ब्लॉग नं. 2026/ 221. दिनांक: 9 ऑगस्ट, 2026. मानसिक आरोग्य: आजच्या युगातील सर्वात महत्त्वाची गरज आपण रोजच्या आयुष्यात आरोग्याबद्दल बोलताना , नेहमी शारीरिक आजारांचा उल्लेख करत असतो जसे की सर्दी , खोकला , मधुमेह किंवा उच्च रक्तदाब.पण या सर्व धावपळीत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष करतो , तो म्हणजे आपले मानसिक आरोग्य . चला तर मग आज आपण या विषयावर आज थोडे अधिक जाणून घेऊ. सविस्तर: " शरीर निरोगी तर मन निरोगी" असे आपण ऐकत आलो आहोत , पण ख रं तर जर मन निरोगी असेल , तरच शरीरही उत्तम साथ देऊ शकते.म्हणूनच , आजच्या तीव्र स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात , मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे केवळ गरजेचे नाही , तर अनिवार्य झाले आहे. मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय ? मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसोपचार किंवा मानसिक आजार नसणे नव्हे.यात आपल्या भावना , विचार आणि सामाजिक वर्तन यांचा समावेश होतो.आपण ताणतणाव कसा हाताळतो , इतरांशी कसे संबंध ठेवतो आणि आयुष्यात कठीण प्रसंगात कसे निर्णय घेतो , हे सर्व आपल्या मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. उदासीनता ( Depression), चिंता ( A...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .