Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

शिवाजी साटम

 

Blog No. 2023/98       

Date: 21st, April 2023. 




मित्रांनो,

“दया कूछ ना कुछ तो गडबड जरुर है” ह्या CID ह्या हिन्दी मालिकेतील संवादाने लोकप्रिय झालेल्या शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस आहे. माजी बँक अधिकारी असलेले शिवाजी साटम ह्यांच्या वैशिष्ठपूर्ण अभिनयाने CID ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की लोक केवळ C.I.D मधील ACP प्रद्युम्न या भूमिकेसाठी C.I.D बघत असतं.या भूमिकेसाठी लागणारा उंचापुरा देह आणि शरीरयष्टी त्यांना लाभली आहे.त्या आधी 100 डेज आणि एक शून्य शून्य या मराठी मालिकेत देखिल त्यांनी सुरेख अभिनय केला होता.       


 प्रास्ताविक

            शिवाजी साटम यांचा जन्म 21 एप्रिल. 1950 चा. त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली.त्यांनी डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिसट्रेशन देखिल केले.चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडियात नोकरी केली. ते एक बॅंकर आणि इन्सपेक्शन ऑफिसर होते.

 

कारकीर्द

            शिवाजी साटम यांनी 1980 ला रिश्ते नाते या नवीन निश्चल अभिनीत टेलिविजन सिरियल मध्ये काम करून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांनी वास्तव, गुलाम-ए-मुस्तफा, यशवंत, चायना गेट, टॅक्सी नंबर 9211, नायक, जिस देश में गंगा रहता है, सूर्यवंशम, हू तू तू या हिंदी चित्रपटात आणि दे धक्का, दे धक्का 2, उत्तरायण या मराठी सारख्या चित्रपटातून उल्लेखनीय कार्य केले.

             शिवाजी साटम यांनी 1980 मध्ये रिश्ते-नाते या टीव्ही मालिकेतून पडद्यावर पदार्पण केले. 1988 मध्ये, ते फेमस ट्रायल्स ऑफ इंडिया या मालिकेत दिसले. एक शुन्य शुन्य या मराठी शोमध्ये त्यांनी इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते असंख्य मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसले आणि वास्तव, कुरुक्षेत्र आणि 100 डेज या हिंदी चित्रपटांमुळे  प्रसिद्ध झाले.याशिवाय 1988 मध्ये पेस्तनजी, 100 डेज,यशवंत,युगपुरुष, चायना गेट,वजुद,दाग द फायर, सूर्यवंशम, पुकार, बागी, निदान,कुरुक्षेत्र, जोडी नं 1, या चित्रपटातून ही आपल्या अभिनयाची झलक दाखविली.

            शिवाजी साटम यांनी रिश्ते नाते, एक शून्य शून्य (मराठी) आहट, सी आय डी, अदालत,तारक मेहता का उलटा चश्मा या हिन्दी आणि मराठी टेलिविजन मालिकेत काम केले. सर्वात लोकप्रिय झाली ती सी.आय.डी.ही मालिका जी 1998 ते 2018 अशी 20 वर्षे सुरू होती आणि अजूनही लोक या मालिकेचे जूने भाग आवडीने पहातात.

पुरस्कार आणि सन्मान

            2002 मध्ये इंडियन टेली अवार्ड्स तर्फे त्यांना उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार C.I.D मधील ACP प्रद्युम्न साथी मिळाला होता.

            2002 मध्येच एक होती वादी या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार महाराष्ट्र स्टेट फिल्म अवार्ड्स कडून मिळाला होता.

            तसेच “ध्यानी मनी” या नाटकातील भूमिकेसाठी उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार महाराष्ट्र स्टेट फिल्म अवार्ड्स कडून मिळाला होता.

समारोप

            आज शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे. त्यांना माझ्याकडून आणि माझ्या ब्लॉगच्या समस्त वाचकांकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि आपल्याला त्यांचा सशक्त अभिनय पहावयास मिळो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना   

 

 

प्रसाद नातु,पुणे.  








Comments

  1. शिवाजी साटम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
    तुमचं लिखाण नेहमीप्रमाणे सुरेख, मुद्देसूद. तुमच्या सातत्यपूर्ण रोज नवीन विषयावर लिहिण्याला दाद द्यायला हवी.

    ReplyDelete

Post a Comment