Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

पुस्तकप्रेमी समूह- 1000 वा पुस्तक परिचय भाग 2 रा

 Blog No. 2023/51      

Date:28th, February 2023.


 

मित्रांनो,        

 

           कालच्या ब्लॉगमध्ये मी पुस्तकप्रेमी समूहाची स्थापना कशी झाली. पुस्तकप्रेमी समूहाच्या स्थापनेमागचे उद्देश,पुस्तकप्रेमी समूहाच्या नियमाबद्दल लिहिले होते.आज मी पुस्तकप्रेमी समूहातर्फे समूहातील सदस्यांना सक्रिय ठेवण्यासाठी आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी ज्या  विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आणि केले जात आहे,त्या बद्दल लिहिणार आहे.         

 

पुस्तकप्रेमी समूहाचे अन्य उपक्रम

शब्द-काव्य संध्या            

        समूहाद्वारे सदस्यांना सक्रिय ठेवण्यासाठी अन व्यक्त होण्यास वाव मिळावा म्हणून दर शनिवारी 4.00 नंतर शब्द काव्यसंध्येचे आयोजन केले गेले.आधल्या रविवारी किंवा सोमवारी एक शब्द दिला जात असे. त्या शब्दाला अनुसरून कविता ज्या सदस्याने कविता रचिली आहे.तो शनिवारी 4.00 नंतर पोस्ट करीत असे. ह्याचे सुरेख संचलन अॅड.माधुरी काजवे यांनी केले होते.शब्द काव्यसंध्येत सदस्यांनी हिरीहिरीने सहभाग घेतला.50 हून अधिक सदस्य स्वरचित कविता पोस्ट करीत असतं.      

 

चित्र-काव्य संध्या

            शब्द काव्य संध्या यशस्वीरित्या पार पडल्या नंतर काही नाविन्यता यावी म्हणून. काव्य संध्येचे प्रारून थोडे बदलून दर शनिवारी 4.00 नंतर चित्र काव्यसंध्येचे आयोजन केले गेले.आधल्या रविवारी किंवा सोमवारी एक चित्र दिले जात असे.दर शनिवारी त्या चित्राला अनुसरून ज्यांनी कविता रचिली आहे ते सदस्य ती कविता समूहावर  पोस्ट करीत असतं. ह्याचे सुरेख संचलन सुरुवातीस माधुरी ताम्हाणे देव आणि त्या नंतर श्रेया राजवाडे यांनी केले. 50 हून अधिक सदस्य स्वरचित कविता पोस्ट करीत असतं.ह्या काव्यसंध्येत सदस्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.त्यांनी आलेल्र्या सर्व कवितांचे संकलन करुन त्याची पीडीएफ करायचा नवा पायंडा पाडला.कार्यकमात तोच तोच पणा येऊ नये आणि नाविन्य राखले जावे म्हणून सध्या एका नव्या संकल्पनेसहित एक नवीन उपक्रम राबविला जात आहे.

 

काव्यांजली भावांजली

            चित्र काव्य संध्या यशस्वीरित्या पार पडल्या नंतर,काव्यांजली भावांजली या नव्या उपक्रमाचा 10 डिसेंबर 2022 पासून आरंभ केला.त्यातील संकल्पना अशी आहे की दर रविवारी एक कविता समूहावर पोस्ट केली जाईल.त्या नंतर सर्वांना त्यावर विचार करायला वेळ मिळावा म्हणून शुक्रवार पर्यन्त ही कविता रोज समूहावर पोस्ट करण्यात येते.कवितेतील एक ओळ सदस्य निवडतील आणि ती तशीच्या तशी  किंवा तिच्यात थोडा बदल करून (त्यातील आशय न बदलता) ती ओळ कवितेत येईल अशा तऱ्हेने कविता करुन शनिवारी चार नंतर समूहावर पोस्ट करतील.ह्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे.ह्या काव्यसंध्येचे संचलन पहिल्या तीन महिने समूहातील कवि जस्मिन जोगळेकर,प्रदीप तळेकर आणि रसिका डोंगरे यांनी केले.1 मार्च पासून गौरी दातार महिनाभर काव्यसंध्येचे संचलन करतील त्यानंतर अर्चना देवधर आणि सुजीत सौंदत्तीकर करतील असे नियोजन तयार केले गेले आहे.ह्या उपक्रमाच्या सुसूत्रीकरण आणि सर्वसाधारण संचलनाची जबाबदारी श्रेया राजवाडे यांनी स्वीकारली आहे.

 

 

गूगल मीट वर गप्पांचा कार्यक्रम

याशिवाय लेखक आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम गूगल मीटवर घेतला होता. लेखक आणि अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम गूगल मीटवर घेतला होता.त्या नंतर प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम देखील खूप रंगतदार झाला. तसेच समूह सदस्य बॅगपॅकर प्रवीण मानकर यांनी 5757 किमी आपल्या स्कूटीवर प्रवास करून आल्यानंतर त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि नुकताच म्हणजे 25 फेब्रुवारीला प्रसिद्ध अनुवादिका डॉ.शुचिता नांदापुरकर फडके ह्यांच्याशी गूगल मीटवरील गप्पांचा कार्यक्रमही खूप रंगला.

 

पुस्तकप्रेमी दिवाळी अंक

            2021 ला “पुस्तकप्रेमी दिवाळी अंक 2021” हा  समूहातील सदस्यांसाठी प्रकाशित करण्यात आला. ह्या अंकासाठी सदस्यांनी आपले लेख,कथा,कविता इत्यादि पाठविले. हा अंक 176 पानांचा होता.मागील वर्षी 2022 च्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला “पुस्तकप्रेमी दिवाळी अंक 2022" समूहातील सदस्यांसाठी प्रकाशित करण्यात आला. “पुस्तकप्रेमी दिवाळी अंक 2022" चे प्रकाशन मुंबई येथे रिजर्व बँक ऑफ इंडियाचे विभागीय संचालक,सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि लेखक आशुतोष रारावीकर ह्यांच्या हस्ते मुंबई येथे झाले.ह्या अंकाला समुहातील लेखक आणि कवींचा भरगच्च असा प्रतिसाद मिळाला.ह्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाची जबाबदारी अल्टिमेट इम्प्रेशनस नासिकचे बिपिन बाकळे ह्यांनी उत्कृष्टपणे सांभाळली.ह्या कामात त्यांना श्रेया राजवाडे,आरती परांजपे,संध्या साठे जोशी,सचिन केळकर,माधुरी ताम्हाणे देव या सर्वांचे सहकार्य लाभले.


 

सामाजिक जबाबदारीचे भान

            2021 ला चिपळूण मधे पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.अशा वेळेस समूहाच्या सदस्यांनी  सात कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.तसेच समूहाचे वरिष्ठ सदस्य आणि मेहता पब्लिकेशनचे सर्वेसर्वा अनिल मेहता ह्यांच्या हस्ते सतीश वडणगेकर (गणेश मूर्तिकार) मिलिंद पिंपुटकर (पुस्तक दुकान) आनंदा जाधव (मोटर rewinding) आणि चेतन पाटील (डिजायनिंग व प्रिंटिंग) यांना व्यवसाय पुनः उभारण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात मदत करण्यात आली.    




 नोंद घ्यायला घ्यायला हव्यात अशा काही गोष्टी

            समूहात जे काही कार्यक्रम राबविण्यात आले ते सगळे स्वयंसहभागातून झाले.हा एक गैर आर्थिक अशा स्वरूपाचा समूह आहे.कुठल्याही कामाचे कुणीही दाम मागत नाही.सगळे जण हे आपलेच काम आहे,ह्या जाणिवेतून काम करीत असतात.समूहावर जेवढ्या गूगल मीट झाल्या त्यांची तांत्रिक बाजू सचिन केळकर ह्यांनी उत्तम रीतीने सांभाळली आहे.तसेच सचिन केळकर हे दर महिन्यातील पुस्तक परिचयाच्या संकलनाचे काम न विसरता करीत असतात.कुठलाही पुस्तक परिचय असला की गूगलचे सहाय्य घेऊन समूहातील जेष्ठ सदस्य पूनमकुमार कटारिया त्या पुस्तकांबद्दलची,त्या लेखकाबद्दलची,कवितासंग्रह असेल तर त्यातील विविध  कविता समूहावर पोस्ट करून परिचय अधिक समृद्ध करतात.तसेच पुस्तक परिचय पुस्तकप्रेमी समूहावर पोस्ट केल्यावर तो पुस्तक परिचय फेसबूक वर नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे काम डॉ. केदार मारुलकर आणि शरयू पवार करतात.त्यामुळे फेसबूकवर पुस्तकपरिचय वाचन प्रेमी वाचू शकतात.      

        जेष्ठ प्रकाशक रामदास भटकळ,पॉप्युलर प्रकाशनचे संस्थापक,मेहता पब्लिकेशनचे सर्वेसर्वा अनिल मेहता,पानिपतकार विश्वास पाटील,प्रसिद्ध लेखिका छाया महाजन,प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक,प्रसिद्ध लेखिका आश्लेषा महाजन, प्रसिद्ध अनुवादिका डॉ.शुचिता नांदापुरकर फडके,प्रसिद्ध लेखक राजेंद्र वैशंपायन यांच्या सारखे नामवंत देखील समूहाचे सदस्य आहेत.याशिवाय समूहावर अनेक प्रतिभाशाली लेखक, कवि, पत्रकार, व्याख्याते, संपादक, प्रकाशक, डॉक्टर, बँकर्स, चित्रकार,सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.फॉटोग्राफर आणि लेखक असलेले प्रकाश पिटकर हे अधूनमधून आपली फोटोग्राफीतील अदाकरी आणि त्या चित्राला साजेशी प्रसिद्ध कवींची कविता समूहावर पेश करून बहार उडवून देतात.पुस्तकप्रेमी समूह ह्या फेसबूक वरील सदस्यांची संख्या 29000 झाली आहे.   

            अशा ह्या आमच्या पुस्तकप्रेमी समूहावर 11 मार्च रोजी संध्या साठे जोशी ह्या 1000 व्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहेत. हा खरोखर अभूतपूर्व असा क्षण आहे,सोहळा आहे, प्रसंग आहे.त्या दिवशी एकाही दिवसाचा खंड न पडता पुस्तक परिचय करून देण्याचा 1000 वा दिवस असेल.हे खरोखर अभूतपूर्व असेच आहे. दर रोज पुस्तक परिचय दिला जातो. एवढेच नव्हे तर त्या परिचयावर सदस्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत असतात.काही प्रतिक्रिया खूप सुरेख असतात.चळवळ वाढावी हा उद्देश्य ठेवून ज्या 10 लोकांनी हा समूह स्थापन केला त्या अनंत मिसे, प्रसाद नातु (मी स्वत:) कृष्णा दिवटे, अजिंक्य लाटकर, अक्षता मुतालिक देसाई, अमोल देशपांडे,चैताली ढवळीकर, विद्या पाध्ये,राजा बर्वे आणि विकास मोघे यांना स्वप्नात देखील वाटले नसेल की हा दिवस येईल.मला ह्या गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की मी 21 जून 2020 ला ते आव्हान कृष्णा दिवटे सरांना दिले आणि त्या नंतर कृष्णा दिवटे सरांनी माझा त्यांच्या वरील विश्वास सार्थ करीत इतर सदस्यांच्या साथीने हा कल्पवृक्ष उभा केला.माझा निर्णय म्हणून म्हणत नाही.पण अचूक निर्णय नेमके काय घडवू शकतो हे पुस्तकप्रेमीच्या निमिताने माझ्या कायमचे लक्षात राहील.तसेच "पुस्तकप्रेमी" समूह ह्या अभूतपूर्व संकल्पनेची दखल घेतली गेली पाहिजे असे मनापासून वाटते.      

 

  प्रसाद नातु,पुणे                    

Comments

  1. पुस्तकप्रेमीच्या प्रवासाबद्दल खूप छान लिहिले आहे सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...