ब्लॉग नं: 2025/360 दिनांक: 24 डिसेंबर ,2025. मित्रांनो , :ओझेम्पिक भारतात लाँच होणार : भारतामध्ये मधुमेह हा एक झपाट्याने वाढणारा आरोग्यविषयक धोका बनला आहे. विशेषत: टाइप 2 मधुमेह आणि त्यासोबत वाढणारी स्थूलता ही चिंतेची बाब बनली आहे.अशा पार्श्वभूमीवर नोव्हो नॉर्डिस्कने ओझेम्पिक ( Semaglutide) हे महत्त्वाचे औषध भारतात लाँच केले आहे — जे फक्त मधुमेहावरच नव्हे तर वजन नियंत्रणातही प्रभावी मानले जाते. मात्र , तज्ज्ञांचे ठाम म्हणणे आहे की हे जादुई उपाय नसून , योग्य औषधाबरोबर शिस्तबद्ध जीवनशैली हीच खरी गुरुकिल्ली आहे.आजच्या ब्लॉगमध्ये या औषधाची माहिती करून घेणार आहोत. सविस्तर: ओझेम्पिक म्हणजे काय ? ओझेम्पिक हे जीवनशैलीशी संबंधित आजारांवर,विशेषतः टाइप 2 मधुमेह नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणारे इंजेक्शन स्वरूपातील औषध आहे.भारतात हे औषध 0.25 mg, 0.5 mg आणि 1 mg अशा साप्ताहिक डोसमध्ये उपलब्ध होणार आहे. CDSCO ने ( Central Drug Standard Control Organisation) याला ऑक्टोबरमध्ये औपचारिक मान्यता देऊन उपचारांना नवीन दिशा दिली आहे.याबाबत तज्ज्ञांचे मत असे...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .