Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

ओ.पी.नय्यर यांची 99 वी जयंती.

Blog No.2025/017. 

Date: -17th, January,2025. 

मित्रांनो,

            लयबद्ध आणि मधुर संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या ओ.पी. नय्यर अर्थात ओंकार प्रसाद नय्यर यांची काल  99 वी जयंती. ‘आस्मान” या 1952 साली आलेल्या चित्रपटापासून सुरु झालेली ओपीची कारकीर्द अगदी 1994 पर्यन्त विस्तारलेली होती. ‘जिद’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट.अशा या संगीत दिग्दर्शकाला आज त्यांच्या 99 व्या जयंती दिनी माझा मानाचा मुजरा. 

प्रास्ताविक

            ओपी नय्यर यांचा जन्म 16 जानेवारी, 1926 ला पाकिस्तानातील लाहोर येथे झाला. त्यांना तीन भाऊ होते.ओपी यांची पत्नी सरोज ही लग्नापूर्वी स्टेज डान्सर होती.सरोज यांनी “प्रीतम आन मिलो” हे गीत लिहिले होते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा होता.

कारकीर्द

            ओपी नय्यर यांनी सर्वप्रथम 1952 ला “आस्मान” या चित्रपटासाठी संगीत दिले. त्यानंतर छम छमा छम, बाज या चित्रपटांसाठी संगीत दिले.चित्रपट निर्माता,दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त यांनी त्यांना “आरपार”, “मिस्टर अँड मिसेस 55” आणि CID चित्रपटासाठी करारबद्ध केले.नय्यर यांनी प्रामुख्याने संगीत दिग्दर्शन देतांना मोहम्मद रफी,शमशाद बेगम आणि आशा भोसले यांचा आवाज वापरला. “सारी सारी रात तेरी याद सताए” हे एक गाजलेले गीत जरी लता मंगेशकर यांनी गायलेले असले तरी त्यांनी लता मंगेशकर यांच्या सोबत नंतर काम केले नाही.भारतीय शास्त्रीय संगीतातील “पिलु” हा ओपी यांचा आवडता राग ज्याचे कर्नाटक संगीतातील कपी या रागाशी साम्य आहे. ओपी यांची बरीचशी गाणी या रागावर आधारित असतं.1957 मधे त्यांची नासिर हुसेन यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यासाठी ओपी नी “तुमसा नाही देखा” आणि “फिर वही दिल लया हूं” या चित्रपटांना संगीत दिले.

            मोहम्मद रफी यांचेशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी महेंद्र कपूर यांच्यासोबत काम केले. “बहारे फिर भी आयेगी” मधील गाजलेले चित्रपटगीत ‘बदल जाये अगर माली,चमन होता नही खाली. बहारे फिर भी आती है बहारे फिर भी आयेगी” महेंद्र कपूर यांनी गायले होते. त्या नंतर ‘संबंध’ या चित्रपटासाठी “चल अकेला चल अकेला” हे गाणे मुकेशच्या आवाजात रेकॉर्ड केले. ‘शमशाद बेगम’ यांच्या सोबत केलेले गाणे “कजरा मोहब्बत वाला” हे गाणे खूप हित झाले. त्यानंतर “नया दौर” या चित्रपटातील गाणी खूप गाजली.या चित्रपटातील “ये देश हे वीर जवानोका” हे अजूनही देशभक्ती गीत म्हणून लोकप्रिय आहे. CID मधे जॉनी वॉकरवर चित्रांकित झालेले “ए दिल है मुश्किल जीना यहा” हे गाणे देखिल खूप गाजले. किशोर कुमार मधील कलाकार त्यांनी खूप आधी ओळखला होता. किशोर कुमारला त्यांनी ‘बाप रे बाप’ आणि ‘रागिनी’ या दोन चित्रपटात संधि देखिल दिली.पण त्यांचे नाते जास्त टिकले नाही. “प्राण जाये पर वचन न जाये” या 1973 ला आलेल्या चित्रपटापासून ओपी नय्यर यांच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. त्यांनी एकंदर 75 चित्रपटासाठी संगीत दिले.त्यांनी 1992 मधे आलेल्या सलमान खान आणि करिश्मा कपूर अभिनित "निश्चय" या चित्रपटाला संगीत दिले होते. यातील 'देखो देखो तुम हो गया गुम' हे अमितकुमारने गायलेले, खास ओ.पी.नय्यर शैलीतील गीत खुप गाजले होते.

ओपी नय्यर यांची लोकप्रिय गाणी

            ओपी नय्यर यांची लोकप्रिय गाणी पुढील प्रमाणे ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’,‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साथी हाथ बढाना’, “रेशमी सलवार कुर्ता’, ‘मांग के साथ तुम्हारा’, ‘इशारो इशारो मे दिल’, ‘दिवाना हूवा बादल’, ‘कजरा मोहब्बत वाला’, ‘जायिए आप कहा जाएगी’, ‘मन मोरा बांवरा’, ‘मेरा नाम चीन चीन चु’, ‘चल चल अकेला’, ‘बदल जाए अगर माली चमन होता नही खाली’, ‘सवेरे का सूरज तुम्हारे लिये है’, ‘लेके पहला पहला प्यार’, ‘ऐ दिल है मुश्किल जिना यहा’, ‘आँखों ही आँखों मे इशारा हो गया’, ‘कभी आर कभी पार’, ‘बाबूजी धीरे चलना’, ‘आओ हुजूर तुमको’ आणि इतर खूप सारी, ज्यांची यादी द्यायची झाली तर ती खूप मोठी होईल.

मृत्यू  

            28 जानेवारी,2007 ला हा महान संगीतकार आपल्याला सोडून गेला. त्यांचे मृत्यू समयी वय 81 वर्षे होते. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी,एक मुलगा आणि तीन मुली एवढा परिवार ते सोडून गेले.

समारोप

अशा या लयबद्ध आणि मधुर संगीताच्या बादशहाला त्यांच्या 99 व्या जयंती निमित्त माझ्या कडून विनम्र अभिवादन. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातुपुणे.

photo courtesy @music unrestricted 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...