ब्लॉक नं: 2026/211 दिनांक 30 जुलै 2026 मित्रांनो , मनातील राग , पश्चात्ताप किंवा दुःख जबरदस्तीने नाहीसे करण्यापेक्षा,आपल्या वर्तनात बदल करण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक परिणामकारक ठरू शकते. यासाठी सोडून देण्याची कला अशी आत्मसात करा ! जिला इंग्रजीत Letting Go Approach म्हणतात.यावर आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर विचार करू. सविस्तर: काही गोष्टी आयुष्यातून निघून जातात , पण मनातून जात नाहीत. एखाद्याने केलेला अपमान , नात्यात झालेली फसवणूक , एखादी अपयशी संधी , जुनी चूक , मनात साठलेला राग किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलची कटुता… वर्षे उलटली तरी आपण त्या आठवणींना घट्ट धरून ठेवतो. समोरची व्यक्ती कदाचित पुढे गेलेली असते ; परिस्थिती बदललेली असते ; पण आपण मात्र त्याच प्रसंगात मानसिकदृष्ट्या अडकून राहतो. मग आपण स्वतःलाच म्हणतो, " मला हे सगळं विसरायचं आहे… पण मी विसरू शकत नाही." इथेच येते ' सोडून देण्याची कला '. सोडून देणे म्हणजे एखादी गोष्ट घडलीच नाही असे मानणे नव्हे.ज्याने आपल्याला दुखावले त्याला माफ करणे म्हणजे त्याच्या चुकीचे समर्थन करणेही नव्हे. सोडून देणे ...
ब्लॉग नं. 2026/ 204. दिनांक: 23 जुलै, 2026. मित्रांनो , निसर्गाने आपल्याला अनेक मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत , ज्या आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक म्हणजे विविध प्रकारच्या बिया ( Seeds). आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत स्वतःला निरोगी ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशा वेळी महागडी औषधे किंवा सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा नैसर्गिक आहारावर भर देणे फायदेशीर ठरते. बिया आकाराने जरी छोट्या असल्या , तरी त्या पोषक तत्वांचा प्रचंड मोठा खजिना असतात. म्हणूनच त्यांना ' सुपरफूड्स ' (Superfoods) म्हटले जाते. चला तर मग , आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरणाऱ्या,प्रमुख पाच प्रकारच्या बिया आणि त्यांच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती,आजच्या ब्लॉगमध्ये सविस्तर जाणून घेऊया. सविस्तर: 1 . भोपळ्याच्या बिया ( Pumpkin Seeds) : भोपळ्याच्या बिया दिसायला छोट्या आणि हिरवट रंगाच्या असतात , परंतु त्या झिंक , मॅग्नेशियम , फॉस्फरस आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असतात. प्रोस्टेट आरोग्य ( Prostate Health): पुरुषांमध्ये वयानुसार वाढणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथी...