित्रपटाचा हीरो सोमदत्त साठी लॉंच झाला होता. पण ती सुदैवी ठरली, त्याचा तिला अधिक फायदा झाला. ती चित्रपटसृष्टीत स्थिरावली.अनेक मोठमोठ्या नायकांसोबत काम केले. एक आघाडीची नायिका असतांना ती लग्न करून निघून गेली.25 व्या वर्षी विधवा झाली. 5 वर्षांनी किशोरकुमार सोबत लग्न केले.37 व्या वर्षी पुन्हा विधवा झाली सध्या त्या अमितकुमार,त्याची पत्नी आणि सुमितकुमार सोबत रहाते.लिना चंदावरकर यांना जिवनाची 73 वर्षे पूर्ण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा.  

            आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 


प्रसाद नातु,पुणे

Comments

Post a Comment