Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

पुस्तक प्रेमी समूह- 1000 वा पुस्तक परिचय

 Blog No. 2023/50      

Date:27th, February 2023.


मित्रांनो,

          आज 27 फेब्रुवारी मराठीतील ज्ञानपीठ पारितोषिक विजेते,ज्येष्ठ साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.कवि कुसुमाग्रज ह्यांच्या गौरवपर हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.गेल्या काही वर्षात मराठी वाचकांची संख्या रोडावते आहे.मराठीचा हळूहळू ऱ्हास होऊन ती लोप पावेल कां. मराठीतील बोलणं,चालणं भलेही मराठी भाषिक आहे,तो पर्यन्त सुरूच राहील.पण साहित्याचे काय आणि मराठी वाचकांचे काय.मराठी वाचक कमी होतं चालले आहेत. असा निराशावादी सूर सर्वत्र दिसत असतांना,एक आशेचा किरण म्हणजे आमचा पुस्तकप्रेमी समूह.11 मार्च,2023 हा आमच्या समूहातील सगळ्यांसाठी अभिमानाचा दिवस, आणि हा अभिमान सार्थ आहे, कारण आमच्या समूहावर 11 मार्चला 1000 वा पुस्तक परिचय सादर केला जाणार आहे. 20 ऑगस्ट,2020 पासून एक दिवसही खंड न पडता,समूहावर आणि फेसबूकवर रोज एका पुस्तकाचा परिचय करुन दिला जात आहे. पुस्तकप्रेमी समूहाचे सगळेच सदस्य अभिनंदनास पात्र आहेत.

 

काय आहे हा पुस्तकप्रेमी समूह

        माझे मित्र अनंत मिसे यांनी 20 जून 2020 ला मला एक आव्हान दिले, हो त्या वेळेस त्याला आव्हान म्हटले जायचे.उद्देश वाचन चळवळ वाढीचाच होता.सतत सात दिवस प्रत्येकाने एका पुस्तकाचे असे सात दिवस सात पुस्तकांचे कव्हर, फेसबूकवर प्रदर्शित करण्याचे हे आव्हान होते.तर मिसे यांनी मला विचारले की 7 दिवसाचे हे आव्हान स्वीकारशील कां? मी स्वीकारले.मी सात दिवस सात पुस्तकांचे कव्हर फेसबूकवर प्रदर्शित केले. पण त्यासोबत त्या पुस्तकाचा अल्प परिचय देखील दिला,उद्देश हा की अल्प परिचय वाचून ते पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण व्हावी.मी पुस्तके बरीच वाचलेली होती,त्यामुळे हे आव्हान वगैरे नव्हते माझ्यासाठी.खरे तरं माझ्यासाठी आव्हान हे होते की हे आव्हान पुढे कुणाला द्यावे. मित्र परिवार बराच,पण त्याने किंवा तिने 7 दिवस सात पुस्तकांचे कव्हर फेसबूकवर प्रदर्शित झाल्यावर ही चळवळ तिथेच न थांबता पुढे जावी आणि वाढत जावी.

            मी मनातल्या मनात सर्च ऑपरेशन सुरू केले आणि एक नांव डोळ्यासमोर चमकले कृष्णा दिवटे. हो कृष्णा दिवटे सर, माझ्या कोल्हापूर येथील वास्तव्यातले माझे स्नेही, साहित्य, संगीत प्रेमी आणि हो विलक्षण लोक संग्रहाचे धनी. त्यांना विचारलं अन त्यांनी आनंदाने होकार दिला.अन मग त्यांच्या मनांत एक कल्पना आली,की प्रत्येकाने पुढच्या सप्ताहासाठी कुठे मित्र शोधायचा. त्यापेक्षा एक व्हाटसअप ग्रुप बनवू त्यातील एक एक सदस्य सात दिवस पुस्तक परिचय देईल. अन ह्या पुस्तकप्रेमीच्या समूहाचे पहिले 10 शिलेदार होते प्रसाद नातु (मी स्वत:) कृष्णा दिवटे, अनंत मिसे, अजिंक्य लाटकर, अक्षता मुतालिक देसाई, अमोल देशपांडे,चैताली ढवळीकर, विद्या पाध्ये,राजा बर्वे आणि विकास मोघे.20 ऑगस्ट,2020 ला पुस्तकप्रेमी समूह ह्या नावाने व्हाटसअप ग्रुप स्थापन झाला.समूह गठित करतांना हे अभियान साधारण सहा महिने चालावे अशी माफक अपेक्षा होती. 



           पण कृष्णा दिवटे सरांचा लोकसंग्रह आणि पुस्तकप्रेमी समूहाच्या सदस्यांचे वाचक मित्रगण हे आमच्या पुस्तकप्रेमी समूहाकडे आकर्षित होऊ लागले.समूहाची संख्या वाढू लागली आणि पुस्तक परिचय करून देण्यासाठी नियोजनाची आवश्यकता भासली.आज मितीस 10 सप्टेंबर,2023 पर्यन्तचे, कुणी पुस्तक परिचय करून द्यायचा ह्याचे वेळापत्रक तयार आहे.या कामी दिवटे सरांचा बँकेतील प्रशासकीय  कामाचा अनुभव कामास आला आणि ते स्वतः हे करतात.हयात त्यांची तळमळ दिसून येते.पुस्तक परिचय करून दिलेल्या पुस्तकांची नोंद ठेवण्याचे काम अजिंक्य लाटकर ह्या टेक savvy तरुण पुस्तकप्रेमी सदस्याने स्वखुशीने स्वीकारले आहे आणि तो स्वतः त्याची नोकरी सांभाळून ते पार पाडतो आहे.हे अत्यंत प्रशंसनीय असेच आहे.

            हळूहळू वाचनप्रेमी सोबतच,पत्रकार,कवि,लेखक,अनुवादक, प्रकाशक,व्याख्याते असे विविध क्षेत्रातील मान्यवर, समूहात येण्यासाठी उत्सुकता दर्शवू लागले आणि आज मितीला सदस्यांची संख्या ही 341 इतकी झाली आहे.साधारणतः एवढा मोठा   ग्रुप म्हटला की रुसवे फुगवे, भांडण बघावयास मिळतात.पण आमच्या पुस्तकप्रेमी समूहावर सर्वच सभासद, मी कुणी विशेष असल्याचा अभिनिवेश बाजूला ठेवून,केवळ एक पुस्तकप्रेमी म्हणून वावरतो हे आमच्या समूहाचे वैशिष्ट म्हणावे लागेल.समूहात काही मान्यवरांना समाविष्ट करून घेण्यात आले आहे.उद्देश हा की नवोदितांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे.कुणी पुस्तक  परिचय देतांना अप्रतिम परिचय  दिला असेल तर ह्या मान्यवरांची कौतुकाची थाप मिळावी आणि काही त्रुटी असतील तर त्या बद्दल मार्गदर्शन. साहित्य म्हटले की त्यात वादग्रस्त पुस्तके,साहित्य असणारच.पण त्यावरून होणाऱ्या अल्प अशा मतभेदांचे मनभेदांत रूपांतर होणार नाही,ह्याची योग्य तो काळजी आमचे सारथी (ग्रुप admin) कृष्णा दिवटे आणि वरिष्ठ सदस्य पूनम कटारिया घेत असतात.म्हणून एवढे सभासद असूनही आमचा समूह “तंटामुक्त” असा आहे.

 

पुस्तकप्रेमी समूहाचे नियम

1. पुस्तक परिचयाचे कॅलेंडर प्रमाणे ज्याचा परिचय येईल त्याने/तिने सतत सात दिवस एका पुस्तकाचा अशा सात दिवस सात पुस्तकांचा परिचय करून  द्यायचा.

2.      पुस्तक परिचय आणि त्यावरील प्रतिक्रिया आणि चर्चा दुपारी 4 पर्यन्त. दुपारी चार नंतर खुला मंच.

3.      Good Morning, Good Night, Happy Birthday, Happy Anniversary मेसेज समूहावर पोस्ट करायचे नाहीत. राजकीय आणि धार्मिक पोस्ट समूहावर नकोत. Forwarded मेसेज फक्त साहित्य आणि कला या विषयांशी संबंधित चालतील.

 

        पुस्तकप्रेमी समूहाबद्दल जो 987 दिवसांपासून सक्रिय आहे आणि 142 आठवड्याचा प्रवास या संबंधी एका ब्लॉग मध्ये विस्तृत लिहिणे केवळ अशक्यच. म्हणून आज इथेच थांबतो.उद्या घेऊन येतो दूसरा भाग.


 

प्रसाद नातु,पुणे.       

Comments

  1. पुस्तकप्रेमी समूहाची खूप छान सविस्तर ओळख करून दिली आहेत.💐

    ReplyDelete
  2. मीनल ओगले.

    ReplyDelete
  3. सुंदर परिचय पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

    ReplyDelete

Post a Comment