ब्लॉग नं: 2026/173 दिनांक: 22 जून, 2026. मित्रांनो , सुपरफूड भोपळ्याच्या बिया: आरोग्यासाठी शक्तिशाली वरदान! आजकाल निरोगी राहण्यासाठी , आपण अनेक प्रकारचे डाएट प्लॅन आणि महागडे सप्लिमेंट्स फॉलो करतो.पण आपल्याच स्वयंपाकघरात किंवा बाजारात , सहज उपलब्ध असणारी एक अत्यंत स्वस्त आणि गुणकारी गोष्ट आपण अनेकदा विसरतो.ती म्हणजे भोपळ्याच्या बिया ( Pumpkin Seeds). या त्याच बिया आहेत.ज्या पूर्वी आपण कचरा म्हणून फेकून द्यायचो , त्या आज जगभरात ' सुपरफूड ' म्हणून ओळखल्या जात आहेत. भोपळ्याच्या बिया दिसायला जरी लहान असल्या , तरी त्या पोषक तत्वांचा प्रचंड मोठा खजिना आहेत. या बियांमध्ये प्रोटीन , फायबर , निरोगी फॅट्स , मॅग्नेशियम , झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया , आजच्या या ब्लॉगमधे , या लहानशा बियांचे आपल्या आरोग्यासाठी असणारे थक्क करणारे फायदे. सविस्तर: भोपळ्याच्या बिया खाण्याचे मुख्य आरोग्यदायी फायदे: 1 . हृदयाचे आरोग्य सुधारते: भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम , पोटॅशियम आणि निरोगी फॅटी ॲसिड्स (ओमेगा-३) मुबलक प्रमाणात असतात.मॅ...
ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...