ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...
Blog No. 2024/ 10 6 . Date: 2 6 th,May 2024 मित्रांनो , गेल्या दोन दिवस मला वाटतं मी वजन कमी करण्याबद्दल ब्लॉग लिहिले. परवाच्या ब्लॉग मध्ये वजन भराभर कमी कां करू नका,कारण त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतात या विषयावर ब्लॉग लिहिला आणि काल वजन तर कमी करायचे आहे पण व्यायाम करायला वेळच नाही मग काय? तरी वजन कसे कमी करता येते हे कालच्या ब्लॉगमध्ये सूचविले. आज थोडा वेगळा विषय पाककलेशी संबंधित आहे. नाही,रेसिपी वगैरे नाही हो, तर स्वयंपाक कसा करावा या विषयावर आहे. बघू या. सविस्तर:- इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीयांसाठी स्वयंपाकाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.पूर्व पाककला प्रक्रिया ( pre - cooking process ) आणि पोषक तत्त्वे टिकवून ठेवण्याच्या पद्धतींवर यात भाष्य केले आहे. पाककला हे कला आणि विज्ञान यांचे परिपूर्ण मिश्रण आहे , जिथे योग्य चवीचे पदार्थ तयार करणे हे कलेचे काम आहे , तर स्वयंपाकासाठी योग्य पद्धत आणि योग्य भांडी यांचा वापर ही विज्ञानाची बा...