ब्लॉग नं. 2026/ 231. दिनांक: 19 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , झोपेत पाय हलवताय ? सावधान! असू शकते मधुमेहाची सुप्त लक्षणे जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO) आकडेवारीनुसार , आज जगभरात सुमारे 83 कोटी लोक मधुमेहाच्या ( Diabetes) विळख्यात अडकले आहेत.सर्वात चिंतेची बाब म्हणजे , अनेकदा या आजाराचे निदान वेळीच होत नाही आणि तो बराच काळ अप्रत्यक्षपणे शरीराला हानी पोहोचवत राहतो.अशा वेळी या आजाराची कमी माहिती असलेली लक्षणे वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे ठरते.ही लक्षणे नेमकी कोणती? जाणून घ्या, आजच्या ब्लॉगमधून. सविस्तर: पर्ड्यू युनिव्हर्सिटीच्या ( Purdue University) ' कॉलेज ऑफ हेल्थ अँड ह्युमन सायन्सेस ' मधील ' स्कूल ऑफ नर्सिंग ' च्या सहयोगी प्राध्यापिका किंग्लान ' प्रिसिला ' डिंग आणि त्यांच्या टीमने नुकत्याच केलेल्या एका संशोधनातून अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. झोपेत पायांची हालचाल आणि मधुमेह: काय सांगतो शोध ? संशोधकांच्या मते , झोपेत वारंवार पायांची हालचाल होणे ( झोपेत पाय हिसके देणे किंवा लाथाडणे) हे टाईप 2 मधुमेहाचे एक महत्त्वाचे सुप्त लक्षण असू शकते. 72 %...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .