Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

जाम सावली येथील अद्भुत हनुमान मंदिर

 Blog No.2024/038. 

Date: -26th, February,2024. 

मित्रांनो,

         काही परिवारीक महत्वाच्या कामासाठी नागपूरला आलो होतो.जरा वेळ होता,मग आम्ही जाम सावली येथील चमत्कारी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाऊन आलो.नागपूरहून छिंदवाडा रोड वर साधारणतः 72 किमी अंतरावर हे मंदिर स्थित आहे. 12-13 वर्षापूर्वी पाह्यलेले हे मंदिर आता भव्य दिव्य स्वरूपात पाहून आश्चर्य वाटले.आजचा ब्लॉग हा याच विषयावर.

 सविस्तर

            नागपूरपासून रोडने 72 किमी वर असलेल्या जाम सावलीला आपण साधारत: 1.30 तासात पोहोचतो. नागपूरहून बाहेर पडणे हे आता,नव्याने झालेल्या फ्लाय ओवर्स मुळे पूर्वी इतके कठीण राह्यलेले नाही.नागपूरहून सावनेरला जातांना उजव्या हाताला मध्य प्रदेशातील छिंदवाडा रोडवर, जाम सावली, डाव्या हाताला लागतं.थोड आंत गेल्यावर,उजव्या हाताला कार पार्किंगची व्यवस्था आहे.पार्किंग फी साध्या तरी रु.30/- एवढी आकारली.मग दुकानांच्या रांगेतून जवळपास अर्ध्या किमीवर गेल्यावर भव्य मंदिर दिसून येतं.दर्शनाला दर्शन रांगेत जावे लागतं.परवाच शनिवार येऊन गेल्यामुळे रविवारी तेवढी गर्दी नव्हती. 

वैशिष्ठ

            या हनुमानजी मंदिराची  विशेष गोष्ट म्हणजे येथील हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे.इथ स्थानिक दुकानदारांना हनुमान निद्रावस्थेत कां असे विचारले असता,फारसे काही हाती लागले नाही.पण एका  आख्यायिकेप्रमाणे या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी लोक चोरी करण्यासाठी आले होते.या मूर्तीवर भरपूर सोन्याचे दागिने असल्याचे चोरट्यांना समजले.असे म्हणतात की चोर येण्यापूर्वी जामसावली येथील ही हनुमानजींची मूर्ती उभी होती.चोरट्यांनी ही मूर्ती काढण्याचा प्रयत्न केला,तेव्हा हनुमानजीची मूर्ती खाली पडली आणि चोरटे  मुर्तीखाली गाडले गेले.

            तसेच मंद्राद्री पर्वत आणण्यासाठी हनुमान प्रभू जेव्हा आले होते,तेव्हा त्यांनी काही काळ येथे विश्रांती घेतली होती.म्हणून येथे हनुमानजींची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे,असेही सांगतात.पण या दोन्ही आख्यायिकांना तथ्याचा आधार मला सापडू शकला नाही. 

हे हनुमान मंदिर श्रद्धेचे केंद्र

            हे अद्भूत हनुमान मंदिर श्री राम भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.असं म्हटलं जातं की जो भक्त या मंदिरात हनुमानावर श्रद्धा आणि भक्ति ठेवून येतो,त्याच्या मनोकामना येथे पूर्ण होतात.मात्र,या निजलेल्या हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना कधी आणि कोणी केली? याचा पुरावा अजून सापडलेला नाही.असं म्हणतात की श्री हनुमान स्वतः प्रकट झाले.मध्य प्रदेश आणि विदर्भातील असंख्य भाविकांच्या या धार्मिक स्थानावर श्रद्धा आहे.आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक येथे येतांना दिसतात.    

       जाम सावली हे जंगल क्षेत्रात येते आणि येथील जंगलात मुख्यतः औषधी वनस्पति आढळून येते.मंदिराकडे जातांना लागणाऱ्या दुकानाच्या रांगेत मुख्यतः लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने,धार्मिक साहित्याची दुकाने आढळली.तसेच खायच्या पदार्थांची दुकाने दिसून आली.थोड वेगळं आकर्षण म्हणजे येथे मिळणारा कूल्हड चहा,म्हणजे मातीच्या भांड्यामधून मिळणारा चहा.

मंदिराच्या वेळा

मंगळवार आणि शनिवार

सकाळी  5.30 पासून रात्री 11.00 वाजे पावेतो

अन्य दिवशी

सकाळी  6.00 पासून रात्री 10.00 वाजे पावेतो

 

आरतीच्या वेळा

रविवार ते शुक्रवार

सकाळी 6.30 वाजता आणि संध्याकाळी 6.30 वाजता

शनिवारी

सकाळी 5.30 वाजता आणि संध्याकाळी 5.30 वाजता

आरतीच्या वेळेस मंदिरात भक्तांना प्रवेश नसतो.

समारोप

        आजकाल जिकडे मंदिरात दर्शनाला जातो,तिथे भक्तांची अलोट गर्दी बघायला मिळते. हे वाढलेले श्रद्धेचे प्रतीक असेल तर चांगली गोष्ट आहे.कारण कुठेतरी श्रद्धा असली की मनुष्याच्या जिवनावर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येतो.पण जर गुन्हेगारी आणि अपराध वाढल्यामुळे,पापापासून मुक्ती मिळवायची म्हणून देव दर्शन करायचे या भ्रामक समजुतीमुळे,जर ही गर्दी वाढतं असेल तर हे सगळं न पटणार आहे.असो.तुमची श्रद्धा असल्यास श्रद्धा म्हणून आणि नसल्यास एक अनोखे ठिकाण म्हणून या मंदिराला अवश्य भेट द्या.     

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...