ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
माझ्या नोकरीतील शेवटच्या एल टी सी साठी मी राजस्थान ची निवड केली . भारंभार प्रेक्षणिय स्थळ न निवडता. जयपूर , रणथंबोर, अजमेर जवळील पुष्कर सरोवर, अजमेर शरीफ दरगाह, जोधपूर आणि उदयपूर असा दौरा होता. 4 नोव्हे ते 11 नोव्हे 2019. जातांना येतांना फ्लाईट असल्याने वेळेची बचत झाली आणि प्रत्यक्ष साईट सिईंगला वेळ देता आला. तुम्हाला वाटेल कि आता ह्या ट्रीपचे वर्णन या ब्लाॅग मधे असणार काय? नाही बिल्कुल नाही कारण साईट सिईंग म्हटल कि मला पु ल देशपांडेंनी केलेले वर्णन आठवतं. म्हणून तसल काही करणार नाही. पण मला राजस्थान मध्ये काही वेगळं आढळलं ते सांगणार आहे. राजस्थान मध्ये किल्ल्यांचा रखरखाव पहाण्यासारखा आहे. तिथे किल्याचा काही भाग सरकारने व्यवसायिक उपयोगासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जसे हॅडी क्राफ्ट , राजस्थानी पेहराव , कारिगरी चे स्टाॅल इ. या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्याचा उपयोग किल्ले संवर्धनासाठी केला जातो. त्यामुळे किल्ले सुस्थितीत आहेत. आपल्या इथे असे काही करायला हवे. असे मला वाटून गेले. पर्यंटनाला वाहिलेले लोक आहेत. आम्ही ज्या टूर कंपनी...