ब्लॉग नं. 2026/ 230. दिनांक: 18 ऑगस्ट, 2026. मित्रांनो , साखरेला आपल्या रोजच्या आहारात ' मुख्य शत्रू ' मानले जाते. गोड पदार्थ दिसले की , वजन वाढणे किंवा रक्तातील साखर ( Blood Sugar) अचानक वाढणे , या भीतीने अनेकजण इच्छा असूनही मन मारतात.पण , जर तुम्हाला हे माहित झालं की , आरोग्याची काळजी घेत आणि रक्तातील साखर न वाढवता तुम्ही गोडव्याचा आनंद घेऊ शकता , तर ? आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर वाचा.मधुमेह असतांनाही गोड स्वाद कसा चाखायचा. सविस्तर: ' द फूड न्यूट्रिशन कोच ' च्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ मानसी पांडे यांच्या मते , गोड खाणे पूर्णपणे बंद करण्यापेक्षा , ' योग्य आणि नैसर्गिक पर्याय ' निवडणे अधिक महत्त्वाचे आहे.समस्या नैसर्गिक गोडव्यात नाही , तर ' रिफाइंड ' ( प्रक्रिया केलेल्या) साखरेमध्ये आहे ; ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वेगाने वाढते , शरीरात दाह ( Inflammation) होतो आणि थकवा जाणवतो. तुमच्या या समस्येवर तुमच्याच स्वयंपाकघरात आणि निसर्गात उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. चला , अशाच 5 नैसर्गिक गोड पदार्थांबद्दल ( Natural Sweeteners) जाणून घेऊया ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .