ब्लॉग नं.2026/042
दिनांकः 11 फेब्रूवारी, 2026.
मित्रांनो,
“70 नंतर शरीराची झीज अटळ असते.स्नायू कमी होतात,त्यातील ताकद निघून जाते,संतुलन ढासळतं… आणि ते पहात रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही.” असं आपल्याला वर्षानुवर्षं सांगितलं गेलं. पण जपानच्या डोंगरदऱ्यांत झालेल्या एका संशोधनाने ह्या समजालाच धक्का दिला आहे.नेमकं काय आहे हे संशोधन, जाणून घेऊ आजच्या ब्लॉगमध्ये.
सविस्तर:
अशा काही बिया आहेत की,या बियांमधील प्रथिने अंड्यांपेक्षा तब्बल 21 पट अधिक परिणामकारक ठरली आहेत,विशेषतः 70 वर्षांवरील लोकांमध्ये स्नायू पुन्हा बांधण्यासाठी.काही महिन्याभरात नव्हे तर तर काही आठवड्यांतच त्यांचे पाय स्थिर झाले, त्यांचे संतुलन परत आलं आणि ताकद आणि ऊर्जा वाढली.मग प्रश्न हा पडतो…ही माहिती इतकी वर्षं आपल्यापासून लपवली का गेली?
कारण साधं आहे, ही सत्य माहिती समोर आली, तर 70 अब्ज डॉलर्सच्या प्रोटीन सप्लिमेंट इंडस्ट्रीला मोठा धक्का बसू शकतो.चला तर मग, जाणून घेऊया. 70 नंतरही स्नायू मजबूत ठेवणाऱ्या 6 चमत्कारी बिया कुठल्या आहेत.
🌻 क्रमांक 1 : सूर्यफूल बिया (Sunflower Seeds):
100 ग्रॅम सूर्यफूल बियांमध्ये जवळपास 21 ग्रॅम संपूर्ण प्रथिने आहेत, तर व्हिटॅमिन E – 82% (फक्त ¼ कपमध्ये) आहे. व्हिटॅमिन E हे वृद्धत्वात स्नायूंना होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून संरक्षण करतं.या बियांमधील Arginine नावाचं अमिनो अॅसिड स्नायूंमध्ये रक्तप्रवाह 40% पर्यंत वाढवतं, त्यामुळे पोषण थेट स्नायूपर्यंत पोहोचतं.
संशोधन असं सांगतं की, दररोज 30 ग्रॅम सूर्यफूल बिया खाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये 8 आठवड्यांत पकडण्याची ताकद (Grip Strength) 15% वाढली.
🌾 क्रमांक 2 : तीळ (Sesame Seeds):
100 ग्रॅम तीळ बियांमध्ये जवळपास 18 ग्रॅम उच्च दर्जाची प्रथिने आहेत.पण खरी ताकद आहे,ती Methionine मध्ये. Methionine हे वय वाढल्यावर स्नायू टिकवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं,अमिनो अॅसिड. अंड्यांपेक्षा जास्त प्रमाणात हे तीळामध्ये उपलब्ध आहे.
🔬 टोकियो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार दररोज 2 टेबलस्पून तिळाची पावडर//कूट (तीळ पेस्ट) वृद्ध पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन 18% वाढतं. आणि स्नायू रिकव्हरी 40% जलद झाली.
🌰 क्रमांक 3 : जवस (Flax Seeds):
जवस म्हणजे ओमेगा-3 चा खजिना. जवसामध्ये स्नायूंची सूज 52% कमी झाली आणि स्नायू प्रथिन निर्मितीत 27% ने वाढ झाली. विशेष म्हणजे, जवसातील Lignans,इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात, त्यामुळे स्नायूंना पोषण शोषण सोपं होतं. 12 आठवड्यांत 1.5 किलो स्नायूची वाढ होते आणि 2.2 किलो चरबी कमी होते. (आहार किंवा व्यायाम बदल न करता!)
🎃 क्रमांक 4 : भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds)
भोपळ्याच्या बिया म्हणजे नैसर्गिक Creatine. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियामध्ये 30 ग्रॅम प्रथिनं आढळून येतात. यांत उपलब्ध असणारे Zinc हे,स्नायू दुरुस्तीसाठी अत्यावश्यक असतं.तसेच यांत आढळणारे Magnesium,हे 300 पेक्षा जास्त जैविक क्रियांमध्ये उपयोगी पडतं.
संशोधन सांगतं, अंड्यांइतकं प्रथिन खाऊनही,भोपळ्याच्या बिया खाणाऱ्यांची 60% अधिक स्नायू वाढ दाखवली
🌿 क्रमांक 5 : हेम्प बिया (Hemp Seeds)
हेम्प बियांनी NASA ने “Perfect Food” म्हटलेलं आहे. 31 ग्रॅम संपूर्ण प्रथिन यांत असतं. यामुळे 94% पचनक्षमता वाढते. या बियांमधील Edestin Protein,हे अगदी मानवी रक्तातील प्रथिनांसारखं असतं. जे मूत्रपिंडांवर ताण न देता स्नायू बांधतं. यामुळे शरीरातील सूज 58% कमी होते.
⚫ क्रमांक 6 : चिया बिया (Chia Seeds):
चिया बिया या स्नायूच्या वृद्धत्वाच्या शत्रू आहेत असं म्हटलं जातं. चिया बिया,या स्वतःच्या वजनाच्या 12 पट पाणी शोषतात.त्यामुळे प्रथिनांचा 6 तासांचा,हळूहळू पुरवठा होतो.
🔬 स्टॅनफर्ड अभ्यास :
70 नंतर चिया बियांचं शोषण, 12 आठवड्यांत 2.8 किलो स्नायू वाढ होते. तसेच चालण्याचा वेग 23% ने वाढतो. तसेच Grip Strength अर्थात पकड ताकद 31% ने वाढते.
🌱 समारोप :
वय नाही,अज्ञान आपल्याला कमकुवत करतं.70 नंतर स्नायू कमकुवत होणं ही शिक्षा नाही.ती माहितीच्या अभावाची किंमत आहे. निसर्गाने उपाय दिले आहेत.फक्त आपण त्याकडे पाहिलं नाही. एक-दोन बियांपासून सुरुवात करा.यांत सातत्य ठेवा आणि स्वतःलाच आश्चर्यचकित करा.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

उपयोगी माहिती 🙏 RR
ReplyDelete