ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...
ब्लॉग नं:2025/201 दिनांक: 21 जुलै, 2025. मित्रांनो , आजचा हा ब्लॉग हा यावर्षीचा 201 वा ब्लॉग आहे. त्यानिमित्त हृदयाच्या आरोग्याशी अगदी जवळून निगडित असलेल्या , कोलेस्ट्रॉल या विषयावर आज लिहीत आहे.आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत , अनेक आजार चोरी छुपे आपलं आरोग्य कुरतडत असतात. त्यातला एक सर्वात मोठा धोका म्हणजे , उच्च कोलेस्ट्रॉल. बहुतेक वेळा या उच्च कोलेस्ट्रॉल या स्थितीची लक्षणे , खूप उशीर होईपर्यंत जाणवत नाहीत , मात्र आपलं शरीर सूक्ष्म चेतावणी देणारे संकेत पाठवत असतं. उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी ही कोरोनरी धमनी रोग , स्ट्रोक आणि इतर गंभीर हृदयविकारांच्या जोखमीशी जोडलेली आहे. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यातच याची जाणीव ठेवणे आणि योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.आजचा ब्लॉग उच्च कोलेस्ट्रॉल , धोक्याची जाणीव आणि आणि उच्च कोलेस्ट्रॉल होण्यामागची कारणे या विषयावर आहे. सविस्तर: उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे काय ? हायपरलिपिडेमिया किंवा हायपरकोलेस्टेरोलेमिया असेही याला वैद्यकीय भाषेत म्हणतात. आपल्या शरीर...