Skip to main content

Posts

ॲसिडिटी आणि गर्ड या आजारांमधील फरक

ब्लॉग नं. 2026/ 206.   दिनांक: 25  जुलै, 2026.   मित्रांनो , अ‍ॅसिडिटी ( Acidity) विरुद्ध गर्ड ( GERD): फरक , धोके आणि प्रभावी उपाय बदलती जीवनशैली , खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवय आणि वाढता मानसिक ताण यांमुळे आजकाल पोटाच्या तक्रारी खूप सामान्य झाल्या आहेत. यामध्ये ' अ‍ॅसिडिटी ' आणि ' गर्ड ' (GERD) हे दोन शब्द आपण अनेकदा ऐकतो. सामान्यतः लोक या दोन्ही समस्यांना एकच समजतात , पण वैद्यकीय दृष्टिकोनातून या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे. हा फरक समजून घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.आजच्या ब्लॉगमध्ये आपण समजून घेऊ या. सविस्तर:    अ‍ॅसिडिटी आणि गर्ड म्हणजे काय ? ( फरक) 1 . अ‍ॅसिडिटी ( Acidity):               जेव्हा आपण अन्न खातो , तेव्हा ते पचवण्यासाठी आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक आम्ल ( Acid) तयार होते.परंतु , जास्त तिखट , तेलकट खाण्यामुळे किंवा उपाशी राहिल्यामुळे जेव्हा हे आम्ल गरजेपेक्षा जास्त प्रमाणात तयार होते , तेव्हा त्याला ' अ‍ॅसिडिटी ' किंवा ' अम्लपित्त ' म्हणतात. ही एक ता...

Select your Language

निरोगी आतड्यांसाठी औषधांपेक्षा महत्वाच्या चार साध्या सवयी

  ब्लॉग नं. 2026/ 200.   दिनांक: 19 जुलै, 2026.   मित्रांनो ,              माझा या वर्षातील हा दोनशेवा ब्लॉग.2023 पासून रोज ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यापासून , हे सलग चौथे वर्ष आहे की मी सातत्याने 200 ब्लॉग लिहिले. खरं तर याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांना द्यावं लागेल.रोज संध्याकाळी , जेव्हा मी दिवसातील व्हीवज् चा आकडा बघतो , तेव्हा मी अधिक अधिक ब्लॉग लिहिण्यास प्रोत्साहित होतो.आज पर्यंतच्या व्हीवज् चा आकडा 2 , 08 , 000 झाला आहे , ज्यातील 88 , 000 व्हीवज् भारतातील असून , उरलेले 1 , 20 , 000 जगातील 25 देशातील आहेत.पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो.चला आता वळू या आजच्या ब्लॉगकडे.                  सविस्तर: निरोगी आतड्यांसाठी औषधांपेक्षा सवयी अधिक महत्त्वाच्या , या  4  साध्या सवयी बदलेल तुमचे पचन आणि आरोग्य   व्यवस्थित ठेवेल.आजकाल पोट फुगणे , अॅसिडिटी , अपचन , बद्धकोष्ठता आणि थकवा यांसारख्या समस्या , अनेकांना सतावत आहेत.अनेक...

बटाटा खरंच आरोग्याचा शत्रू आहे का?

ब्लॉग नं. 2026/1 99.   दिनांक: 18 जुलै, 2026. मित्रांनो , बटाटा खरंच आरोग्याचा शत्रू आहे का ? अनेक वर्षांपासून बटाट्याला वजन वाढवणारा , मधुमेह वाढवणारा आणि आरोग्यासाठी अपायकारक असा शिक्का मारला गेला आहे.पण आतड्यांच्या आरोग्याच्या तज्ज्ञ   परिधी गर्ग   यांचे मत यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्या म्हणतात ,  " बटाट्याने तुम्हाला निराश केले नाही ,  त्याच्याभोवती निर्माण झालेल्या गैरसमजांनी तुम्हाला निराश केलं   आहे."   योग्य पद्धतीने तयार केलेला आणि खाल्लेला बटाटा हा पौष्टिक आहाराचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयावर सविस्तर जाणून घेऊ.     सविस्तर: बटाटा पौष्टिक का आहे ? बटाटा हा केवळ स्टार्चचा स्रोत नसून , त्यामध्ये फायबर , प्रथिने , पोटॅशियम , व्हिटॅमिन   C, व्हिटॅमिन   B6  आणि लोह यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.त्यामुळे बटाट्याकडे फक्त कार्बोहायड्रेट म्हणून पाहणे योग्य नाही. ' शिजवून थंड करण्याची '  युक्ती काय आहे ? परिधी गर्ग यांच्या मते , बटाटे उकडून किंवा शिजवून काही तास थंड केल्यावर , त्...

दुधाला पर्याय 6 भारतीय सुपरफूड्स

  ब्लॉग नं. 2026/1 98.   दिनांक: 17 जुलै, 2026.   मित्रांनो , चार चौघात जेव्हा जेव्हा गप्पा चालतात,कॅल्शियम आणि हाडांच्या आरोग्याचा विषय निघतो , तेव्हा सर्वात आधी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो पदार्थ म्हणजे ' दूध '. लहानपणापासूनच आपल्याला शरीराच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी,दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.पण तुम्हाला माहीत आहे का ? आपल्याच स्वयंपाकघरात असे अनेक पारंपारिक भारतीय पदार्थ उपलब्ध आहेत , ज्यांमध्ये दुधापेक्षाही कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम आढळते.प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक माहितीपूर्ण पोस्ट शेअर केली आहे , ज्यामध्ये त्यांनी दुधाला उत्तम पर्याय ठरू शकतील अशा 6 आश्चर्यकारक आणि स्थानिक भारतीय सुपरफूड्सची यादी दिली आहे.ही यादी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.तर चला आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ ही यादी. सविस्तर: सामान्यतः प्रति 100 ग्रॅम दुधामध्ये,सुमारे 125 मिग्रॅ कॅल्शियम असते.परंतु , लवनीत बत्रा यांनी सुचवलेल्या 6 भारतीय पदार्थांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे.या यादीत पहिल्या क्...

बुरशी लागलेला भाग कापून उर्वरित अन्न खाणे किती सुरक्षित?

ब्लॉग नं. 2026/1 97.    दिनांक:  16  जुलै, 2026. मित्रांनो , बुरशी लागलेला भाग कापून उर्वरित अन्न खाणे किती सुरक्षित ? याबाबत जाणून घ्या तज्ज्ञांचे काय मत आहे ! अनेकदा आपल्या घरात ठेवलेल्या फळांवर , भाज्यांवर किंवा पावावर ( Bread) थोड्या भागात बुरशी लागल्याचे दिसून येते. अशा वेळी अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण बुरशी लागलेला तेवढाच भाग कापून टाकतो आणि उर्वरित भाग आनंदाने खातो. परंतु , ही सवय आपल्या आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहे ? या गंभीर विषयावर 'bbc.com' वर तज्ज्ञांच्या मतांवर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. काय आहे या अहवालात जाणून घेऊ , आजच्या ब्लाॅगमधे. सविस्तरः वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास , अन्नपदार्थांवरील बुरशी केवळ वरवर दिसणाऱ्या भागापुरती मर्यादित नसते , तर ती आतपर्यंत पसरलेली असू शकते. बुरशी म्हणजे नक्की काय आणि ती कशी पसरते ? तज्ज्ञांच्या मते , बुरशी ( Mold) हा एक प्रकारचा सूक्ष्मजीव किंवा कवक आहे. फळ किंवा भाजीच्या पृष्ठभागावर जी बुरशी आपल्याला डोळ्यांनी दिसते , ती प्रत्यक्षात त्या बुरशीचे केवळ वरचे टोक कि...

किडनी स्टोन (मुतखडा) टाळण्यासाठी 7 सुवर्ण नियम

  ब्लॉग नं. 2026/1 96.   दिनांक: 15 जुलै, 2026.   मित्रांनो , किडनी स्टोन (मुतखडा) टाळण्यासाठी ७ सुवर्ण नियम : किडनी (मूत्रपिंड) हे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे इंजिन आहे.रक्तातील अशुद्धी गाळणे , रसायनांचा समतोल राखणे आणि विषारी घटक शरीराबाहेर टाकणे , ही महत्त्वाची कामे किडनी करते.मात्र , आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खानपानामुळे किडनी स्टोन ( Kidney Stone) म्हणजेच मुतखड्याची समस्या वेगाने वाढत आहे. जेव्हा लघवीमध्ये क्षार आणि खनिजांचे प्रमाण वाढते , तेव्हा त्यांचे बारीक खडे तयार होतात.हे खडे असह्य वेदना आणि अस्वस्थता निर्माण करतात.योग्य वेळी उपचार न केल्यास किडनीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.या गंभीर समस्येपासून दूर राहण्यासाठी , गुरुग्राममधील सीके बिर्ला हॉस्पिटलचे प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. मोहित खिरबत यांनी , जीवनशैलीतील 7 सोपे आणि अत्यंत प्रभावी बदल सुचवले आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ, किडनी स्टोन टाळण्यासाठी चे 7 महत्त्वाचे उपाय . सविस्तर: 1. भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ पिणे ( Hydration is Key) : किडनी स्टोन रोखण्याचा सर्वात सोप...