ब्लॉग नं. 2026/ 235. दिनांक: 233 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , डायबिटीज आणि फ्रोजन शोल्डर: जर तुम्हाला मधुमेह असेल,आणि काही दिवसांपासून खांदा उचलताना त्रास किंवा तीव्र वेदना होत असतील , तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.हा केवळ एक सामान्य स्नायूंचा ताण नसून ' डायबिटीज शोल्डर ' म्हणजेच वैद्यकीय भाषेत ' फ्रोजन शोल्डर ' (Frozen Shoulder) असू शकतो. ' जर्नल ऑफ डायबेटिस इन्व्हेस्टिगेशन ' नुसार , सामान्य लोकांमध्ये खांद्याच्या समस्यांचे प्रमाण 5% असते , तर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हेच प्रमाण 27.5% पर्यंत आढळते.या बद्दल आज सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: ' डायबिटीज शोल्डर ' म्हणजे काय आणि ते का होते ? या स्थितीत खांद्याच्या सांध्याभोवतीचे ऊतक ( Connective Tissue) जाड आणि घट्ट होतात , ज्यामुळे हालचाल मंदावते आणि तीव्र वेदना होतात. रक्तातील साखरेचे उच्च प्रमाण: रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजमुळे शरीरातील ' कोलेजेन ' ( एक महत्त्वाचे प्रथिन) ताठर बनते. कमी रक्तपुरवठा व सूज: दीर्घकालीन मधुमेह आणि सूज ( Inflammation) यामुळे सांध्यांना पुरेसा रक्तपु...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .