Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

विश्वचषकाचा थरार संपला

Blog No.2023/291

Date: -20th, November 2023.


 मित्रांनो,

            आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 हा 5 ऑक्टोबर, 2023 पासून सुरू झालेला हा भव्य दिव्य सोहळा/ही स्पर्धा आता संपली. ऑस्ट्रेलियाने कालची मॅच आणि त्यासोबत विश्वचषकही जिंकला.भारताला हरवून जिंकला वगैरे मी यासाठी लिहिले नाही.कारण अशा सर्वोच्य क्षणाला जो संघ आपला दर्जा किंवा स्तर उंचावतो,त्याचा विजय होत असतो.आता पराभवाची समीक्षा सगळेच करतील.पण खेळ म्हटला एक टीम जिंकणार आणि एक हरणार.कालचा दिवस आपला नव्हता.

प्रास्ताविक

            रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या स्टाइलने सुरुवात करून दिली होती. 1-10 ओवर्स मध्ये आपला रनरेट 8.00 होता. पण त्यानंतर ते जमले नाही,याला कारण ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनी विशेषतः बोलर्सने कॅप्टनच्या रणनितीनुसार सारं काही केले.त्यांनी अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग करून त्यांच्या बोलर्सचे मनोबल उंचावले.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात 3 विकेट 2 रनवर गमावल्यानंतर आपण ती मॅच 6 विकेटने जिंकली होती. तेव्हा पहिली बॅटिंग ऑस्ट्रेलियाची होती,त्यांनी 199 धावा केल्या होत्या. तेव्हा के. एल.राहुल आणि विराट कोहली या जोडीने आपल्याला जिंकवले होते.पण काल दिवस आपला नव्हता.

          या वर्ल्ड कप मध्ये विराट कोहलीने सर्वात जास्त धावा केल्या.मोहम्मद शमी हा सगळ्यात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला.या भारतीय संघाने देशातील क्रिकेट रसिकांना 10 सामना विजयाचा आनंद मिळवून दिला.ज्या ऑस्ट्रेलिया टीमने वर्ल्ड कप जिंकला,त्या संघाला देखिल आपण साखळी सामन्यात हरविले होते.त्यामुळे हा जरी विश्वचषकाचा सामना आपण गमावला असला तरी आपली टीम ही आजवरची सगळ्यात चांगली टीम होती.असेच म्हणता येईल.

सारांश   

विश्वचषकाचा थरार संपला.टीम कुठलीही एकच जिंकते, ती भारतीय टीम असायला हवी होती,असं  मला निश्चितपणे वाटतं होतं.त्यामुळे मलाही दु:ख झाले, वाईट वाटलं.त्यातही रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठी अधिक वाईट वाटलं. कारण कदाचित पुढच्या वर्ल्ड कपला हे दोघे नसतील.भारतीय संघाने केलेल्या एकूण रन्सपैकी जवळपास 1500 रन्स या दोघांनी काढले होते.त्या दोघांसाठी निश्चितपणे भारत जिंकायला हवा होता.कॉलेजच्या दिवसांत परीक्षा संपल्यावर जसं सुनसुन वाटतं तसं आता वाटतंय.आता वेगवेगळ्या देशांशी सिरीज होतील.पण ही मजा आता चार वर्षावर गेली.असो.कालच्या माझ्या ब्लॉग मध्ये मी ऑस्ट्रेलियाच्या बलस्थानांमद्धे “ऑस्ट्रेलियन्सची झुंजार आणि लढाऊ वृत्ती हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे.”असे लिहिले होते आणि काल यामुळेच त्यांचा विजय झाला,हे निश्चित. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट बॉक्समध्ये जरूर लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.    

Comments

  1. Australians played better and that was the only difference between the two teams. Hope our public and sponsors shows similar response towards other sports. Only then we will become sports superpower. And becoming sports superpower is one way to showcase our presence in global arena. Well done Team India

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...