Skip to main content

वयाच्या सत्तरी नंतरही स्नायू होतात बलवान

ब्लॉग नं. 2026/042 दिनांकः 11 फेब्रूवारी , 2026.   मित्रांनो ,  “ 70 नंतर शरीराची झीज अटळ असते.स्नायू कमी होतात , त्यातील ताकद निघून जाते , संतुलन ढासळतं… आणि ते पहात रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही.” असं आपल्याला वर्षानुवर्षं सांगितलं गेलं. पण जपानच्या डोंगरदऱ्यांत झालेल्या एका संशोधनाने ह्या समजालाच धक्का दिला आहे.नेमकं काय आहे हे संशोधन, जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: अशा काही बिया आहेत की,या बियांमधील प्रथिने अंड्यांपेक्षा तब्बल 21 पट अधिक परिणामकारक ठरली आहेत,विशेषतः 70 वर्षांवरील लोकांमध्ये स्नायू पुन्हा बांधण्यासाठी.काही महिन्याभरात नव्हे तर तर काही आठवड्यांतच त्यांचे पाय स्थिर झाले, त्यांचे संतुलन परत आलं आणि ताकद आणि ऊर्जा वाढली.मग प्रश्न हा  पडतो…ही माहिती इतकी वर्षं आपल्यापासून लपवली का गेली ? कारण साधं आहे , ही सत्य माहिती समोर आली , तर 70 अब्ज डॉलर्सच्या प्रोटीन सप्लिमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसू शकतो.चला तर मग , जाणून घेऊया. 70 नंतरही स्नायू मजबूत ठेवणाऱ्या 6 चमत्कारी बिया कुठल्या आहेत.   🌻 क्रमांक 1 : सूर्यफूल बिया ( Sunflower Seeds...

pre-diabetic and Diabetic

ब्लॉग नं. 2026/041.

दिनांक: 10 फेब्रुवारी, 2026. 

मित्रांनो,

मधुमेह-पूर्व आणि मधुमेह : फरक , लक्षणे व काळजी

आजकाल “मधुमेह” हा आजार घराघरात पोहोचला आहे. पण मधुमेह होण्याआधी एक महत्त्वाची अवस्था येते, ती म्हणजे Pre-Diabetes (पूर्व-मधुमेह). या अवस्थेची वेळीच किंवा योग्य वेळी ओळख झाली,तर मधुमेह टाळता येऊ शकतो. म्हणूनच या दोन अवस्थांमधील फरक समजून घेणे फार गरजेचे आहे.आणि हा फरक आपण जाणून घेणार आहोत,आजच्या ब्लॉगमध्ये.माझ्या एका मित्राने सुचविल्यामुळे मी आजचा हा ब्लॉग लिहीत आहे.

सविस्तर:

Pre-Diabetes म्हणजे काय?

Pre-Diabetes म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या, रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त, पण मधुमेह म्हणता येईल इतकी जास्त नाही अशी अवस्था.ही अवस्था म्हणजे, ही एक इशार्‍याची घंटा आहे. या टप्प्यावर वेळीच जीवनशैली बदलली तर मधुमेह पूर्णपणे टाळता येतो.म्हणून आधी ही अवस्था आपण गाठली आहे कां? हे लक्षात येणे महत्वाचे आहे.   

Diabetes म्हणजे काय?

Diabetes (मधुमेह) म्हणजे रक्तातील साखरेची पातळी सतत जास्त राहणे. यामध्ये शरीर पुरेसे इंसुलिन तयार करत नाही किंवा तयार झालेले इंसुलिन प्रभावीपणे वापरू शकत नाही. हा दीर्घकालीन (chronic) आजार आहे. हा पूर्णपणे बरा होणं शक्य नसलं तरी,योग्य औषधोपचार, आहार व जीवनशैली यावर सातत्याने नियंत्रण ठेवलं तर तो नियंत्रणात ठेवता येतो.  

Pre-Diabetic आणि Diabetic यातील थेट फरक:

Pre-Diabetic मधुमेह पूर्व अवस्था

उपाशी पोटी रक्तातील साखर (FBS) 100 – 125 mg/dl 126 mg/dl पेक्षा जास्त असते.तसेच जेवणानंतरची साखर (PPBS) 140 – 199 mg/dl 200 mg/dl पेक्षा जास्त असते. HbA1c 5.7% – 6.4% 6.5% किंवा त्याहून जास्त असते. ही आजाराची सुरुवातीची अवस्था आहे,जो एक स्पष्ट इशारा समजण्यात येतो. याच्या लक्षणांमध्ये बहुतेक वेळा प्रामुख्याने तहान, लघवी, थकवा, वजन घटणे याचा समावेश असला तरी बऱ्याच वेळा ही लक्षणे जाणवत नाहीत. औषधांची गरज बहुतेक वेळा पडत नसली तरी डॉक्टरांना आवश्यक वाटल्यास ते कमी पॉवरची गोळी सुचवू शकतात,मधुमेह झाल्यास उलटवता येतो का? होय,पूर्ण बरा होतं नाही, पण नियंत्रणात ठेवता येतो.

लक्षणांमधील फरक

Pre-Diabetes मध्ये:

बहुतेक वेळा कोणतीही लक्षणे नसतात. कधी कधी थोडा थकवा, वजन वाढणे, तसेच पोटाची चरबी वाढणे हे बदल जाणवतात. त्यामुळे अनेक लोकांना कळतच नाही की ते Pre-diabetic आहेत, हे लक्षात येत नाही.

Diabetes मध्ये:-

मधुमेहामध्ये मात्र पुढील लक्षणे दिसून येतात. वारंवार तहान लागणे, वारंवार लघवी होणे, वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, जखमा उशिरा भरून येणे तसेच डोळ्यांना धूसर दिसणे आणि शुगर चेक केली तर फक्त एक fasting किंवा जेवणानंतर 2 तासानंतरची किंवा Random शुगर चेक करून निरधास्त होऊ नका. HBA1c करून घ्या. ज्यात तुमची मागील 3 महिन्यातील सरासरी साखर माहित होईल. जी तुम्ही मधुमेही हे स्पष्टपणे दर्शवू शकेल.

Pre-Diabetes का धोकादायक आहे?

Pre-Diabetes दुर्लक्षित केल्यास, पुढील काही वर्षात मधुमेह होण्याची पूर्ण शक्यता खूप असते. हृदयविकाराचा धोका वाढतो, रक्तदाब व कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. पण चांगली गोष्ट म्हणजे याच टप्प्यावर मधुमेह रोखता येतो.

Pre-Diabetes असल्यास काय करावे?

वजन 5–7% कमी करणे, रोज किमान 30–45 मिनिटे चालणे / व्यायाम करणे,साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी करणे,भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य वाढवणे, दर 6 महिन्यांनी HbA1c तपासणी,अनेक संशोधनांनुसार, फक्त जीवनशैली बदलल्यानेही मधुमेह टाळता येतो.

Diabetes असल्यास काय करावे?

डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणे, आहार नियोजन (डायबेटिक डाएट) करणे, नियमित व्यायाम

साखर, HbA1c, BP, कोलेस्टेरॉल तपासणी तसेच डोळे, किडनी, पायांची काळजी घेणे इत्यादि. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर तुम्ही जर वर दिलेली काळजी घेतलीत तर, मधुमेह नियंत्रणात राहील.    

समारोप:

Pre-Diabetes निदान होणे ही शिक्षा नाही, ती संधी आहे. योग्य वेळी योग्य पावले उचलली तर,मधुमेह आयुष्यभरासाठी टाळता येतो.कालच मी माझ्या मधुमेह तज्ञांची भेट घेतली असता, योग्य वेळी निदान न होणे,निदान झाल्यावर औषधाच्या गोळ्या घेण्यात केलेली टाळाटाळ, योग्य ते रिपोर्ट करून घेण्यातील चालढकल, हलगर्जीपणा हा मधुमेह होण्याच्या काही कारणांपैकी आहेत.म्हणून वेळीच काळजी घ्या.          तपासणी करा, जागरूक रहा आणि जीवनशैलीत छोटे बदल करून मोठा आजार टाळा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

Comments

  1. अतिशय उपयुक्त माहिती आहे.
    कित्येक जणांना आपण प्रि डायबिटिक आहोत हे लक्षातच येत नाही व डायबिटीज त्यांना जेव्हा जखडून घेतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते
    A stitch in time saves nine
    या ऊक्ती प्रमाणे वेळीच काळजी घेतली तर आयुष्यभर फायदा होऊ शकतो
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. अगदी खरं आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  3. मी कालच्या ब्लॉगमध्ये केलेल्या विनंतीवरून आपण माहिती दिल्याबद्दल प्रथम धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती आणि पुढील जीवनात वरील माहितीचा खूप उपयोग होईल असं मनापासून वाटत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...