ब्लॉग नं. 2026/0 53. दिनांक: 22 फेब्रू , 2026 . मित्रांनो, सकाळचा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट हा खरं पाह्यला गेलं तर पूर्वी आपल्याकडे विशेष होत नसे. पण आजकाल कोविड 19 नंतर जीवनशैलीत पडलेल्या फरकांत, सकाळचा नाश्ता किंवा ब्रेकफास्ट हा आवश्यक झाला आहे. विशेषतः वर्क फ्रॉम होममुळे हा प्रकार स्थिरावला. सकाळी लवकर नाश्ता आणि मग दिड-दोन वाजता जेवण किंवा आजकाल त्याला लंच म्हणतात.आणि मग डॉक्टर देखिल हे सांगू लागलेत की,मधुमेही लोकांना नाश्ता आवश्यक आहे.पण रोज नाश्ता करायचा म्हणजे पदार्थ कुठला बनवायचा,हा एक मोठा प्रश्न उभा राहतो.आज अशी एक पोस्ट पाह्यला मिळाली,तर झटपट बनणारे काही नाश्ता प्रकार सुचविले आहे,मला माहित नाही ते झटपट बनतात की नाही.पण तुम्हाला सुचवून पहातो,आजच्या ब्लॉगमधून,खरंच झटपट होत असतील तर. कमेन्ट बॉक्समध्ये लिहा. सविस्तर: सकाळच्या व्यस्त कार्यक्रमात जलद , पोटभर आणि गोंधळ न घालणारे नाश्ते आवश्यक असतात. नाश्त्याच्या बाऊल्समध्ये - पौष्टिक , स्वादिष्ट आणि पूर्णपणे सानुकूल सजवा. तुम्हाला गोड किंवा...
ब्लॉग नं. 2026/046 . दिनांक: 15 फेब्रुवारी, 2026 . मित्रांनो , मेंदूतला एक ‘स्विच’ आणि बदललेलं आयुष्य “ सर , आता वय झालंय…माझ्याकडून नाही होणार.”ही वाक्यं आपण किती वेळा बोलतो ? आणि त्याहून महत्त्वाचं , किती वेळा मनापासून मानतो ? पण एक गोष्ट सांगतो की,कधी कधी शरीराचं वय बदलायला औषध , शस्त्रक्रिया किंवा सप्लिमेंट लागत नाहीत. फक्त मेंदूतला एक छोटासा स्विच ‘ऑन’ करावा लागतो.म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊ या,आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: 1979 सालचा एक अविश्वसनीय प्रयोग 1979 मध्ये , हार्वर्ड विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ डॉ. एलेन लॅंगर यांनी एक धाडसी प्रयोग केला.त्यांना टाइम ट्रॅव्हल करायचं होतं (म्हणजे एका काळातून दुसऱ्या काळांत जाणे) ,पण कोणत्याही मशीनशिवाय.त्यांनी जवळजवळ 80 वर्षांचे आठ वृद्ध पुरुष निवडले.कुणी काठीशिवाय चालू शकत नव्हतं , कुणाच हात थरथरत होता, कोणाला मोतीबिंदू झालेला तर कोणाला स्वतःचं नावही नीट आठवत नव्हतं. त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं, “ वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत.” पण खरं तर, त्यांना पाठवलं जात होतं…1959 सालात, हो 1959 या वर्षात. ...