Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

डेंग्यू ताप Dengue Fever स्वतःला जपा

 Blog No.2023/292

Date: -21st, November 2023.

मित्रांनो

            एवढ्यात महाराष्ट्रात डेंग्यू तापाची साथ सर्वत्र चालू आहे.व्हायरल करता करता एक दिवस ताप हा डेंग्यू ताप असल्याचे निष्पन्न निघते.आज हा ब्लॉग यासाठी की तुम्हाला “डेंग्यू ताप” या बद्दलचे जुजबी ज्ञान असायला हवे. 

प्रास्ताविक         

डेंग्यू ताप हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे.त्यामुळे खूप ताप येतो,डोके दुखणे आणि सांधेदुखीचा त्रास होतो.डेंग्यू ताप हा डेंग्यू विषाणू नावाच्या विषाणूमुळे होतो,जो एडीस नावाच्या डासांच्या प्रजातीद्वारे प्रसारित होतो. 

लक्षणे: डेंग्यू तापाची लक्षणे म्हणजे अचानक जास्त ताप येतो,डोकेदुखी, विशेषतः डोळ्यांच्या मागच्या बाजूला डोकेदुखी सुरू होते आणि सांधेदुखी ही सामान्यतः दिसून येणारी लक्षणे आहेत.काही वेळेस त्वचेवर पुरळांची वाढ होते.थकवा जाणवतो,उलट्या होतात,अगदी तुरळक प्रकरणात सौम्य रक्तस्त्राव देखिल होऊ शकतो.   

डेंग्यू तापाचे निदान कसे केले जाते: डेंग्यू तापाचे निदान महत्वाचे आहे. कारण बऱ्याचदा प्रारंभिक अवस्थेत   लक्षणे दिसून येत नाहीत. ताप सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातील रुग्णांसाठी, निदान चाचणीमध्ये डेंग्यू विषाणू पॉलिमरेझ चेन रिएक्शन (PCR) टेस्ट (RRT-PCR किंवा NS1) आणि IgM टेस्ट करायला सांगतात.ताप सुरू झाल्यानंतर 1 आठवड्यानंतर उपस्थित असलेल्या रूग्णांसाठी, IgM टेस्ट सर्वात उपयुक्त आहे, ताप सुरू झाल्यानंतर 12 दिवसांपर्यंत NS1 ही टेस्ट करून घेतात.डेंग्यू ताप हा अनेक दिवस किंवा आठवडे राहू शकतो. यासाठी लसीद्वारे प्रतिबंध करणे गरजेचे आहे. कारण उपचार न केल्यास धोकादायक किंवा जीवघेणा असू शकतो. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. 

डेंग्यू तापाचे तीन टप्पे आहेत:

फेब्रिल टप्पा: ही वेदनाशी संबंधित प्रारंभिक अवस्था आहे आणि 2-7 दिवस टिकते.

गंभीर टप्पा: या अवस्थेत रक्ताच्या प्लाझ्माची गळती दिसून येते आणि सामान्यतः ताप कमी होतो.

रिकव्हरी स्टेज: लीक झालेला द्रव रक्तप्रवाहात पुन्हा शोषला जातो आणि मंद हृदय गती आणि प्रुरिटस सारखी लक्षणे दिसून येतात. 

उपचार

डेंग्यू तापाचा उपचार हा प्रामुख्याने ताप नियंत्रणात ठेवणे आणि प्लेटलेट्सची संख्या कमी न होऊ देणे हाच आहे. 

डेंग्यू तापामुळे होणारी गुंतागुंत:-

डेंग्यू ताप हा वेळीच नियंत्रणात आणला नाही तर विविध गुंतागुंत (Complications) होऊ शकतात. जसे  शरीराच्या विविध भागांमधून रक्तस्त्राव वाढणे, प्लेटलेट्सची संख्या कमी होणे,रक्त प्लाझ्मा गळती.हा आजार असलेल्या गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचा धोका असतो. 

प्रतिबंध्यात्मक उपाय

1.       डेंग्यू तापाची लस घ्यावी

2.   डासांच्या संपर्कात येणे टाळावे.यासाठी साचलेल्या पाण्याचा निचरा करून डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध करणे. खुल्या पाण्यात कीटकनाशकांचा वापर करणे,मच्छरदाणी लावून  झोपणे,डास नाशक औषधे वापरणे आणि संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालणे.

सारांश

मित्रांनो,मी दिलेली माहिती अगदीच प्राथमिक स्वरूपाची आहे.पण त्यामागे डेंग्यू तापाबद्दल जुजबी माहिती असावी हा उद्देश.आपण ताप आलाच तर आणि तोही 101 पेक्षा अधिक ताप आला तर, हलक्यात घेऊ नका.त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या,ही अगदी कळकळीची विनंती.आधीच काळजी घेतलेली बरी.डेंग्यूची लस बाजारात उपलब्ध असेल तर मी ही लावून घ्यायचा विचार करतोय. तुम्ही देखिल ही लस टोचून घ्या. कारण prevention is better than cure. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट बॉक्समध्ये जरूर लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.    

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...