ब्लॉग नं. 2026/ 246. दिनांक: 3 सप्टेंबर, 2026. मित्रांनो , व्यायाम करताना स्नायूंना ग्लुकोज घेण्यासाठी इन्सुलिनची गरज नसते का ? हा प्रश्न बरेच लोक विचारतांना दिसतात. हे वाक्य तुम्ही कदाचित ऐकले असेल. हे पूर्णपणे चुकीचे नाही ; उलट त्यामागे एक अतिशय महत्त्वाची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. मात्र , याचा अर्थ असा अजिबात नाही की,मधुमेह असलेल्या व्यक्तीने इन्सुलिन किंवा डॉक्टरांनी दिलेली औषधे बंद करावीत.आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर: स्नायूंना ग्लुकोजची गरज का असते ? आपण चालतो , धावतो , सायकल चालवतो किंवा strength training करतो , तेव्हा स्नायू मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरतात. या ऊर्जेसाठी glucose हा महत्त्वाचा स्रोत आहे.सामान्य परिस्थितीत रक्तातील glucose स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी insulin महत्त्वाची भूमिका बजावते.इन्सुलिन रक्तातील glucose कमी करण्यासाठी स्वादुपिंडातून स्रवते आणि स्नायूंच्या पेशींना glucose आत घेण्यास मदत करते. पण व्यायामाच्या वेळी शरीराकडे glucose पेशींमध्ये पोहोचवण्याचा आणखी एक मार्ग सक्रिय होतो. व्य...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .