Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

मोहम्मद रफी यांची 100 वी जयंती

 ब्लॉग नं. 2024/311   

दिनांक:- 24 डिसेंबर, 2024.

मित्रांनो,
            आज रसिकांचे आवडते गायक मोहम्मद रफी यांची 100 वी जयंती. मोहम्मद रफी यांना लोक आदराने रफी साहाब म्हणतं असतं.भारतात जे दैवी देणगी लाभलेले गायक होऊन गेले,त्यांत एक नांव मोहम्मद रफी यांचे घेता येईल.1941 ला सुरु झालेली त्यांची कारकीर्द ही 1980 ला त्यांचा मृत्यू होईपर्यन्त सुरु होती.त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी एक रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते.आज त्यांना शब्द सुमनांजली वहाण्यासाठीच हा ब्लॉग. 

प्रास्ताविक:

            मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर, 1924 ला पंजाबमधे अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुलतानसिंग या गांवी झाला.रफी हे उस्ताद अब्दुल वाहिद खान,पंडित जीवनलाल मट्ट आणि फिरोज निजामी यांच्याकडून  शास्त्रीय संगीत शिकले होते.वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी कुंदन लाल सैगल याच्या सोबत गाणे केले.1941 मध्ये रफी यांनी संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पंजाबी चित्रपट “गूल बलोच” मध्ये पहिल्यांदा एक पार्श्वगीत गायले.1945 मध्ये “गांव की गोरी” या चित्रपटातून हिन्दी चित्रपटातून हिन्दी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि मग मागे वळून पाहिले नाही.

मोहम्मद रफी यांची काही हिट गाणी:

            मोहम्मद रफी यांची काही हिट गाणी लिहिणे खरं तरं खूप कठीण आहे.कारण त्यांची हिट गाणी खूप आहेत.म्हणून खरं तरं मोहम्मद रफी यांची मला आवडलेली हिट गाणी असे शीर्षक योग्य ठरले असते.पण असो.



1.       मधूबन मी राधिका नाचे रे गिरीधर की मुरलिया बाजे रे.

2.       सावन आये या ना आये पिया जब झुमे सावन है.

3.       तेरी आँखों के सिवा दुनिया मे रखा क्या है.

4.       मै निगाहे तेरे चेहरे से हटाऊँ कैसे.

5.       मेरे महबूब तुझे मेरे मुहब्बत की कसम.  

6.       एक घर बनाऊँगा तेरे घर के सामने.

7.       झील मिल सितारोंका आँगन होगा.

8.       लेके पहला पहला प्यार.

9.       सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था.

10.     अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं.

11.     हमदम मेरे मान भी जाओ कहना मेरे प्यार का.

12.     तेरी बिंदियाँ रे,हाय हाय तेरी बिंदियाँ रे.

13.     दो सितारों का जमी पर है मिलन आज की रात.

14.     यह मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज ना होना.

15.     याद न जाए बीते दिनों की,जाके न आए वो दिन.

16.     मैं जिंदगीका साथ निभाता चला गया.

17.     एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो.

18.     अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं.

19.     दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो रे.

20.     चौदवी का चाँद हो या आफताब हो.

21.     चाँद मेरा दिल चाँदनी हो तुम 

22.     ऐ गुलबदन फूलोंकी महक काटों की चुभन

23.     शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे दरपे.

24.     मन तड़पत हरी दर्शन को आज.

25.     कुहु कुहु बोले कोयलिया. 

ही यादी खूप मोठी होऊ शकेल,पण ब्लॉगच्या काही मर्यादा आहेतच.मोहम्मद रफी यांनी काही मराठी गाणीही म्हटली, त्यातील प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, शोधीशी मानवा राऊली मंदिरी, अगो पोरी संभाल दर्याला तूफान आयलयं भारी, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा, नको आरती की नको पुष्पमाला, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा ही शलीच गाणी खूप गाजली.

समारोप:

             मोहम्मद रफी यांच्यावर ब्लॉग लिहायचा म्हणजे सोप काम नाही. 1 हजारावर चित्रपटात त्यांनी आवाज दिला.वेगवेगळे संगीतकार, वेगवेगळे सहगायक आणि बरेच काही.त्यांच्या वर ब्लॉग दोन तीन लिहावे लागतील. एवढे मोठं त्यांच काम.म्हणून त्यांची मला आवडलेली गाणी लिहिली. कदाचित ही गाणी तुमचीही आवडती असतील.तर मोहम्मद रफी यांच्या 100 व्या जयंती निमित्त त्यांना माझे विनम्र अभिवंदन.    

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातुपुणे.


Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...