ब्लॉग नं. 2026/1 96. दिनांक: 15 जुलै, 2026. मित्रांनो , किडनी स्टोन (मुतखडा) टाळण्यासाठी ७ सुवर्ण नियम : किडनी (मूत्रपिंड) हे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचे इंजिन आहे.रक्तातील अशुद्धी गाळणे , रसायनांचा समतोल राखणे आणि विषारी घटक शरीराबाहेर टाकणे , ही महत्त्वाची कामे किडनी करते.मात्र , आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खानपानामुळे किडनी स्टोन ( Kidney Stone) म्हणजेच मुतखड्याची समस्या वेगाने वाढत आहे. जेव्हा लघवीमध्ये क्षार आणि खनिजांचे प्रमाण वाढते , तेव्हा त्यांचे बारीक खडे तयार होतात.हे खडे असह्य वेदना आणि अस्वस्थता निर्माण करतात.योग्य वेळी उपचार न केल्यास किडनीच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.या गंभीर समस्येपासून दूर राहण्यासाठी , गुरुग्राममधील सीके बिर्ला हॉस्पिटलचे प्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉ. मोहित खिरबत यांनी , जीवनशैलीतील 7 सोपे आणि अत्यंत प्रभावी बदल सुचवले आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ, किडनी स्टोन टाळण्यासाठी चे 7 महत्त्वाचे उपाय . सविस्तर: 1. भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ पिणे ( Hydration is Key) : किडनी स्टोन रोखण्याचा सर्वात सोप...
ब्लाॅगः 2026/189. दिनांकः 8 जुलै, 2026. मित्रांनो , आपल्या संपूर्ण आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या पोटात , म्हणजेच ‘गट हेल्थ’ ( Gut Health) मध्ये दडलेली आहे , असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आजकाल वैद्यकीय संशोधनातून एक महत्त्वाची गोष्ट सातत्याने समोर येत आहे – ती म्हणजे , आपले पचनतंत्र केवळ अन्न पचवण्याचे काम करत नाही , तर ते आपल्या शरीरातील अनेक गंभीर आजारांचे मूळ नियंत्रण केंद्र आहे. मधुमेह ( Diabetes), हृदयविकार ( Heart Disease), लठ्ठपणा ( Obesity) आणि किडनीचे विकार ( Kidney Malfunction) यांसारख्या मोठ्या समस्यांच्या मुळाशी खराब गट हेल्थ असणे हे एक प्रमुख कारण आहे.चला तर मग , आजच्या ब्लॉगमधून जाणून घेऊया की,आपल्या पोटाचे आरोग्य या गंभीर आजारांशी कसे जोडलेले आहे. सविस्तर: 1. गट हेल्थ आणि मधुमेह ( Diabetes) : आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी लहान जीवाणू असतात , ज्यांना ' गट मायक्रोबायोम ' (Gut Microbiome) म्हटले जाते.जेव्हा आपण अतिप्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न ( Processed Food) किंवा साखर खातो , तेव्हा या चांगल्या आणि वाईट जीवाणूंचे संतुलन बिघडते.या असंतुलनामुळे शरीरात...