Skip to main content

भारतीय मधुमेही आहार तक्ता

  ब्लॉग नं. 2026/0 87 . दिनांक:  28 मार्च , 2026. मित्रांनो, भारतीय मधुमेही आहार तक्ता: मधुमेहाचे ( Diabetes) नाव काढले की,अनेकदा डोळ्यासमोर येतात ते कडक नियम , बेचव जेवण आणि आवडीच्या पदार्थांचा त्याग.पण खरं सांगायचं तर , रक्तातील साखर सुधारण्यासाठी तुम्हाला खूप कठोर उपायांची गरज नसते.एका दिवशी ओट्स खाणे आणि दुसऱ्या दिवशी भात पूर्णपणे बंद करणे , अशा गोंधळात पडण्यापेक्षा एक स्पष्ट आणि शाश्वत आहार योजना असणे केव्हाही चांगले. हा ब्लॉग तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खावे आणि कसे खावे , याचे सोपे मार्गदर्शन करेल. सविस्तर: मधुमेहासाठी आहार तक्ता का महत्त्वाचा आहे ? जेव्हा आपण प्रक्रिया केलेले कर्बोदके ( Processed Carbs) जास्त खातो किंवा दोन जेवणांमध्ये खूप मोठे अंतर ठेवतो , तेव्हा रक्तातील साखर वेगाने वाढते. एक सुनियोजित आहार तक्ता: ·         जेवण समान अंतराने विभागण्यास मदत करतो. ·         कर्बोदकांसोबत प्रथिने ( Proteins) आणि फायबरची जोड देतो. ·      ...

आरोग्याची गुरुकिल्ली: तुमचे शरीर की तुमचे विचार?

 ब्लॉग नं.2026/085.

दिनांकः 26 मार्च, 2026.  

मित्रांनो

आरोग्याची गुरुकिल्ली: तुमचे शरीर की तुमचे विचार?

आपण आजारी का पडतो? याचं उत्तर शोधायला गेलो तर,आपण जंतू, हवामान किंवा खाण्यापिण्याकडे बोट दाखवतो. पण कधी विचार केलाय का की, या सगळ्याच्या मागे आपलं 'अज्ञ मन' (Subconscious Mind) असू शकतं? याबद्दल आपण जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमधे.

सविस्तरः

आजच्या धावपळीच्या जगात,आपण शरीराच्या व्याधींवर हजारो रुपये खर्च करतो.पण मनाच्या व्याधींकडे दुर्लक्ष करतो. चला तर मग, आज जाणून घेऊया शरीर आणि मन यांच्यातील हे अनोखे नाते.

1. नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठेवा:

माणूस पाण्यात का बुडतो? कारण त्याच्या मनाने घट्ट स्वीकारलेलं असतं की,मला पोहता येत नाही. याउलट,हत्ती किंवा सापाला कोणी पोहायला शिकवत नाही,तरीही ते उत्तम पोहतात.कारण त्यांना स्वतःच्या नैसर्गिक शक्तीवर शंका नसते.आपल्या शरीरातही 'रोगप्रतिकारशक्ती' नावाचा एक नैसर्गिक डॉक्टर,चोवीस तास काम करत असतो.जेव्हा आपण छोट्या आजारांसाठी लगेच औषधांचा भडिमार करतो,तेव्हा आपण खरं तर आपल्या शरीरावर अत्याचार करत असतो. शरीराला स्वतःहून बरं होण्याची संधी द्यायला हवी.

2. तुमचे विचार: तुमच्या आरोग्याचे सेनापती:

आपलं अज्ञ मन एका शक्तिशाली सैनिकासारखं आहे. त्याला जो आदेश दिला जातो, तो तो पाळतो. आपण जे विचार करतो किंवा जे शब्द वारंवार बोलतो, तेच आपल्या आरोग्याचे भविष्य ठरवतात.

 * हृदयरोग आणि रक्तदाब: "त्याला बघितलं की माझं रक्त खवळतं" किंवा "मी रक्ताचं पाणी केलं," अशी वाक्ये वारंवार उच्चारल्यास,त्याचा थेट परिणाम रक्ताभिसरणावर होतो. सततचा मानसिक तणाव आणि राग हृदयाच्या विकारांना आमंत्रण देतो.

 * पचनशक्ती आणि स्वभाव: जे लोक कंजूष वृत्तीचे असतात किंवा ज्यांच्या मनात बालपणातील काही राग साचलेला असतो, त्यांना अनेकदा बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधाचा त्रास होतो.आपली पचनशक्ती ही आपल्या मानसिक मोकळेपणाशी जोडलेली असते.

 * डोकेदुखी आणि मायग्रेन: "त्याने माझं डोकं खाल्लं" किंवा एखाद्या व्यक्तीचा अतिशय तिरस्कार करणे, यामुळे डोकेदुखीचे विकार जडतात. मनातल्या मनात जुन्या घटना उगाळत बसणाऱ्या लोकांना मायग्रेनचा त्रास अधिक होतो.

 * पाठदुखी: जेव्हा एखादी व्यक्ती जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेली असते आणि तिला कोणाचाही आधार वाटत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर पाठदुखी किंवा कंबरदुखीमध्ये होते.

3. मग उपाय काय?

केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत. जर तुम्हाला मुळापासून रोगमुक्त व्हायचे असेल, तर खालील गोष्टी अमलात आणा:

 * स्वयंसुचना (Autosuggestion): तंद्रावस्थेत असताना स्वतःच्या मनाला सकारात्मक सूचना द्या.उदा. "माझे शरीर निरोगी होत आहे," "माझी डोकेदुखी आता शांत होत आहे."

 * भावनांची कोंडी करू नका: मनात राग किंवा द्वेष साठवून ठेवू नका. राग आला असेल तर तो व्यक्त करा. एका कागदावर मनातलं सगळं लिहून काढा आणि नंतर तो कागद फाडून टाका. यामुळे मन हलकं होतं.

 * हसतमुख राहा: हसण्यामुळे शरीरात सकारात्मक हार्मोन्स तयार होतात, जे कोणत्याही औषधापेक्षा जास्त प्रभावी असतात.

समारोपः

तुमचे शरीर हे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब आहे. निरोगी राहायचे असेल तर आधी विचार शुद्ध आणि सकारात्मक करा. औषध शरीरावर उपचार करते, पण सकारात्मक विचार आत्म्यावर उपचार करतात!

 "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!"

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

  

Comments

  1. आजचा ब्लॉग खूप उपयुक्त आहे
    मन जसा विचार करते तसेच शरीर घडत जाते
    मी एकदम फिट आहे, मला काहीही झालेले नाही
    असे नेहमी स्वतः ला सांगत रहा
    बघा काय जादू होते ती
    धन्यवाद प्रसाद
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. Nice information

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...