ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No.2023/299 Date: -30 th , November 2023. मित्रांनो बऱ्याच वेळा अॅसिडिटीचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टर वरणासाठी मूग डाळ वापरायला सांगतात. आजारी माणसाला पचायला हलकी म्हणून पूर्वी तापात आजारी माणसाला मूग डाळीची खिचडी खायला सांगत.अशा या मूग डाळीबद्दल आपण आज बघणार आहोत. प्रास्ताविक मूग डाळ ही मूळची भारतातील आहे आणि हजारो वर्षांपासून भारतीय उपखंडात मूगाची लागवड केली जात आहे. हे भारतीय स्वयंपाकात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणारे शेंगांवर्गीय कडधान्य आहे. मूगाची डाळ संपूर्ण मूगापासून बनविली जाते ,डाळीचे हिरवे बाह्य कवच काढून टाकले जाते. मूगाच्या डाळी पासून बनविले जाणारे पदार्थ पूर्ण मूगाची उसळ , हिरवे मूग डाळीचे वरण, मू गाचा हलवा, मू गवड्या, मू गाची खिचडी, मू गाच्या पिठाचे लाडू, मोड आलेल्या मुगाची उसळ, sprout इत्यादि पदार्थ बनविले जातात. मू गाच्या डाळीत आढळणारी पौष्टिक सामग्री (अंदाजे टक्केवारी): मूगाच्या डाळीची पौष्टिक सामग्री स्वयंपाक करण्याच्या पद्धती आणि प्रक्रि...