Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

ओ माही ओ माही एक सुरेख गीत

Blog No. 2024/ 085.   

Date: 29th, April 2024.

मित्रांनो,

            बऱ्याच दिवसांपासून एका गीताने माझे लक्ष वेधून घेतले होते. शाहरुख खान आणि तापसी पन्नू अभिनीत “डंकी” (Dunki) या चित्रपटातील “ओ माही ओ माही” हे अरीजित सिंगने गायलेले हे गीत प्रीतम यांनी संगीत बद्ध केले आहे.खूप सुरेख आशयघन शब्दरचना,सुंदर चाल आणि सुरेल स्वर यांचे अनोखे संयुग बऱ्याच दिवसांनी अनुभवास मिळाले.ऐकू या हे गाणे आणि त्याचा स्वैर अनुवाद, आजच्या ब्लॉगमध्ये. 

सविस्तर

यारा तेरी कहानी में, हो जिक्र मेरा

कहीं तेरी खामोशी में, हो फिकर मेरा

मराठी अनुवाद

प्रेमा,तुझ्या कहाणीत कुठेतरी माझा उल्लेख असू दे.

तुझ्या मौनात माझी काळजी दिसू दे.  

हिन्दी  

रुख तेरा जिधर का हो, हो उधर मेरा.

तेरी बाहों तलक ही है, ये सफ़र मेरा

मराठी अनुवाद

तुझी जिकडे नजर असेल तिकडेच माझी असू दे

माझा जिवनाचा प्रवास केवळ तुझ्यापर्यन्त असू दे  

हिन्दी

ओ माही ओ माही,ओ माही ओ माही

ओ माही ओ माही. ओ माही ओ माही

मेरी वफ़ा पे, हक हुआ तेरा

ओ माही माही वे

मराठी अनुवाद

माझ्या प्रेमावर तुझा अधिकार आहे.

हे प्रेमा.   

ओ माही ओ माही,ओ माही ओ माही

ओ माही ओ माही,ओ माही ओ माही

हिन्दी

लो मैं कयामत तक हुआ तेरा,

लो मैं कयामत तक हुआ तेरा

मराठी अनुवाद

मी जगाच्या अंतापर्यंत केवळ तुझाच आहे,

मी जगाच्या अंतापर्यंत केवळ तुझाच आहे.   

हिन्दी

बातों को बहने दो,

बाहों में रहने दो,

है सुकून इनमे

मराठी अनुवाद

प्रेमाच्या कथा अशा पसरू दे,

मला तुझ्या बाहूमध्ये असू दे,

कारण त्यात समाधान आहे.    

हिन्दी

रास्ते वो बेगाने,

झूठे वो अफ़साने,

तू ना हो जिनमे.

मराठी अनुवाद

तू जिथे नाहीस,

ते सर्व मार्ग माझ्या साठी अज्ञात आहेत,

आणि त्या सर्व कहाण्या माझ्या साठी खोट्या आहेत.  

हिन्दी

हो थोड़ी उमर है,

प्यार ज़्यादा मेरा,

कैसे बता ये,सारा तेरा होगा

मराठी अनुवाद

हे जिवन छोटे आहे,

पण माझे प्रेम अपार आहे,

कसं सांगू हे सगळं तुझं आहे.   

हिन्दी

मैंने मुझे है, तुझको सौपना.

मराठी अनुवाद

मला स्वतःला तुझ्या स्वाधीन करायचे आहे.

हिन्दी

आहों पे बाहों पे,राहों पनाहों पे,

आहों पे बाहों पे, साहों सलाहों पे,

मेरे इश्क पे,हक हुआ तेरा.

मराठी अनुवाद

माझ्या हुंकारावर, बाहूवर,आधारावर,    

माझ्या हुंकारावर, बाहूवर,यशावरच काय,

माझ्या प्रेमावर तुझाच अधिकार आहे.

ओ माही माही वे

ओ माही ओ माही

ओ माही ओ माही, ओ माही ओ माही,ओ माही ओ माही.

समारोप:

            सुरेल,सुंदर गाण्यांचे युग संपले नाही. मधून मधून खूप छान गाणी कानी पडत असतात. फक्त आमच्या वेळेस चांगलं होतं किंवा जास्त चांगलं होतं,हा आग्रह सोडला पाहिजे, हेका सोडला पाहिजे,हेच खरे.       

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.

Comments

  1. Frankly I only read the Marathi version. The song is sweet, beautiful and impact and touches your inner soul.

    ReplyDelete
  2. छान सांगितला आहे अर्थ.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...