ब्लाॅग नं.2026/194. दिनांकः 13 जुलै, 2026. मित्रांनो , मला जेव्हा जेव्हा कुठे जेवायला जायचा किंवा परिवारसोडून इतरांच्या सोबत हॉटेलमधे जायचा किंवा हॉटेलातील पदार्थ खायचा प्रसंग येतो , तेव्हा तेव्हा मिरची खात जा , डायबेटिस दूर होईल किंवा आम्ही पहा , आम्ही तिखट खातो , आम्हाला नाही डायबेटिस असं मला सांगितलं जातं.अगदी इथे नाही एकाने अगदी उटीला (तामिळनाडू) देखिल सांगितलं , तेव्हापासून विचार करत होतो , याचा मागोवा घ्यावा आणि मग एक ब्लाॅग लिहावा म्हणून आज हा ब्लॉग लिहीला , याच विषयावर. सविस्तरः आपल्या भारतीय स्वयंपाकघरात,हिरवी मिरची नसलेला बेत शोधूनही सापडणार नाही.जेवणाला झणझणीत चव आणण्यासोबतच , हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत , यावर अनेकदा चर्चा होते. अलिकडच्या काळात सोशल मीडिया आणि घरगुती संभाषणांमध्ये,एक नवीन समज पसरत आहे, "हिरवी मिरची मधुमेह ( Diabetes) नियंत्रित करते , आणि जे लोक जास्त तिखट खातात , त्यांना मधुमेह होतच नाही." पण या दाव्यात किती तथ्य आहे ? विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र ( Medical Science) याबद्दल काय सांगते ? चला जाणून घेऊया. हिरवी मि...
ब्लॉग नं. 2026/1 87. दिनांक: 6 जुलै, 2026. मित्रांनो , ' आराम ' की ' विनाशाची सुरुवात '? आपल्या घरात जेव्हा आई-वडील किंवा वृद्ध व्यक्ती आजारी पडतात , तेव्हा आपण त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी एक वाक्य नेहमी वापरतो , " तुम्ही आराम करा , अजिबात घाई करू नका." पण तुम्हाला माहीत आहे का ? अत्यंत मायेने आणि आदराने बोललेले हे तीन शब्द कधीकधी त्यांच्यासाठी सर्वात जास्त घातक ठरू शकतात. जेरियाट्रिशियन (वृद्धावस्था तज्ज्ञ) डॉ. सॉंग युआनमिंग यांनी त्यांच्या 27 वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून आणि 16 ,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष मांडला आहे: " वृद्ध व्यक्तीसाठी अंथरुणावर पडणे सोपे असते ; पण पुन्हा उठणे अत्यंत कठीण असते. अनेक वेळा आजार माणसाला मारत नाही , तर अंथरुण मारते." चला , त्यांच्याच डोळ्यांसमोर घडलेल्या तीन सत्य घटनांमधून समजून घेऊया ,आजच्या ब्लॉगमधून की , आपला ' अति-सेवाभाव ' वृद्धांसाठी कसा क्रूर ठरू शकतो. सविस्तर: सत्य घटना 1 : हाड सांधले , पण फुफ्फुसे निकामी झाली : 2019...