Skip to main content

टक्कल का पडते? कारणे, गैरसमज आणि काळजी घेण्याचे सोपे उपाय

ब्लॉग नं. 2026/1 55 . दिनांक:  4   जून , 2026.   मित्रांनो, आजकाल आरशासमोर उभं राहिल्यावर , अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात , त्याचं कारण म्हणजे कंगव्यात किंवा स्नान करताना,हातात येणारे केसांचे पुंजके ! "अरेरे , माझे केस खूप गळतायत , मला टक्कल तर पडणार नाही ना ?" ही भीती आजकालच्या तरुणाईपासून ते पन्नाशीतील व्यक्तींपर्यंत,प्रत्येकालाच सतावते आहे. पण कधी विचार केलाय का , की नक्की टक्कल का पडते ? यामागे कोणती विज्ञानाची सूत्रं आहेत आणि आपण नकळत कोणत्या चुका करतोय ? चला तर मग , आजच्या या ब्लॉगमध्ये आपण टक्कल पडण्यामागचं नेमकं विज्ञान , आपली बदलती जीवनशैली आणि यावरील उपायांचा सविस्तर आढावा घेऊया. सविस्तरः 1. मानसिक ताण आणि टक्कल पडण्याचा संबंध: आपल्याकडे एक मजेशीर विनोद नेहमी केला जातो,"मला टक्कल पडत चाललंय या चिंतेनेच,माझे केस जास्त गळायला लागलेत !" यात विनोदाचा भाग सोडला , तरी हे अक्षरशः शंभर टक्के खरे आहे.आजच्या धावपळीच्या युगात,मानसिक ताणतणाव ( Stress) आणि सततची चिंता,हे आपल्या आरोग्याचे मोठे शत्रू बनले आहेत.जेव्हा आपण जास्त ताण घेतो , तेव्हा शरीरातील संप्...

उन्हाळ्यात स्वतःचे रक्षण कसे कराल?

ब्लॉग नं. 2026/088.

दिनांक:  29 मार्च, 2026. 

मित्रांनो,

☀️ उन्हाळ्याच्या झळांपासून स्वतःला वाचवा:

उहाळा सुरू झाला,प्रत्येक ऋतुच्या काही चांगल्या गोष्टी आहेत,तशाच काही त्रासदायक गोष्टी.लहानपणचे उन्हाळ्याचे दिवस काही वेगळेच असायचे. त्या वेळेस चांगली दोन महिन्यांची सुट्टी असायची.एवढा रखरखीत उन्हाळा नसायचा किंवा जाणवत नसेल. पण उन्हाळा हा सगळ्यात चांगला ऋतु वाटत असे.आजकाल मुलांना मार्चमध्ये परीक्षा झाली की,एप्रिलमध्ये पुढच्या वर्गाची शाळा आणि मेमध्ये सुट्टी.आणि जूनपासून पुन्हा शाळा सुरू.नैसर्गिक उपाय आणि आरोग्यदायी आहार यांच्या आधारे उन्हाळ्यापासून स्वतःला वाचवा.आजच्या ब्लॉगमधे यासाठीचे उपाय आपण सविस्तर जाणून घेऊ .

सविस्तरः

उन्हाळा सुरू झाला की,वाढत्या तापमानाचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतो. डिहायड्रेशन (पाणी कमी होणे), पित्त वाढणे आणि अस्वस्थता जाणवणे, या समस्या सामान्य होतात. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली नाही, तर उष्णतेचे अनेक गंभीर विकार जडू शकतात. आजच्या या ब्लॉगमधे आपण पाहणार आहोत की, नैसर्गिक पद्धतीने शरीर थंड कसे ठेवायचे आणि उन्हाळ्यात कोणता आहार घ्यावा.

उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी 'योग' आणि 'सवयी':

प्राचीन भारतीय विज्ञानानुसार, आपल्या शरीरातील 'चंद्रनाडी' शरीराला थंडावा देते. उष्णता कमी करण्यासाठी खालील उपाय नक्की करून पहा:

 * प्राणायाम: नियमित प्राणायाम आणि विशेषतः अनुलोम-विलोम केल्याने शरीराचे तापमान स्थिर राहते.

 * चंद्रनाडी सक्रिय करा: आपली उजवी नाकपुडी बंद करून,डाव्या नाकपुडीने श्वास घेतल्यास शरीरात नैसर्गिक गारवा तयार होतो.यासाठी उजव्या कुशीवर झोपणे फायदेशीर ठरते,ज्यामुळे डावी नाकपुडी आपोआप सुरू राहते.

 * पाणी पिण्याची पद्धत: घटाघटा पाणी न पिता, माठातील किंवा कोमट पाणी बसून सावकाश चवीने प्यावे. सकाळी उठल्यावर लगेच 1-2 ग्लास कोमट पाणी पिणे शरीरासाठी उत्तम असते.

काय खावे आणि काय टाळावे?

उन्हाळ्यात आहार हा औषधासारखा असतो. चुकीच्या आहारामुळे उष्णता अधिक वाढू शकते.

 उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम 'थंड' पदार्थ:

 * फळे आणि भाज्या: कलिंगड, सफरचंद, चिकू, डाळिंब, काकडी, कोबी, दुधी भोपळा, कोथिंबीर आणि पुदिना.

 * पेये: कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, मठ्ठा, नारळ पाणी आणि साखर न घातलेला उसाचा रस.

 * इतर: पांढरा कांदा (जेवणात), सब्जा बी, जिरे पूड घालून केलेले ताक आणि देशी गाईचे तूप.

 उष्णता वाढवणारे 'गरम' पदार्थ (टाळावेत):

 * फळे: आंबा, पपई, अननस.

 * भाज्या: कारले, मिरची, वांगे, गवार, मेथी.

 * ड्राय फ्रूट्स: बदाम, काजू, अक्रोड, खजूर.

 * इतर: चहा, कॉफी, बाजरी, नाचणी, गुळ आणि मांसाहारी पदार्थ (मटण, चिकन).

 * विशेष टीप: बर्फाचा वापर टाळावा. बर्फ स्वभावाने गरम असतो आणि शरीरातील उष्णता वाढवतो.

काही महत्त्वाच्या टिप्स (Quick Tips):

 * उन्हातून आल्यावर: लगेच फक्त थंड पाणी पिण्याऐवजी,थोडे गूळ-पाणी प्यावे.

 * पाय आणि बेंबी: रात्री झोपताना तळपायांना,खोबरेल तेल चोळावे आणि बेंबीत थोडे तेल घालावे.यामुळे शरीरातील उष्णता शोषली जाते.

 * पित्त टाळा: उन्हाळ्यात हलका आहार घ्या आणि पोट साफ ठेवा.पित्त वाढल्यास खडीसाखर खाणे फायदेशीर ठरते.

 * संरक्षण: घराबाहेर पडताना छत्री, कॅप किंवा गॉगलचा वापर नक्की करा.

समारोप:

निसर्गाने आपल्याला प्रत्येक ऋतूशी जुळवून घेण्यासाठी,अनेक सोपे मार्ग दिले आहेत.वरील साध्या उपायांचा अवलंब केला तर आपण उन्हाळ्याचा त्रास न होता या ऋतूचा आनंद घेऊ शकतो.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments

  1. महत्त्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...