Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

प्रोत्साहन की पैसा

 Blog No.2023/200      

Date:- 31st,July 2023

 

                                           keep going, the two words motivate you.  

मित्रांनो,

            या वर्षीचा म्हणजे 2023 चा 200 वा ब्लॉग पोस्ट करतांना मला अतिशय आनंद होत आहे. आनंद यासाठी इतक्या विविध ब्लॉग पोस्ट लिहिण्यासाठी खाद्य म्हणजे विषय मला मिळाले. माणसाला एखादे कार्य करण्यास मुख्यतः दोन गोष्टी प्रेरित करत असतात. पहिली म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे प्रोत्साहन. "Motivation"   पैसा एका विशिष्ट कालावधी करता प्रोत्साहन देऊ शकतो. प्रोत्साहन हे मनुष्याला अगदी मनुष्याच्या जीवनात जोपर्यंत कार्यरत राहिलो तरी कार्य करण्यास कामी येतं.मग नोकरीत असतांना एका टप्प्यावर हे माहित झालं होतं की आता कार्य करुन पैसा मिळणार नाही.पण प्रोत्साहनामुळे निवृत्तीपर्यन्त त्याच इर्षेने कार्य करत राहिलो, जेवढे नोकरीला लागली तेव्हा करत होतो. आज तुम्हा सगळ्या वाचकांच्या प्रोत्साहनामुळे हा 200 ब्लॉगचा टप्पा सात महिन्यात गाठू शकलो. त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार. आज त्या निमित्ताने दिवसातील दुसरा ब्लॉग. एक छान गोष्ट माझ्या वाचनात आली ती या निमित्ताने शेअर करत आहे.

एक छानशी गोष्ट  

एकदा प्रवचनात  गुरुजींनी एका  तरुणाला  उभे राहण्यास सांगितले व विचारले. "तू मुंबईत जुहू चौपाटीवर उभा  आहेस आणि समोरून एक सुंदर मुलगी येत आहे, तू काय करशील?"

तरुण म्हणाला, "मी  तिच्याकडे पाहिन."

गुरुजींनी पुन्हा विचारले, "ती मुलगी थोडे पुढे गेली तर मागे वळून तिला पुन्हा पहाशिल ?"

तो तरूण  म्हणाला, "हो, बायको माझ्यासोबत नसेल तर."

गुरुजींनी पुन्हा विचारले - "मला सांग, तो सुंदर चेहरा तुला किती दिवस लक्षात राहील?"

तरुण म्हणाला, "5-10 मिनिटे, जोपर्यंत दुसरा सुंदर चेहरा दिसत नाही तोपर्यंत."

गुरुजीनी  त्या तरुणाशी पुनः विचारले

"आता जरा कल्पना कर. तू जयपूरहून मुंबईला जात आहेस आणि मी तुला पुस्तकांचे एक पार्सल दिले आणि सांगितले की हे  मुंबईतल्या एका मोठया व्यक्तीला द्यायचे आहे.पॅकेट डिलिव्हरी करण्यासाठी तू त्याच्या मुंबईतील घरी गेला तेव्हा तुला कळले की तो एक मोठा अब्जाधीश आहे.तू आत पॅकेटची माहिती पाठवली, मग ते गृहस्थ स्वतः बाहेर आले. तुझ्याकडून पॅकेट घेतले. तू जायला निघाला तेव्हा घरात  येण्याची विनंती केली. जवळ बसवून गरमागरम जेवण दिले.

जाताना विचारले - "कसे आलात?"

तू उत्तरलास  "लोकल ट्रेनमध्ये."

त्याने ड्रायव्हरला तुला इच्छित स्थळी पोचवण्यास  सांगितले.तू तुझ्या इच्छित ठिकाणी पोहचला तोच त्या अब्जाधीश गृहस्थाचा फोन आला,

"भाऊ, तुम्ही आरामात पोहोचलात ना!

आता मला सांग, तू किती दिवस त्या गृहस्थाची आठवण ठेवणार?"

तो तरुण म्हणाला,

"गुरुजी!  अशा व्यक्तीला मी मरेपर्यंत विसरू शकणार नाही."

युवकाच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करताना गुरुजी म्हणाले,

"हे जीवनाचे वास्तव आहे.सुंदर चेहरा थोड्या काळासाठी लक्षात राहतो, पण सुंदर वागणूक आयुष्यभर लक्षात राहते."

सारांश

मित्रांनो,कशी वाटली गोष्ट. आणि खरं तर हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे.चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा.आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.याच सोबत आजच्या साठी इथेच थांबतो.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...