Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

आपल्या परिवाराचं भविष्य सुरक्षित करा

ब्लॉग नं. 2024/282

दिनांक:- 21 नोव्हेंबर, 2024.

मित्रांनो,

            विमा त्यातही आयुर्विमा हे नांव ऐकलं तर लोक तुमच्यापासून दूर पळतांनाचे दिवस पाहिलेत मी. चांगले मित्र देखिल मित्र राह्यलेले नाहीत हे देखिल पाह्यले नाही.आजही परिस्थिति फारशी वेगळी आहे असं मला वाटतं नाही.पण इतक्यात मी सहज एक चेंज म्हणून पाच दिवस एक प्रसिद्ध विमा कंपनीच्या पाच दिवसांच्या वर्क शॉपला गेलो होतो. गेल्या पाच वर्षात मी 12 कथासंग्रह आणि 2 कादंबऱ्या लिहिल्या. थोडी मरगळ आली होती.ती  घालवायची म्हणून जायचं ठरवलं.रोज वाघोलीहून रामवाडीला जायचं,तिथून मेट्रो पकडून आनंदनगरला जायचं,अन तिथून विमा कंपनीच्या ऑफिसला जायचं असा दिनक्रम आणि प्रवास मस्त मजेत पार पडला.यावर आहे आजचा ब्लॉग.

सविस्तर:

     आश्चर्य म्हणजे हे वर्क शॉप मला पटवून गेलं की इन्शुरन्स केवळ कारचा,हौसहोल्ड गुडसचा आणि घराचा महत्वाचा नसतो तर आयुर्विमा देखिल महत्वाचा असतो. अर्थात कोविड 2019 ही जागतिक महामारी देखिल बऱ्याच लोकांना आयुर्विम्याचे महत्व शिकवून गेली.त्या इन्शुरन्स कंपनीचा कोर्स तसा डिझाईन केला होता हे कारण नव्हतच मुळी, पण कधी कधी कुणाकुणाची समजवून सांगण्याची हातोटी इतकी जबरदस्त असते की नीरस आणि कंटाळवाणा विषय देखिल सोपा आणि मनोरंजक होऊ शकतो.

            या वर्क शॉपमध्ये आम्हाला म्हणजे माझ्या सोबत 21 जण होते.त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. विनीत गडकरी नांवाचे उत्कृष्ठ मार्गदर्शक होते.त्यांनी इन्शुरन्स हा विषय आमच्यासमोर छान उलगडून दाखविला.हसत खेळत त्यांनी आमच्या मनाचा ताबा घेत,जे काही मनावर गरुड केलं होतं. ते केवळ जबरदस्त एवढचं म्हणता येईल.

        आता मूळ विषयाकडे येऊ या.इतक्यात मी जे काही शिकलो,त्यातून टर्म इन्शुरन्स कां घ्यावा याचे मला झालेले आकलन मी आपल्यापुढे ठेवत आहे.

टर्म इन्शुरन्स: तुमच्या कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा

   आयुष्य अनिश्चित आहे, आणि या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी टर्म इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी घेतलेले जीवनविमा संरक्षण. या पॉलिसीअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते. विशेष म्हणजे, ही योजना तुलनेने कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण देणारी असते.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स ही एक शुद्ध जीवनविमा पॉलिसी आहे.जर पॉलिसीच्या कालावधीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्यांच्या नॉमिनीला निश्चित रक्कम (सम अॅश्युअर्ड) दिली जाते.जर पॉलिसीधारक ठरलेल्या कालावधीमध्ये जिवंत राहिला, तर त्याला कोणतेही परतावे मिळत नाहीत. ही योजना प्रामुख्याने कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार केली जाते.

टर्म इन्शुरन्सचे वैशिष्ट्ये:

1 कमी प्रीमियम:-

इतर जीवनविमा योजनांपेक्षा टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम कमी असतो.

2.जास्त सम अॅश्युअर्ड:  u

कमी प्रीमियममध्ये मोठी विमा रक्कम उपलब्ध होते. उदाहरणार्थ प्रती वर्ष रु. एक लाखात एक कोटीचा विमा. (हे फक्त उदाहरणा दाखल दिले आहे,प्रत्यक्ष प्रीमियम आणि विम्याची राशी या संबंधात विमा कंपनीसही संपर्क प्रस्थापित करावा.)   

3. टॅक्स फायदे:

आयकर कलम 80C, 10 (10 D) अंतर्गत पॉलिसीधारकाला कर सवलतीचा लाभ मिळतो.

4. अतिरिक्त पर्याय:

अॅक्सिडेंटल डेथ, क्रिटिकल इलनेस, किंवा इनकम रिप्लेसमेंटसाठी अतिरिक्त कव्हर जोडता येते.

5. टर्म इन्शुरन्स का घ्यावा?

अ. कुटुंबाची आर्थिक सुरक्षा:

तुम्ही नसल्यासही तुमच्या कुटुंबाचे जीवनमान कायम राहावे, यासाठी टर्म इन्शुरन्स उपयुक्त आहे.

ब. कर्ज आणि देणी फेडण्यासाठी मदत:

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कर्जाची जबाबदारी कुटुंबावर येऊ नये म्हणून.

क वैयक्तिक आयुष्यातील निरधास्तता:  

टर्म इन्शुरन्स घेतल्याने आयुष्य अधिक निर्धास्त आणि शांत बनते.

योग्य टर्म इन्शुरन्स योजना कशी निवडाल?

1.       तुमच्या आर्थिक गरजा आणि कुटुंबाच्या भविष्याचा विचार करा.

2.       प्रीमियम आणि विमा रक्कमेतील संतुलन तपासा.

3.       कंपनीची विश्वासार्हता आणि क्लेम सेटलमेंट रेशो बघा.

4.       ऑनलाइन योजना खरेदी करताना सवलतींचा विचार करा.

समारोप:

            टर्म इन्शुरन्सवर मी जे शिकलो ते म्हणणे बरोबर नाही,मला जे समजलं ते मी लिहिलंय.माझे तेथील मार्गदर्शक हा ब्लॉग वाचतीलच,त्यांचा यावर अभिप्राय येईलच.वाचकांनी आपल्या मुलांपर्यंत हे पोहोचवाव,म्हणजे कुणाच्या कामी आल्याचं समाधान मिळेल.   

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

प्रसाद नातु, पुणे.  


Comments

  1. Term insurance explained in very simple way that too with benefits … 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...