ब्लॉग नं. 2026/ 242. दिनांक: 30 ऑगस्ट, 2026. “ व्यथांच्या कथा” या मालिकेचा समारोप : प्रत्येक वयाची व्यथा वेगळी , पण वेदना सारखीच! मित्रांनो , “ व्यथांच्या कथा” या मालिकेत आपण बालपणापासून ज्येष्ठत्वापर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांकडे पाहिलं. शाळकरी मुलाची व्यथा—अपेक्षांचं ओझं. तरुणाची व्यथा—भविष्याची अनिश्चितता. नोकरी करणाऱ्याची व्यथा—काम आणि जीवनातील संघर्ष. दररोज प्रवास करणाऱ्याची व्यथा—धावपळ आणि मानसिक थकवा. मध्यमवयीन व्यक्तीची व्यथा—जबाबदाऱ्यांचं ओझं. आणि ज्येष्ठ नागरिकांची व्यथा—एकटेपणा आणि आपलेपणाची गरज. व्यथा वेगवेगळ्या आहेत. परिस्थिती वेगवेगळी आहे. वय वेगळं आहे. पण एक गोष्ट मात्र समान आहे— प्रत्येकाला कुणीतरी समजून घ्यावं असं वाटतं. कुणीतरी आपलं म्हणावं. कुणीतरी शांतपणे ऐकावं. कुणीतरी न सांगताही मनातलं ओळखावं. म्हणून कदाचित आजच्या काळात, माणसाला पैशाइतकाच , सुविधांइतकाच आणि यशाइतकाच संवादाची आणि आपलेपणाची गरज आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे, थोडं अधिक लक्ष देऊ या. मुलाला विचारू या—“काय झाल...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .