ब्लॉग नं. 2026/236. दिनांक: 24 ऑगस्ट, 2026. व्यथांच्या कथा भाग 1 — शाळकरी मुलांच्या मनातलं कोण ऐकणार? मित्रांनो , तुम्हाला आठवतंय, मिली चित्रपटातील एक गीत,जे लता मंगेशकर यांनी गाईले होते आणि जया भादुरी, हो तेव्हा त्या जया भादुरीच होत्या.त्यांच्यावर चित्रित झाले होते.त्याचे बोल होते, “ मैंने कहा फूलों से.. . मैंने कहा फूलों से , " हँसो " तो वो खिलखिला के हँस दिए,और ये कहा , " जीवन है भाई , मेरे भाई , हँसने के लिए, हँसने के लिए.” गीतकार योगेश यांचं हे गीत. लहानपण हे खरंच हसण्याचं असतं.पण मी आज काल मुलांच्या,विशेषतः माझ्या नातवंडांच्या पिढीकडे बघतो आणि काही गोष्टी मनांत ते येतात,त्या शब्दबद्ध केल्या आहेत. लहानांना व्यथा असतात? आपण मोठ्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करतो ; पण घरात , शाळेत आणि समाजात वावरणाऱ्या लहान मुलांच्या मनातही अनेक व्यथा दडलेल्या असतात , याचा आपण अनेकदा विसर पडतो.शाळेत जाणाऱ्या मुलाचं आयुष्य वरवर पाहता किती सुंदर वाटतं! स...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .