Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

Stuart Broad स्टुअर्ट क्रिस्टोफर जॉन ब्रॉड

 Blog No.2023/199      

Date:- 31st,July 2023 

मित्रांनो,

            स्टुअर्ट क्रिस्टोफर जॉन ब्रॉड Stuart Broad ?नाम तो सुना होगा”. भारतीयांना किंवा भारतीय क्रिकेट प्रेमींना हे नांव एका अनोख्या गोष्टीसाठी आठवणीत राहिल. 2007 चा ट्वेंटी 20 वर्ल्ड कपचा इंग्लंड विरुद्ध भारताचा सामना. भारताचा डावखुरा बॅट्समन युवराजसिंग बॅटिंग करत होता. आणि इंग्लंड कडून स्टुअर्ट ब्रॉड 6 फुट 5 इंच उंच बोलर बॉलिंगसाठी आला.आणि युवराजने एका ओवरमधील 6 बॉलसवर 6 सिक्स मारून स्वतःसाठी एक दैदीप्यमान तर स्टुअर्ट ब्रॉडसाठी मानहानीकारक विक्रम प्रस्थापित केला आणि भारताने अर्थातच तो सामना जिंकला आणि पुढे जाऊन वर्ल्ड कपही जिंकला.आजच्या ब्लॉगमधे स्टुअर्ट ब्रॉडबद्दल जाणून घेऊ या. कारण या इंग्लिश बॉलरने आपला आत्मविश्वास न गमावता खेळणे चालू ठेवलं आणि काल कसोटी मॅचेस मध्ये 600 विकेट्स घेतल्यावर लगेच आपली निवृत्ती जाहीर केली.                  

प्रास्ताविक

            स्टुअर्ट क्रिस्टोफर जॉन ब्रॉड, याचा जन्म 24 जून 1986 झाला. तो 12 आठवडे अकाली (पpre-mature) जन्माला आला होता आणि त्याचे प्राण डॉ. जॉन नावाच्या डॉक्टरांनी वाचवले होते, त्यांच्यामुळे तो जिवंत राहिला म्हणून त्याचे मध्य नाव जॉन ठेवण्यात आले.वयाच्या 16 व्या वर्षी, तो हॉकीमध्ये स्वत:ला अधिक चांगला समजत होता आणि लीसस्टरशायर आणि मिडलँड्ससाठी गोलकीपर म्हणून खेळला होता आणि इंग्लंडच्या अल्पवयीन संघासोबत त्याची चाचणी घेतली होती.स्टुअर्ट हा इंग्लडचा माजी फलंदाज ख्रिस ब्राॅडचा मुलगा.

 शिक्षण

ब्रॉडचे शिक्षण ब्रूक प्रायरी स्कूल आणि ओखम स्कूल, रटलँडमधील ओखम या मार्केट टाउनमधील एका  सह-शैक्षणिक स्वतंत्र शाळा येथे झाले, जेथे तो त्याच वर्षी इंग्लंड रग्बी बॅक-रो टॉम क्रॉफ्टच्या रूपात होता.ब्रॉडने त्याची शालेय कारकीर्द ए-स्तरावर तीन बी ग्रेडसह पूर्ण केली.त्याला डरहॅम विद्यापीठातील जागा आणि  लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबसोबत कराराची निवड देण्यात आली.

 कारकीर्द

            ब्रॉड डावखुरा बॅट्समन आणि उजव्या हाताने बॉलिंग करत असे. त्याने त्याची व्यावसायिक कारकीर्द इंग्लंडमधील  लिसस्टरशायर कडून सुरु केली. 2008 मध्ये तो नॉटिंगहॅमशायरकडे शिफ्ट झाला. हे त्याचं जन्म गांव आहे आणि त्या संघाकडून त्याचे वडील देखिल क्रिकेट खेळले. ऑगस्ट 2006 मध्ये त्याची क्रिकेट रायटर्स क्लब यंग क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली.  

            ओव्हल येथे 2009 च्या ऍशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात त्याने 37 रनस् च्या बदल्यात 5 विकेट्स  घेतल्यामुळे इंग्लंड संघ जिंकला.या सामन्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता.2007 च्या ट्वेंटी-20 भारताविरुद्धच्या युवराजसिंगने त्याला 6 बॉल मध्ये 6 सिक्सर्स मारल्यानंतर 2009 च्या मालिकेत त्यानं आपल्या गोलंदाजीत सुधारणा केल्याच हे उदाहरण आहे. त्यानंतर 30 जुलै 2011 रोजी, भारताविरुद्धच्या नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात, त्याने 46 रनस् च्या बदल्यात 6 विकेट्स  घेतल्या ही त्याची त्यावेळेस पर्यंतची सर्वोत्तम कसोटी कामगिरी होती. या सामन्यात कसोटी सामन्यात त्याने हॅट्ट्रिक देखिल साधली. एक फलंदाज म्हणून, 9 व्या स्थानावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूमधे त्याचा कसोटी रनसच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे, त्याने ऑगस्ट 2010 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 169 धावा केल्या होत्या. 2012 च्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला ब्रॉडने दुखापतीतून परतताना 72 धावा केल्या.वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 11 विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमध्ये तो इंग्लंडचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.2015 ह्या ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन टीम केवळ 60 धावांवर बाद झाली. या सामन्यात ब्रॉडने केवळ 15 रनस देऊन ऑस्ट्रेलियाच्या 8 विकेट काढल्या होत्या. या कामगिरीला दशकातील विस्डेनच्या पुरुषांच्या कसोटी बोलिंग लिस्ट मध्ये स्थान मिळाले होते.

            नुकत्याच सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 2023 च्या ऍशेस मालिकेदरम्यान, ब्रॉडने ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो सामील झाला.जेम्स अँडरसननंतर ब्रॉड हा एकमेव वेगवान गोलंदाज आणि इंग्लंडसाठी हा टप्पा गाठणारा दुसरा गोलंदाज आहे, जो त्या दिवशी अँडरसनसोबत गोलंदाजी करत होता. तो इंग्लंडसाठी एकूण 165 कसोटी सामने खेळला. यात त्याने एकूण  3640 धावा केल्या,यात एका शतकाचा समावेश आहे आणि 600 विकेटस् घेतल्या. एका डावात  5 विकेट त्याने 20 वेळा घेतल्या आणि एका सामन्यातून 10 विकेट 2 वेळा घेतल्या.121 एक दिवसीय सामने तो खेळला. यात त्याने 178 विकेट घेतल्या आणि 529 धावा फटकाविल्या. तसेच 20-20 प्रकारामध्ये तो 56 सामने खेळला आणि 76 विकेट घेतल्या. तो इंग्लंडचा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार देखिल होता. ब्रॉड 2010 च्या आयसीसी विश्व ट्वेंटी-20 जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा सदस्य होता.  


  संन्यास

            काही खेळाडू त्याच्या कामगिरीच्या सर्वोच्य स्थानावर असतांना निवृत्तीची घोषणा करतात. 29 जुलै 2023 रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या समाप्तीपासून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.आणि अशा नामवंत खेळाडू मध्ये तो आता जाऊन बसला आहे.मला इतर देशातील खेळाडूंची निवृत्ती जास्त मनाला चटका देऊन जाते. कारण त्याचं नांव नंतर आपल्या कानावर क्वचितच येतं.त्यामुळे ते खूप लवकर विस्मृतीच्या आड जातात. देशातले खेळाडू काही ना कारणाने चमकत असतात. त्यामुळे स्टुअर्ट क्रिस्टोफर जॉन ब्रॉड नावाच्या या स्मार्ट इंग्लिश खेळाडूची निवृत्ती मला धक्कादायक वाटली. आपल्या युवराजसिंगसोबत अनेक खेळाडूंनी त्याच्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. ते सर्व येथे देणं शक्य नाही. ब्रॉडला निवृत्ती पश्चात जीवनासाठी शुभेच्छा.    

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे

Comments

  1. 600 wickets as a fast bowler, definitely big achievement. He has timed his retirement perfectly. Fast bowlers career can't be prolonged due to the demanding modern cricket regimen
    Happy Retirement Stuart Broad. Also reminds about his father Chris Broad who also played Test Cricket. However Beta Baapse Sawai Nighala

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...