Skip to main content

दीर्घ काळ चालणे विसरा, करा हा घरगुती व्यायाम

ब्लॉग नं: 2026/170. दिनांक: 19 जून,2026. मित्रांनो , दीर्घकाळ चालणे विसरा,आता हृदय आणि रक्तातील साखर सुरक्षित ठेवण्यासाठी,अपोलोच्या न्यूरोलॉजिस्टनी सुचवला आहे , एक सोपा घरगुती व्यायाम प्रकार.आजकालच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीत,आपल्यापैकी बहुतांश लोकांचा बराचसा वेळ,खुर्चीवर बसून घालवला जातो.दिवसभर ऑफिसमध्ये किंवा घरून काम करताना,तासनतास एकाच जागी बसून राहणे,ही आता सामान्य बाब झाली आहे.अनेकदा आपण स्वतःची समजूत घालतो की , दिवसभर जरी बसून राहिलो तरी,संध्याकाळी अर्धा-एक तास "लाँग वॉक" (दीर्घकाळ चालणे) करून,आपण ते भरून काढू. पण अपोलो हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांच्या मते , हा तुमचा गैरसमज आहे.संध्याकाळचे चालणे,दिवसभराच्या बसण्यामुळे होणारे नुकसान पूर्णपणे भरून काढू शकत नाही. या समस्येवर डॉ. सुधीर कुमार यांनी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सुचवला आहे , जो तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये खुर्ची शेजारी उभे राहून सहज करू शकता,या व्यायाम प्रकाराबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सविस्तर: तासनतास बसून राहण्याचे धोके आणि डॉक्ट...

मधुमेहींसाठी रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण: Fasting, PP आणि Random टेस्टचे महत्त्व

ब्लॉग नं:2026/169
दिनांक: 18 जून,2026.

मित्रांनो,

मधुमेहींसाठी रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण: Fasting, PP आणि Random टेस्टचे महत्त्व

मधुमेह (Diabetes) शरीरात आल्यावर,आपल्या जगण्याच्या पद्धतीत अनेक बदल होतात आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी,ते करायला हवेत.सामान्यतः रक्तातील साखरेची तपासणी करताना,आपण 'नॉर्मल (General)', 'प्री-डायबेटिक (Prediabetic)' आणि 'डायबेटिक (Diabetic)' अशा तीन श्रेणींबद्दल ऐकतो. पण एकदा का एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचे निदान झालं,की त्यांच्यासाठी 'नॉर्मल' साखरेची व्याख्या बदलते.मधुमेहाच्या रुग्णांनी,निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि दुष्परिणाम (Complications) टाळण्यासाठी, साखरेची पातळी,एका ठराविक मर्यादित (Target Range) ठेवणे गरजेचं असतं.चला तर मग आजच्या ब्लॉग मधे हे समजून घेऊया की,एका मधुमेह असलेल्या रुग्णासाठी फास्टिंग (Fasting), पीपी (Post-Prandial) आणि रँडम (Random) शुगरचे योग्य प्रमाण काय असावे.

सविस्तर:

1.फास्टिंग ब्लड शुगर (Fasting Blood Sugar test):

कधी करावी: सकाळी उठल्यावर, चहा-पाणी किंवा कोणताही आहार घेण्यापूर्वी. किमान 8 तास पोट रिकामं  असणं आवश्यक आहे.

मधुमेहींसाठी योग्य प्रमाण: 80 ते 130 mg/dL.

महत्त्व: फास्टिंग शुगरवरून समजतं की,तुमचं शरीर रात्रीच्या वेळी साखरेचे नियंत्रण कसे करत आहे.निरोगी व्यक्तींमध्ये ही पातळी 100 च्या आत असते, पण मधुमेहाच्या रुग्णांसाठी 130 पर्यंतची पातळी सुरक्षित मानली जाते.

2.पोस्ट-प्रँडिअल किंवा पीपी शुगर (Post-Prandial - PP):

कधी करावी: जेवणाच्या पहिल्या घासापासून अचूक 2 तासांनी ही चाचणी केली जाते.

मधुमेहींसाठी योग्य प्रमाण:180 mg/dL पेक्षा कमी.

महत्त्व: आपण खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते. जेवणानंतर शरीरात इन्सुलिन किती प्रभावीपणे काम करत आहे, हे 'पीपी' टेस्टवरून स्पष्ट होते. मधुमेह नसलेल्या लोकांमध्ये हे प्रमाण 140 पेक्षा कमी असते, पण रुग्णांना सुरक्षिततेसाठी 180 पर्यंतची सूट दिली जाते.

3.रँडम ब्लड शुगर (Random Blood Sugar):

कधी करावी: दिवसातून कोणत्याही वेळी, अन्नाचा विचार न करता ही चाचणी घेता येते.

मधुमेहींसाठी योग्य प्रमाण:140 ते 180 mg/dL च्या दरम्यान.

महत्त्व:अचानक चक्कर येणे, घाम सुटणे किंवा अस्वस्थ वाटल्यास रँडम शुगर तपासली जाते. ती 180 च्या वर गेल्यास रक्तातील साखर वाढल्याचे (Hyperglycemia) संकेत मिळतात.

मधुमेहींसाठी उद्दिष्ट (Target) थोडे जास्त का असते?

अनेक रुग्णांना प्रश्न पडतो की,आपली साखर निरोगी माणसासारखी (उदा. जेवणानंतर 140 च्या आत) का नसावी? याचे मुख्य कारण म्हणजे हायपोग्लायसेमिया' (Hypoglycemia), म्हणजेच साखरेची पातळी 70 mg/dL पेक्षा कमी होण्याचा धोका. साखरेची पातळी अगदी कडकपणे खाली आणण्याचा प्रयत्न केल्यास, साखर अचानक खालावून,जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते.म्हणूनच वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार मधुमेहींना थोडा 'बफर झोन' दिला जातो.

HbA1c टेस्टचे महत्त्व: 

रोजच्या तपासणीसोबतच,डॉक्टरांचा सल्ला घेऊन दर तीन महिन्यांनी 'HbA1c' चाचणी करणे आवश्यक आहे. ही चाचणी गेल्या 90 दिवसांमधील साखरेची सरासरी सांगते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पातळी 7% किंवा त्याहून कमी असणे आदर्श मानले जाते.90 दिवसाची सरासरी का सांगितली जाते,हे कुणीही समजावून सांगत नाही.आपल्या शरीरात ज्या रक्त पेशी तयार होतात,त्यांच आयुष्य हे 90 दिवस असतं,हे त्यामागील कारण आहे.

समारोप:

ब्लॉग मध्ये सविस्तर चर्चा केलेली ब्लड Sugar पातळी ही सर्व सामान्यपणे सामान्य समजली जाते. पण वय, मधुमेहाचा कालावधी आणि इतर आजार यानुसार,प्रत्येकाचे वैयक्तिक 'शुगर टारगेट' थोडे वेगळे असू शकते. आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून,स्वतःचं वैयक्तिक ध्येय निश्चित करा.योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन,यांच्या जोडीने रक्तातील साखरेची पातळी या सुरक्षित मर्यादेत ठेवून, तुम्ही मधुमेहासोबतही एक दीर्घ आणि आनंदी आयुष्य सहज जगू शकता !

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु.

होलीस्टिक हेल्थकोच

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. छान ऊपयुक्त माहिती
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. उपयोगी माहिती 🙏 RR

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...