ब्लाॅग नं.2026/191. दिनांकः 11 जुलै, 2026. मित्रांनो , फिटनेससाठी काय जास्त पॉवरफुल ? भिजवलेले बदाम की भिजवलेले शेंगदाणे ? आजकाल फिटनेस आणि निरोगी आरोग्यासाठी , लोक आपल्या आहारात सुका मेवा ( Dry Fruits) आणि नट्सचा आवर्जून समावेश करतात.यामध्ये सर्वाधिक पसंती दिली जाते ती म्हणजे , भिजवलेले बदाम आणि भिजवलेले शेंगदाणे.पण , फिटनेसच्या बाबतीत या दोन्हीपैकी नक्की जास्त पॉवरफुल कोणतं ? हा प्रश्न अनेकांना पडतो.नुकतीच ' लोकसत्ता डॉट कॉम ' वर ( loksatta.com) या संदर्भात , एक रंजक माहिती समोर आली आहे. या दोन्हीच्या पोषकतत्वांची तुलना करून , तुमच्या फिटनेससाठी काय सर्वोत्तम आहे , हे आपण या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेऊया. सविस्तरः बदाम की शेंगदाणे: पौष्टिकतेची तुलना: अनेकांचा असा गैरसमज असतो की , बदाम महाग असल्याने ते शेंगदाण्यांपेक्षा खूप जास्त फायदेशीर आहेत. मात्र , पोषण मूल्यांचा विचार केला तर शेंगदाणे बदामापेक्षा अजिबात कमी नाहीत.म्हणूनच शेंगदाण्याला ' गरिबांचे बदाम ' असेही म्हटले जाते. भिजवलेले बदाम ( Soaked Almonds): बदामामध्ये व्हिटॅमिन ई ( Vitamin...
ब्लॉग नं. 2026/1 85. दिनांक: 4 जुलै, 2026. मित्रांनो , मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये HbA1c पातळी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायाम मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी रक्तातील साखर नियंत्रित करणे,हे सर्वात मोठे आव्हान असते. मधुमेहाच्या अनेक निर्देशकांपैकी, HBA1c हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. HBA1c ( किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन) हे गेल्या दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी मोजते.दीर्घकाळासाठी मधुमेहाचे व्यवस्थापन,किती चांगल्या प्रकारे केले जात आहे , हे यावरून समजते. HbA1c ची पातळी जास्त असल्यास,मज्जातंतूंचे नुकसान ( nerve damage), हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या समस्या यांसारखे धोके निर्माण होऊ शकतात. औषधे आणि आहार महत्त्वाचे असले तरी , रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण सुधारण्यासाठी व्यायाम हे सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक साधनांपैकी एक आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की , रक्तातील साखर नियंत्रित करण्याच्या बाबतीत काही शारीरिक हालचालींचा प्रभाव इतरांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. येथे आपण HbA1c कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायाम प्रकार ...