ब्लॉग नं. 2026/ 232. दिनांक: 20 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , आजच्या काळात बदलती जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे , जगभरात मधुमेहाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. ' लॅन्सेट डायबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजी ' (Lancet Diabetes & Endocrinology) मध्ये प्रकाशित झालेल्या ICMR-INDIAB च्या राष्ट्रीय अभ्यासानुसार ,15.3 % भारतीय प्रौढांना प्रीडायबेटिस ( Pre-diabetes) आहे.याचा सोप्या शब्दांत अर्थ असा की , देशातील तब्बल 13.6 कोटी लोक टाईप- 2 मधुमेहाच्या उंबरठ्यावर उभे आहेत ! अशा वेळी लाखो लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो: " केवळ व्यायामाने प्रीडायबेटिस पूर्णपणे पूर्ववत ( Reverse) होऊ शकतो का ?" चला , या प्रश्नाचे उत्तर , त्यामागील विज्ञान आणि तज्ज्ञांचे मत सविस्तर समजून घेऊया , आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: 1 .प्रीडायबेटिस ( Pre-diabetes) म्हणजे नक्की काय ? फोर्टिस नोएडाचे वरिष्ठ सल्लागार (एंडोक्राइनोलॉजी) डॉ. राकेश कुमार प्रसाद सांगतात ," प्रीडायबेटिस ही अशी स्थिती आहे , ज्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी ( Fast Glucose) सामान्यपेक्षा जास्त ( 5.7 % ते 6.4 %) अ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .